SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

आभाळमाया - माहेर
माहेर शब्दाचा उच्चार केला किंवा ऐकला तरी स्त्रीमनाला कोळीळकूजन, मोराचा फुललेला पिसारा, थंड वाऱ्याची झुळूक अशा संवेदनांची जाणीव होते अन्‌ नकळत तिच्या मनातल्या डोळ्यांत अनेक आठवणी दाटतात. कदाचित पापण्यांना त्या सुखाच्या भावनांचे ओझे होते व गालावर अश्रूंच्या रूपाने त्या ओघळतात. आठवणींच्या फुलबाज्या नजरेसमोर चमकतात.

खरंच काय जादू आहे या "माहेर' शब्दात. आंब्याला मोहोर फुटावा तसा या माहेर शब्दाचा मोहोर सुगंधित होऊन बहरून येतो अन्‌ त्या वाटेकडे कन्यकेचे आसुसलेले मन धावत सुटते. "रुणझुणत्या पाखरा जा माझ्या माहेरा' अशा शब्दांनी घरासमोरील झाडावर ओरडत असलेल्या कावळ्याला मनातील घालमेल ती व्यक्त करत असते.

संसाराचा हा सुखदुःखाचा भवसागर पार करत असताना अनेक चढउतार आयुष्यात येतात. या संसाररूपी रथाची दोन चाके स्त्री-पुरुष. कधी आनंदाने, तरी कधी दुःखाने हा रथ ती ओढत असतात. यात कुठे तरी विसावा हा हवाच. अशा विसाव्याची अनेक ठिकाणं असतात. स्त्रियांना तर हक्काचे, प्रेमाचे असे "माहेर' असते.

माहेर शब्दाची विभागणीच म/आहेर. माझ्या सुखाचा आहेर, असाच असावा. म्हणूनच तिथे जाण्याच्या ओढीने या रथाचे ओझे त्या पेलू शकतात. काही ना काही कारणानिमित्त अथवा खास "माहेरवाशीण' म्हणून स्त्रिया आपल्या सुखस्थळी जातात अन्‌ निश्‍चिंत होऊन वर्षभराच्या विश्रांतीची, समाधानाची, आनंदाची पुंजी साठवतात. जी अतुलनीय असते.

पूर्वीच्या काळी मोठमोठे वाडे, शेतीवाडी, मोठ्या मनाची माणसे या सुबकतेमुळे लहान- पोरसोरंही आजोळी जाण्यासाठी उत्सुक असायची. आजही अनेक खेड्यांमध्ये अशा प्रकारचे वाडे, शेती, मळे, रानमेवा, आमराई, नारळी, पोफळी, काजू, फणस अशा अनेक गोष्टींची रेलचेल दिसून येते. या सुखाचे वाटेकरी खरंच भाग्यवंत व धनवंतच. झुकझुक गाडीने, एसटीने स्वतःच्या वाहनाने आजोळी जायचे अन्‌ मग त्या वाड्यात, शेतात, मळ्यात मनसोक्त बागडायचे, नदीतिरी जाऊन पोहायचे. आंब्याच्या झाडावर चढून पाड खायचे. इतरही रानमेव्याचा आस्वाद घ्यायचा अन्‌ शेतात आजीच्या नाहीतर मामीच्या हातचे सुग्रास जेवण करून एखाद्या झाडाच्या सावलीत ताणून द्यायची. संध्याकाळ झाल्यावर नाइलाजास्तव घरी परतायचे अन्‌ सकाळची वाट पाहत शेतातील स्वप्ने पाहत झोपी जायचे. एकंदरीत सुटीचा खरा उपयोग घ्यायचा. मात्र स्वतःच्या गावाकडील परतणीला सर्वांचा निरोप घेणे महाकठीणच. परत पुढील सुटीत येण्याच्या बोलीवर जड अंतःकरणाने जायचे. मनात अनेक आठवणींना बरोबर घेऊन अन्‌ त्या सुखद आठवणींवर वर्ष काढावयाचे दुधाची तहान ताकावर भागवतच. अशा या मुलांच्या आनंदात आईही आनंदी समाधानी व निश्‍चिंत असते. प्रापंचिक अडचणी नजरेआड असल्याने तीही आपले दिवस आईच्या मायेच्या शब्दांत, वडिलांचा पाठीवर फिरणारा हात, भावजयींशी गप्पागोष्टींत.

भावाबहिणींच्या रुसवाफुगव्यात रोज रोज नवीन पदार्थांचा आस्वाद घेण्यात मजेत घालवत असते. पण भावनांपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ असल्याने तिला स्वतःच्या घरी जावे लागते. शिवाय स्वतःच्या मुलीच्या माहेरपणासाठी आईला सासरी नांदावे लागते हेच खरे. याकरिता शेवटी देवाजवळ एक मागणं मागावसे वाटते-

""देवा तुला काय मागू ।
तू मला भरभरून दिलंस।
अजून तुला काय सांगू ।
सारं मला भरभरून पावलं।।
तरीपण तुझ्याजवळ
आहे एक मागणं ।
लेकींना कधी होऊ देऊ नकोस
परकं माहेर अंगण ।।

- डॉ. सौ. मीनाक्षी निळेकर

चित्रान्न ते बर्गर - मकईचा चिवडा
साहित्य -४ गावरान मक्‍याची कणसे किसून, अर्धी वाटी चणाडाळ भिजवून वाटून, एक वाटी दूध, एक वाटी बारीक चिरलेला कांदा. अर्धी वाटी तेल, तीळ, जिरे, ४-५ काळीमिरी, हिंग, हळद. मीठ, साखर, लिंबाचा रस. मिरची, आले, लसूण वाटून, चिरलेली कोथिंबीर.

कृती - तेल गरम करून त्यात जिरे, मिरे, तीळ व हिंगाची फोडणी करावी. त्यात कांदा, किंचित हळद घालून, लागलीच मक्‍याचा किस, वाटलेली चणाडाळ व दूध घालून एक वाफ द्यावी. नंतर मीठ, साखर, लिंबूरस, आले, लसूण, मिरचीचे वाटण घालून परतावे. पुन्हा एक वाफ द्यावी. वाढताना कोथिंबीर घालावी. टीप - अमेरिकन मका वापरल्यास दूध व साखर घालू नये.

- सुषमा किबे


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600