|
|  |
 | "सुनो ना... सुनो ना'वर धरला प्रेक्षकांनी ताल नागपूर, ता. १७ - "तुमने ना जाना मै हूँ दिवाना, लेकर आया हूँ दिल का नजराना मेरे
दिल की है दास्तॉं... सुनो ना सुनो ना', हे गीत गाऊन संगीत दिग्दर्शक आदेश
श्रीवास्तव याने आज रात्री यशवंत स्टेडियमवर आयोजित म्युझिकल थंडर नाईटमध्ये प्राण
ओतले. |
स्टार किती गाड्या रस्त्यावर उतरविणार नागपूर, ता. १७ - स्टार बससेवा किती गाड्या रस्त्यावर उतरविणार, असा प्रश्न आज
रविभवन येथे झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. याचे उत्तर देण्यासाठी दोन
दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला. |
मावळते जिल्हाधिकारी गहिवरले नागपूर, ता. १७ - गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांशी संघर्ष संपून संवाद फुलला, हेच
नागपूरच्या कार्यकाळातील मोठे यश असल्याचे मनोगत मावळते जिल्हाधिकारी डॉ. संजय
मुखर्जी यांनी व्यक्त केले. |
टीव्हीचा रिमोट पुरुषांच्या हाती नागपूर, ता. १७ - वाद्याच्या तालावर थिरकणाऱ्या ललना, एकापाठोपाठ एक हवेत उंच
मारले जाणारे फटके, मनोरंजन आणि संघर्ष असे बदललेले क्रिकेट वाहिन्यांवरील
मालिकांचा कर्दनकाळ ठरले आहे. |
विदर्भात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या नागपूर, ता. १७ - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या
आत्महत्येचे सत्र सुरूच असून, विदर्भातील आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे
आज (ता.१६) आढळून आले. |
चंद्रपूरची दीपाली लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण चंद्रपूर, ता. १७ - तुकूम परिसरात राहणाऱ्या दीपाली रविचंद्र मासीरकर हिने
पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण
होण्याचा मान मिळविला. |
वेड्याने घेतला पोलिस चौकीचा ताबा अकोला, ता. १७ - वेड्याने पोलिस चौकीचा ताबा मिळविल्याने पोलिसांना त्याला बाहेर
काढण्यासाठी विविध "विशेष नामांची' मदत घ्यावी लागली. |
पश्चिम विदर्भ झाला "मी मराठी' अमरावती, ता. १७ - "मराठीच्या राजसत्ते'ची बात महाराष्ट्रभर सुरू असल्याने
महाराष्ट्राचे प्रशासनही त्यादृष्टीने "तंदुरुस्त' करण्याचे प्रयत्न प्रशासकीय
पातळीवर होत असल्याचे दिसून येत आहे. |
अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून हत्या हिंगणा / कळमेश्वर (जि. नागपूर), ता. १७ - हिंगणा येथील हनुमाननगरातील अल्पवयीन
बालिकेवर अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.
१६) सायंकाळी घडली. |
चिखलदऱ्याचा विकास "इकोफ्रेण्डली' अमरावती, ता. १७ - चिखलदऱ्याचा पर्यटनविकास करण्याच्या दृष्टीने आता हालचालींनी
वेग घेतलेला असून, "सिडको'ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली. |
तिहेरी अपघातात मार्डी रस्त्यावर २७ जखमी अमरावती, ता. १७ - राज्य परिवहन महामंडळाची बस, इंडिका आणि मालवाहू ट्रक यांच्यात
धडक होऊन झालेल्या तिहेरी अपघातात एकूण २७ जखमी झाले; पैकी चार जण गंभीर असल्याचे
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. |
शवविच्छेदनगृहाचे अखेर भूमिपूजन जळगाव जामोद (जि. बुलडाणा), ता. १७ - तालुक्यातील विविध संघटनांच्या उपस्थितीत
अखेर आज (ता. १७) गांधीगिरी पद्धतीने शवविच्छेनगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. |
चंद्रपुरात पट्टेदार वाघाची कातडी जप्त चंद्रपूर, ता. १७ - वाघांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोन टोळ्यांचा छडा एकाच
आठवड्यात लावण्यात यश आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आज (ता. १७) आणखी सकाळी
पट्टेदार वाघाची कातडी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या सिंदेवाही तालुक्यातील तिघांना
येथील बसस्थानक परिसरात अटक केली. |
तामसी येथे दोन गटांत संघर्ष वाशीम, ता. १७ - येथून जवळच असलेल्या तामसी येथे दोन गटांत झालेल्या क्षुल्लक
वादाचे पर्यवसान दगडफेक, जाळपोळीत होऊन अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले. |
"समाजकल्याण'ची तीन नवीन वसतिगृहे सुरू भंडारा, ता. १७ - जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या वतीने लाखनी, पवनी आणि लाखांदूर
येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन नवीन वसतिगृहे बांधण्यात आली असून २००८-०९ या
शैक्षणिक सत्रापासून सुरू होत आहे. |
|
|  |
|