|
|  |
 | पोंभुर्ले ही मराठी पत्रकारांची पंढरी - तटकरे देवगड, ता. १७ - मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले
(ता. देवगड) हे जन्मगाव म्हणजे मराठी पत्रकारांची पंढरी असल्याचे मत राज्याचे अन्न
व नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री सुनील तटकरे यांनी आज पोंभुर्ले येथे
व्यक्त केले. |
शासनाने सागर विकायला काढलाय! रत्नागिरी, ता. १७ - सागरी हद्दीत कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) ऐवजी आता
कोस्टल मॅनेजमेंट झोन लागू केल्याने शासनाच्या तिजोरीत वर्षाला तीस हजार कोटी
रुपयांचा महसूल गोळा करून देणारा मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. |
शिफारस करा आणि उपचार घ्या रत्नागिरी, ता. १७ - आरोग्य अधिकाऱ्यांचा अभाव आणि सुमार सेवा या कारणाने जिल्हा
शासकीय रुग्णालयाच्या सुरस कथा बाहेर चर्चिल्या जात असताना आता रुणालयाने
उपचारासाठी शिफारशीचा नवा फंडा अमलात आणला आहे. |
वाळू उत्खननाबद्दल दोन ड्रेझर्सना सील मंडणगड, ता. १७ - सावित्री खाडीमध्ये रात्रीच्यावेळी अनधिकृतपणे वाळू उत्खनन
करताना आढळल्याने सागरदीप, नंदकुमार या दोन ड्रेझर्सना सील करण्यात आले आहे. |
हत्तींच्या समस्येवर तोडगा नियंत्रण कक्ष कार्यान्वित ओरोस, ता. १७ - जिल्ह्यातील जंगली हत्तींच्या समस्येवर मात करण्यासाठी
उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांच्या कार्यालयात प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर
यांच्या सूचनेनुसार आता नवीन पुनर्रचनेनुसार नियंत्रण कक्ष कार्यान्वित होत आहे. |
सिलिंडर स्फोटानंतर पोलिस चौकशी सुरू कणकवली, ता. १७ - शहरातील शिवशक्तीनगर येथील मारुती ओम्नी मोटारीतील सिलिंडर
स्फोटाची पोलिस चौकशी सुरू झाल्यानंतर शहरातील अवैध गॅस सिलिंडर विक्रेत्यांनी
सिलिंडर साठाच शहराबाहेर हलविला आहे. |
शॉर्टसर्किटमुळे घराला आग दाभोळ, ता. १६ - तालुक्यातील बुरोंडी येथे शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागून
सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. |
|
|  |
|