|
|  |
 | कसोटी क्रिकेटमध्ये नावीन्याची गरज - गॅरी कर्स्टन नवी दिल्ली, ता. १६ - ""ट्वेंटी-२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेच्या ओघात
कसोटी क्रिकेटचीही लोकप्रियता टिकविण्यासाठी नावीन्याची गरज आहे. त्यासाठी दर
वर्षी जागतिक साखळी अजिंक्यपद स्पर्धा घ्यावी,'' असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक
गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे. |
अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला विजय आवश्यकच इपोह (मलेशिया), ता. १६ - अझलन शाह हॉकी स्पर्धेत उद्या (शनिवारी) भारत आणि यजमान
मलेशिया आमने सामने असणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उद्या
विजय मिळविणे आवश्यक आहे. |
ऑस्ट्रेलियातही आता आयपीएल? सिडनी, ता. १६ - "इंडियन प्रीमियर लीग'च्या धर्तीवर स्पर्धा आयोजित करण्याचा विचार
ऑस्ट्रेलिया क्रिकेट करीत आहे. |
दगड पडल्यामुळे सेहवागला धक्का नवी दिल्ली, ता. १६ - चार धक्कादायक पराभवांची मालिका घरच्या मैदानावर खंडित
केल्यानंतरही दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग याच्यावर दगड
फेकण्यात आला. सेहवागला यामुळे धक्का बसला आहे. |
शाहू कॉलेज मैदानावर रविवारी डर्ट ट्रॅक स्पर्धा पुणे, ता. १६ - गल्फ डर्ट ट्रॅकची दुसरी फेरी शाहू कॉलेजच्या मैदानावर रविवारी पार
पडेल. या स्पर्धेत देशभरातील नामवंत रायडर सहभागी झाले आहेत. त्यामुळे स्पर्धा
अटीतटीची होण्याची अपेक्षा आहे. |
"हरभजनवरील पाच सामन्यांची बंदी योग्यच' अहमदाबाद, ता. १६ - ""हरभजनसिंगवर थप्पडप्रकरणी घातलेली पाच एकदिवसीय सामन्यांची
बंदी योग्यच आहे,'' असे मत "बीसीसीआय'ने नेमलेले चौकशी आयुक्त सुधीर नानावटी यांनी
व्यक्त केले आहे. |
बांगलादेशातील तिरंगी मालिका "निओ'वर मुंबई, ता. १६ - बांगलादेशात आठ जूनपासून सुरू होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतील
सामन्यांचे थेट प्रक्षेपण "निओ क्रिकेट'या वाहिनीवरून होणार आहे. |
जीव मिल्खासिंग संयुक्तपणे आघाडीवर अडेअर (आयर्लंड), ता. १६ - आयरिश ओपन गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या फेरीअखेर भारताचा
जीव मिल्खासिंग आणि ऑस्ट्रेलियाचा रिचर्ड ग्रीन यांनी संयुक्तरीत्या आघाडी घेतली
आहे. |
वेटलिफ्टिंग महासंघास क्रीडामंत्र्यांचे समन्स नवी दिल्ली, ता. १६ - वेटलिफ्टर कवितादेवी उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे
केंद्रीय क्रीडामंत्री एम. एस. गिल संतापले आहेत. त्यांनी भारतीय वेटलिफ्टिंग
महासंघाचे प्रमुख हरभजन सिंग यांना समन्स बजावले आहे. |
अख्तरवरील बंदी कमी होणार? कराची, ता. १६ - पाक क्रिकेट मंडळाचा चौकशी लवाद शोएब अख्तरवरील पाच वर्षांची
बंदी कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. |
क्रॅसेनेकॉविरुद्ध हम्पीचा पराभव मुंबई, ता. १६ - कोनेरू हम्पीला मुंबई महापौर बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत
ग्रॅंडमास्टर मायकेल क्रॅसेनकॉव याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. |
|
|  |
|