SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कॅडेट्‌स सर करणार देव टिब्बा शिखर
  • मंचर- राजीनाम्याच्या मागणीसाठी माजी खासदाराचे उपोषण
  • पुण्यात रंगणार "बहुभाषिक कलामहोत्सव'
    पुणे, ता. १६ - देशाच्या सोळा राज्यांतील विविध कलाप्रकारांना सामावून घेणारा "बहुभाषिक नाट्य, नृत्य, संगीत महोत्सव' २१ मे ते १ जूनदरम्यान पुण्यात होणार आहे. "अखिल भारतीय सांस्कृतिक संघा'तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    उत्सव खरेदीचा
    शिवाजीनगर (पुणे) - "सकाळ'तर्फे आयोजित "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल' शुक्रवारपासून सुरू झाला. "फेस्टिव्हल'च्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त गर्दी केली.

    पहिल्याच दिवशी तुडुंब गर्दी
    पुणे, ता. १६ - छायाचित्रे-व्हिडिओग्राफी प्रदर्शन, गृहसजावटीच्या वस्तू, आलिशान फर्निचर, किचन वेअर, ज्वेलरी असे एकापेक्षा एक वैशिष्ट्य घेऊन "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल' आजपासून दिमाखात सुरू झाला.

    मुलगा "आयएएस' झाला आईच्या कष्टाचे चीज झाले
    पुणे, ता. १६ - घरातील कर्ता माणूस कायम आजारी असल्याने गावाकडे चला, असा नातेवाइकांचा आग्रह, मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यातच राहिल्या.

    बीआरटी पुन्हा वादात
    पुणे, ता. १६ - सातारा रस्त्यावर "बीआरटी' मार्गाचे काम पूर्ण झाले असले, तरी पदपथ, सायकल ट्रॅक आदी कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

    परदेशस्थ भारतीय प्राध्यापक पुण्याकडे
    पुणे, ता. १६ - शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात चांगल्या प्राध्यापकांची कमतरता भासत असताना, पुण्यातील "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च'मध्ये (आयसर) मात्र शिकवण्याची संधी मिळावी, यासाठी जागतिक दर्जाच्या परदेशी विद्यापीठांमधून संशोधन करणाऱ्या अनेक भारतीय युवा संशोधकांमध्ये स्पर्धा आहे.

    रेल्वे प्रशासनही जबाबदार - विजयसिंह देशमुख
    पिंपरी, ता. १६ - रेल्वेमार्गे आणल्या जाणाऱ्या मालावर नियमित जकात वसुली केली जाते. पिंपरी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मालाची जकात चुकवेगिरी थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही.

    पुणे शहर विजेबाबत स्वयंपूर्ण करता येईल - जयंत देव
    पुणे, ता. १६ - आगामी काळात महाराष्ट्रात विजेचे संकट अटळ असले, तरी अभ्यासपूर्ण नियोजन, विजेची बचत आणि ग्राहकांच्या सहकार्यातून निर्माण होणाऱ्या भांडवलातून पुणे शहर विजेबाबत स्वयंपूर्ण करता येईल, असा विश्वास राज्य वीज नियामक आयोगाचे माजी सदस्य जयंत देव यांनी आज येथे व्यक्त केला.

    वाहन तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनास चांगला प्रतिसाद - दिलीप बंड
    पिंपरी, ता. १६ - चिंचवड ऑटो क्‍लस्टर येथे आयोजित केलेल्या वाहन तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनाचा उद्या (शनिवारी) समारोप होणार आहे.

    अहवालांवर काय अंमलबजावणी केली, हेच माहीत नाही!
    पुणे, ता. १६ - गेल्या बारा वर्षांत किती सल्लागार नेमले आणि त्यांनी सादर केलेल्या अहवालांवर काय अंमलबजावणी केली; त्यांना किती पैसे दिले, याची माहिती पालिकेकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

    पुढील आठवड्यातमोदी, ठाकरे पुण्यात
    पुणे, ता. १६ - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेमुळे पुण्यातील वातावरण पुढील आठवड्यात ढवळून निघणार आहे.

    "प्लास्टिकचा वापर करण्याआधी हाही विचार करा'
    पुणे, ता. १६ - प्लास्टिकचे कागद, पाकिटे व लहान-मोठ्या पिशव्यांचा सर्रास वापर करताना त्याच प्लास्टिकपासून होणाऱ्या उपद्रवी कचऱ्याचाही विचार आपण सर्वांनीच करायला हवा.

    हरकती-सूचना मागविण्याचे शासनाने आदेश
    पुणे, ता. १७ - महापालिकेने समाविष्ट गावांतील टेकड्यांच्या क्षेत्रात मोनार्क संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे १०४ हेक्‍टरचा फेरबदल झाला आहे.

    "महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार' स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
    पुणे, ता. १६ - "सकाळ' आणि "मिटकॉन'तर्फे आयोजित "महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार २००८' स्पर्धेला शुक्रवारपासून उत्साहात सुरवात झाली. उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या स्पर्धेला महाराष्ट्र आणि गोव्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला असून, स्पर्धेसाठी ९२ उद्योजिकांची निवड झाली आहे.

    कृषी पर्यटन हा शेतीला जोड उद्योग - बाळासाहेब थोरात
    पुणे, ता. १६ - ""शेतकऱ्यांना जोड उत्पन्न मिळवून देणारा उद्योग म्हणून कृषी पर्यटनाकडे पाहावे लागेल. शासनाच्या कृषी उद्योग धोरणात कृषी पर्यटनाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल,'' असे आश्‍वासन राज्याचे कृषिमंत्री
    बाळासाहेब थोरात यांनी दिले.

    बनावट "ई-मेल' प्रकरणी ठाण्याच्या तिघांना अटक
    पुणे, ता. १६ - बॅंकेच्या नावाने खोटा "ई-मेल' पाठवून खातेदाराच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक केल्याच्या आरोपावरून डेक्‍कन पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली.

    झोपडपट्टीतील मुलांच्या चेहेऱ्यावर "जॅकी' ने फुलवले हास्य
    पुणे, ता. १६ - हाऊ आर यु..... सिंग पोएम.... पढाई करो.... कम सून.... बाय .... हा संवाद आहे, चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ आणि झोपडपट्टीतील गरीब कुटुंबातील मुलांचा! वय विसरून जॅकीनेही "रोली पोली,' "बुगी वूगी' अशी कविता आणि गाणे गायल्याने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

    जिल्ह्यातील मोठ्या गावांचा विकास आराखडा तयार करणार - श्‍याम वर्धने
    पुणे, ता. १५ - जिल्हा परिषदेच्या हद्दीत झपाट्याने विकसित होत असलेली शहरालगतची गावे आणि जिल्ह्यातील मोठी गावे बांधकामाच्या नियोजनाअभावी बकाल होऊ नयेत, यासाठी या गावांचा विकास आराखडा नगर नियोजन खात्याकडून तयार करून घेण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविले आहे.

    प्रचाराची रणधुमाळी थंडावली
    खडकी, देहूरोड, ता. १६ - कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी गेले महिनाभर धडधडत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी पाच वाजता थंडावल्या.

    पुणे-सोलापूर महामार्ग चौपदीकरण करण्याचा विचार - हर्षवर्धन पाटील
    कळस, ता. १६ - पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांना मोठ्या प्रमाणात टोल द्यावा लागत असल्याने, त्या मार्गावरील वाहतूक या मार्गाकडे वळली आहे.

    सिद्धबेटच्या विकासासाठी पंचवीस कोटींचा निधी - संजीव ओहोळ
    आळंदी, ता. १६ - येथील सिद्धबेट तपोवनच्या विकासासाठी राज्य शासनाने "विविध तीर्थक्षेत्र विकासा'अंतर्गत पंचवीस कोटी रुपये निधीस तत्त्वतः मंजुरी दिली असल्याचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी सांगितले.

    बारामतीचा विकास आराखडा जाहीर
    बारामती, ता. १६ - शहराचा विकास आराखडा आज अखेर नागरिकांकरिता खुला करण्यात आला. काल वृत्तपत्रात प्रकटीकरण करूनही हा नकाशा नागरिकांना खुला न झाल्याने, तर्कवितर्क केले जात होते.

    सिंहगडाची ओळख पंचतारांकित विश्रामगृह म्हणून नको
    खडकवासला, ता. १६ - सिंहगडच्या विकास आराखड्याची बेजबाबदार अंमलबजावणी केल्याबद्दल पर्यटन विकास महामंडळाच्या विरोधात अखिल भारतीय मराठा महासंघाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600