|
|  |
 | हर्षलियन युगाचा प्रारंभ होत आहे ! - श्रीराम भट सध्या "हर्षल' कुंभ राशीतून पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रातून जात आहे. या
नक्षत्रातील "मिथुन नवांशात मारकॅब नावाचा मनस्वी गुणधर्म असलेला एक स्थिर तारा
आहे. अफाट बुद्धिमत्तेशी संबंधित असलेला हा तारा स्किझोफ्रेनिया या मानसिक
रोगाशीही संबंधित आहे. आगामी काळात हर्षल या ताऱ्याजवळ राहणार आहे. शिवाय शनीशी
त्याचा प्रतियोग होणार आहे. गुढतेशी हर्षल या ग्रहाचा संबंध आहेच. आगामी काळात
माणसांच्या अतींद्रिय शक्ती जागृत होणार आहेत. अफाट मानसिक आणि बौद्धिक शक्ती
असलेली जशी माणसे पाहण्यात येतील; तसेच बुद्धिमान मनोरुग्णांचेही प्रमाण वाढणार
आहे. हा असमतोल म्हणजेच हर्षलियन युगाची नांदी होय. ज्योतिषशास्त्र हे खरे पाहता
मानसशास्त्र आहे. आद्य खगोलशास्त्रज्ञांनी आणि निष्णात मानसशास्त्रज्ञांनी
ज्योतिषशास्त्राबद्दल बोलके मौन पाळले आहे. वैश्विक मनावर अंमल करणारे हर्षल,
नेपच्यून आणि प्ल्युटो हे ग्रह शनी या ग्रहाच्या पलीकडचे आहेत. जडवस्तू पलीकडील
अणुविज्ञानाशी ते खेळतात. हे ग्रह ेलींर्रींश (मनाच्या उच्च स्तराशी संबंधित)
आहेत. योगवासिष्ठातील चिद्अणू संकल्पना ते सिद्ध करतात. ज्ञानेश्वर म्हणतात-
"घन अज्ञान सुषुप्ती। तो बीजांकुरभावो म्हणती। येर स्वप्न ह न जागृती। हा फळभावो
तिथेचा।।'
चिद्अणू हा एक बीजांकुर भाव आहे. त्याचा स्पंद म्हणजे स्वप्न आणि जागृती होय. हा
स्पंद ज्योतिषशास्त्राचे मानसशास्त्र जाणून घेऊ शकते. शेक्सपिअरला हा
ज्योतिषशास्त्राचा स्पंद जाणवला होता! ...... |
|
|  |
|