|
|  |
 | वैद्यकीय व्यावसायिकांच्या बंदने रुग्णांचे हाल मालेगाव, १७ - येथील साठफुटी रस्त्यावरील बाफना हॉस्पिटलवरील हल्ल्याप्रकरणी डॉ.
राहुल बाफना यांनी रात्री उशिरा छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर छावणी
पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. |
बेकायदेशीर प्रवेशशुल्क घेतल्यास कारवाईचा इशारा नाशिक, ता. १७ - शालेय प्रवेशासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त
कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर शुल्क व निधी शाळा, महाविद्यालयांनी स्वीकारल्यास
छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे संबंधित प्राचार्यांविरुद्ध फौजदारी कारवाई
करण्याचा इशारा दिला आहे. |
मालेगावातील सव्वाचारशे अतिक्रमणे जमीनदोस्त मालेगाव, ता. १७ - शहरातील पूर्व पश्चिम विभागातील सर्वांत जास्त वर्दळीच्या व या
भागांचे प्रवेशद्वार असलेल्या किदवाई रोड तसेच कॅम्प रोड भागात आज महापालिकेतर्फे
अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. |
चांदवड, नांदगाव तालुक्यांत सुरळीत वीजपुरवठा करावा चांदवड, ता. १७ - चांदवड व नांदगाव तालुक्यांत सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी
चांदवड- नांदगाव तालुका पोल्ट्री फार्मर्स संघटनेने केली आहे. वीजपुरवठा त्वरित
सुरळीत न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. |
उन्हाच्या झळा पुन्हा वाढल्या नाशिक, ता. १७ - गेल्या दोन दिवसांत हवामानात बदल झाला असून, पावसाळ्याची चाहूल
लागल्याने आज तापमान न वाढताच शहर व परिसरात दमटपणाने सामान्यांना घामाच्या
धारांनी भिजविले. |
काळ्या-पिवळ्या वाहनांनीच व्यापला रस्ता पंचवटी, ता. १७ - नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवाराकडे जाणारी शेतमालाची
वाहने, सप्तशृंगगडाकडे जाणाऱ्या बस, दिंडोरी रोडने जाणाऱ्या रिक्षा, जीप, ट्रक,
टेम्पो, कार आदी वाहनांची दिंडोरी नाका परिसरात नेहमीच वर्दळ असते. |
पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन पंचवटी, ता. १७ - सिंहस्थानंतर प्रथमच पंचवटी परिसरातील अतिक्रमण आज महापालिकेच्या
अतिक्रमण विभागाने हटविले. |
|
|  |
|