|
|  |
 | राज्यात नवा राजकीय पर्याय पुणे, ता. १७ - राज्याच्या राजकीय पटावर आज आणखी एका आघाडीचा उदय झाला. समाजवादी
विचारांचे सर्व पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत राज्यातील सर्व निवडणुका "समाजवादी
आघाडी'च्या झेंड्याखाली लढविण्याचा निर्णय घेतला आहे. |
महाराष्ट्राची लोककला टिकविण्याचा प्रयत्न तमाशा, लावणी या लोककलांना पूर्वी लोकश्रयाबरोबरच राजाश्रय मिळते असे. आता
लोकश्रयावरच ही कला चालू आहे. या कलेबाबत शासनाची भूमिका उदासिनतेची आहे. तमाशा
थिएटर सुध्दा काळाच्या ओघात नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. दूरचित्रवाणीच्या
जमान्यात हे कलाकार महाराष्ट्राची लोककला टिकवून ठेवत आहेत.
व्हिडिओ
पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
राज्यांतील २९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई, ता. १७ - राज्यातील २९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. उच्च व
तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती जॉयस शंकरन यांची अतिरिक्त
मुख्य सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य या पदावर तर टी.सी. बेंजामिन यांची प्रधान
सचिव नगरविकास विभाग सचिव (२) यांची प्रभाग सचिव नगरविकास विभाग सचिव (१) या पदावर
नियुक्ती करण्यात आली आहे. |
विविध बॅंकांमध्ये नोकरभरतीची लाट! औरंगाबाद, ता. १७ - वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांतर्फे त्यांच्याकडील विविध
पदांच्या रिक्त असलेल्या २३ हजारांवर जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले
आहेत. |
"उद्धव, राज'ची वक्तव्ये मनोरंजनाची - जयंत पाटील सातारा, ता. १७ - ""शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वक्तव्य निखळ मनोरंजन असून, प्रसारमाध्यमांना अशी
वक्तव्ये दररोज लागतात. यातून केवळ लोकांचे मनोरंजन होते. त्याच्याकडे आम्ही लक्ष
देत नाही,'' असा टोला अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत
लगावला. |
"महानंद'ने दूधस्वीकृती घटविली कोल्हार, ता. १७ - महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने (महानंद) दुधाची
स्वीकृती घटविल्यामुळे प्रवरा परिसरातील काही दूध संस्थांपुढे अतिरिक्त दुधाचा
प्रश्न निर्माण झाला आहे. |
जागा विकून कर्मचाऱ्यांना पैसे देण्याबाबत विचार होणार - पवार नगर, ता. १७ - दूध संघाच्या मालकीच्या जागा विकून कर्मचारी व दूधउत्पादकांचे थकीत
पेमेंट देण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी तालुका दूध संघातील कर्मचारी व
दूधउत्पादकांची संयुक्त सभा मंगळवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता सावेडी रस्त्यावरील
संघाच्या कार्यालयात होणार आहे, अशी माहिती प्रशासकीय समिती सदस्य पोपटराव पवार
यांनी दिली. |
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशमुख यांचे निधन मुंबई, ता.१७ - दैनिक "सकाळ' (मुंबई)चे माजी मुख्य वार्ताहर, ज्येष्ठ पत्रकार
प्रकाश देशमुख (वय ५८) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी
मुंबईत निधन झाले. |
मुलींची हत्या करून कमावले कोट्यवधी -ऍड. वर्षा देशपांडे नगर, ता. १७ - "मुलीच्या जन्माने ताप होतो' अशा समाजातील समजुतीचा फायदा घेत
देशातील काही डॉक्टरांनी गेल्या वीस वर्षांत लाखो मुलींची हत्या घडवून ५०० कोटी
रुपयांची कमाई करीत देशाला सामाजिकदृष्ट्या धोक्यात आणले आहे. अशा लोकांचा बीमोड
करण्यासाठी सरकारी यंत्रणेने कडक पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय
गर्भनिदान कायदा विभागाच्या सदस्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी केले. |
"लवकरच २०० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या' मुंबई, ता. १७ - तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी काम केलेल्यांची बदली
करण्याच्या धोरणानुसार सुमारे दोनशे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या काही
दिवसांत होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज मंत्रालयात
पत्रकारांशी बोलताना दिली. |
गॅस जोडण्या बंद केल्यास आंदोलन; भाजपचा इशारा मुंबई, ता. १७ - जागतिक स्तरावर पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमती वाढत नव्याने
देण्यात येणारी गॅस कनेक्शन बंद करण्याचा सरकारी तेल कंपन्यांचा निर्णय म्हणजे
घडाळ्याचे काटे उलटे फिरविण्याचा प्रकार आहे. |
साहित्यात बदलत्या स्थितीचा धांडोळा अपेक्षित - कळमकर नगर, ता. १७ - ""दृक्श्राव्य माध्यमांतील कार्यक्रमांद्वारे संस्कारहीन होऊ
पाहणारी तरुण पिढी व घरातील वयोवृद्धांना वृद्धाश्रमात ठेवण्याइतपत संवेदनाहीन होऊ
पाहणारा समाज, अशा बदलत्या स्थितीचा धोंडाळा साहित्यात अपेक्षित आहे. कुटुंब-
संस्कृतीच्या गप्पा मारताना मनोरंजनात रमण्याऐवजी वास्तव व त्यावरील उपाय
साहित्यातून स्पष्ट झाले, तरच समाजजीवनाला नवी दिशा त्यातून मिळू शकेल,'' असे
प्रतिपादन कथाकार संजय कळमकर यांनी आज येथे केले. |
महिनाअखेर संपूर्ण उसाचे गाळप होणार - धुमाळ राहुरी, ता. १७ - ""आमच्या विरोधी मित्रांनी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या
कार्यक्षेत्रात अद्याप एक लाख मेट्रिक टन ऊस गाळपाअभावी उभा असल्याच्या तक्रारी
केल्या आहेत. मात्र, कारखाना कार्यक्षेत्रात जेमतेम ३५ हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक
आहे. या महिनाअखेरीस त्याचे गाळप पूर्ण होईल,'' असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष
रामदास धुमाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केले. |
|
|  |
|