|
|  |
 | उच्च शिक्षण क्षेत्र खुले करण्यास नकार - अर्जुनसिंह नवी दिल्ली, ता. १७ - उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जांना हमी देण्याचा विचार
केंद्र सरकार करीत आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुनसिंह
यांनी आज दिली. त्याचबरोबर उच्च शिक्षणाचे क्षेत्र खुले करण्यासही त्यांनी विरोध
दर्शविला. |
भारत-नेपाळ संबंधांवर परिणाम नाही काठमांडू, ता. १७ - भारत आणि नेपाळ यांच्यातील १९५० च्या कराराचा फेरआढावा
घेतल्यास उभय देशांतील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही; तसेच नव्या
समझोत्यानंतरही दोन्ही देशांमध्ये संबंध दृढ आणि विशेष असावेत, अशी आमची इच्छा
असल्याचे नेपाळमधील माओवादी नेते प्रचंड यांनी आज स्पष्ट केले. |
"सिमी'च्या कार्यकर्त्याला जयपूर स्फोटप्रकरणी अटक जयपूर, ता. १७ - जयपूरमध्ये मंगळवारी झालेल्या बॉंबस्फोटांमागे हात असल्याच्या
संशयावरून आज सकाळी "स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया'च्या (सिमी)
कार्यकर्त्यास पोलिसांनी अटक केली; तसेच राजस्थान पोलिसांनी आज आणखी तिघा
संशयितांची रेखाचित्रे जारी केली. |
उंदरांमुळे मिळणार मिझोरामला मदत कोलकता, ता. १७ - उंदीर म्हणजे उपद्रवी हे समीकरण नवे नाही; पण या उंदरांच्या
उपद्रवामुळे मिझोरामला अमेरिकेकडून तब्बल पन्नास हजार डॉलरची मदत मिळणार आहे! |
कॉंग्रेसचे सरकार अपयशी - अडवानी हैदराबाद, ता. १७ - कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर
अपयशी ठरले असून, सरकारने "आम आदमी'चा विश्वासघात केल्याची टीका लोकसभेतील विरोधी
पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांनी केली आहे. |
सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची आत्महत्या शिलॉंग, ता. १७ - सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आज गोळी झाडून घेऊन आज आत्महत्या
केली. राम किशन असे या जवानाचे नाव असून, बांगलादेश सीमेवर त्याची नियुक्ती
करण्यात आली होती. |
|
|  |
|