SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी मतदान पुर्ण
  • विजय तेंडुलकर यांची प्रकृती अत्यवस्थ  
  • राणी मुखर्जी गाणार "मार्गो'चे गुण !
  • महाराष्ट्रात राजकीय पर्याय निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभरातील समाजवादी कार्यकर्ते शनिवारी पुण्यात एकत्र आले होते. या वेळी एका निवांत क्षणी (डावीकडून) किशोर पवार, सुभाष वारे, मृणाल गोरे आणि भाई वैद्य.

    "हायटेक पुणे- महाराष्ट्र २००८' परिषद जूनमध्ये
    पुणे, ता. १७ - माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, ऍनिमेशन, गेमिंग आदी क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्याच्या उद्देशाने "पुणे व्यासपीठ' या संस्थेतर्फे पाचव्या "हायटेक पुणे- महाराष्ट्र २००८' या परिषदेचे येत्या १८ ते २० जूनदरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

    ठेवीदारांना येत्या जूनपर्यंतचे व्याज देण्याची परवानगी
    पुणे, ता. १७ - सुवर्ण सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांना येत्या जूनपर्यंतचे व्याज देण्याची परवानगी रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. येत्या मंगळवारपासून (ता. २०) बॅंकेच्या सर्व शाखांमधून हे व्याज देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बॅंकेचे प्रशासक डॉ. संजयकुमार भोसले यांनी कळविली आहे.

    एक ग्रॅमचा वजनकाटा बंधनकारक
    येरवडा, ता. १७ - वजन व मापे मानक नियम "२००६ (अ)'नुसार यापुढे व्हॅट व पाच लाखांच्या वर उलाढालीवरील कर भरणाऱ्या प्रत्येक दुकानदाराला कमीत कमी एक ग्रॅम वजनाचा इलेक्‍ट्रॉनिक वजनकाटा ठेवणे बंधनकारक असल्याचे वैध मापनशास्त्र पुणे विभागाचे उपनियंत्रक सी. जी. जाधव यांनी सांगितले.

    सामूहिक कारवाई
    नरवीर तानाजी मालुसरे पथ - रात्री उशिरापर्यंत आठ-दहा पोलिस एकत्र येऊन वाहनांची तपासणी व दंडाची कारवाई सुरू करतात. पोलिसांच्या सततच्या या नाकेबंदीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. (सकाळ छायाचित्रसेवा)

    "एमआयटी'चे विश्‍वस्त प्रा. विश्‍वनाथ कराड यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल
    चाकण, ता.१७ - केळगाव (ता. खेड) येथील एकाचे घर जेसीबी मशिनने पाडून नुकसान करून व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी प्रा. विश्‍वनाथ कराड, व्ही. एस. तांदळे, श्री. मिसाळ यांच्यासह तिघांवर आज रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी दिली.

    बारामतीच्या दोघांनी मिळवला "पिवळा दिवा'
    सोमेश्‍वरनगर, ता. १७ - देशभरात राजकीय ओळख असलेली बारामती आता प्रशासकीय अधिकाऱ्यांची बारामती म्हणूनही ओळखली जाणार आहे.

    बड्या कंपन्यांचा जाहिरातीचा नवा "फंडा'
    भवानीनगर ता. १७ - ग्रामीण भागातील वाढत्या बाजारपेठेने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, मोबाईल कंपन्या यांचे लक्ष येथील ग्राहकांकडे गेले आहे.

    भूसंपादनाचा वेग वाढविण्यासाठी प्रस्ताव
    पुणे, ता.१७ - पुणे शहरातील विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या जागा महापालिकेच्या ताब्यात येण्यासाठी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेला वेगाने निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी मांडला आहे.

    "बीआरटी' विरोधी घंटानाद आंदोलन
    पुणे, ता. १७ - वाढत्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला सातारा रस्ता बीआरटी मार्ग बंद करावा, या मागणीसाठी बीआरटी विरोधी नागरी कृती समितीच्या वतीने सातारा रस्त्यावरील विश्वेश्‍वर बॅंकेसमोरील चौकात आज घंटानाद आंदोलन करण्यात आले.

    येत्या शैक्षणिक वर्षापासून "एमआयटी'त पत्रकारिता अभ्यासक्रम
    पुणे, ता.१७ - माईर्स एमआयटीतर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून "माईर्स एमआयटी इंटरनॅशनल स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग ऍण्ड जर्नालिझम' अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती "एमआयटी'चे संचालक प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड व "एमआयटी'चे कार्यकारी संचालक राहुल कराड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

    साहसी पर्यटनात नको करमणूक अन्‌ गल्लेभरूगिरी - सुरेंद्र चव्हाण
    पुणे, ता. १७ - आर्थिक सुबत्तेमुळे साहसी पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. मात्र पर्यटनाला जाणारे करमणुकीचा दृष्टिकोन बाळगत आहेत, तर त्यांना नेणाऱ्यांची वृत्ती गल्लेभरूची आहे.

    आरक्षणाचा फायदा नको होता - सज्जनसिंह चव्हाण
    पुणे, ता. १७ - अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत स्थान मिळवायचे नाही, असे मनात ठरवूनच अभ्यास केला. त्यानुसार आयोगाच्या अव्वल गुणतक्‍त्यात स्थान मिळविले. मागासवर्गीय जातीतील मुले बुद्धिमत्तेत इतर विद्यार्थ्यांच्या मागे नसतात, हे मला दाखवून द्यायचं होतं...! हे उद्‌गार आहेत, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसऱ्या, तर देशात २९ व्या आलेल्या सज्जनसिंह चव्हाण यांचे.

    डॉ. टी. पद्मनाभन यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
    पुणे, ता. १७ - आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) मुख्य शैक्षणिक कार्यक्रमाचे अधिष्ठाता आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी. पद्मनाभन यांना अमेरिकेतील "ग्रॅव्हिटी रिसर्च फाउंडेशन'तर्फे, गुरुत्वाकर्षणासंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ५ हजार डॉलर, असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

    शिक्षणामध्ये मुलांचा विचार केला पाहिजे
    पुणे, ता. १७ - "करेल त्याला कळेल' या विषयावरील चर्चासत्राद्वारे "समतेसाठी गुणवत्ता' हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या "नवनिर्मिती' या अभिनव आत्मनिर्भर सामाजिक संस्थेच्या गुणवत्ता केंद्राचे उद्‌घाटन आज झाले.

    "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल'ला महिलांची उत्स्फूर्त गर्दी
    पुणे, ता. १७ - नामांकित कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण गृहोपयोगी वस्तूंच्या (होम अप्लायन्सेस) स्टॉल्सनी सजलेल्या "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल'ला आज महिलांनी मोठी गर्दी केली.

    फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन
    पुणे, ता. १७ - लॉ कॉलेज रस्त्यावरील "फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (एफटीआयआय) या संस्थेत सहा ठिकाणी ओला कचरा व्यवस्थापनासाठी गांडूळखत प्रकल्प राबविण्यात येत आहे.

    मोहित टाकळकर यांच्या नव्या नाटकाचा आज प्रयोग
    पुणे, ता. १७ - "आसक्त'निर्मित "बेड के नीचे रहनेवाली' या हिंदी नाटकाचा प्रयोग उद्या (रविवारी) संध्याकाळी साडेसहा वाजता नेहरू मेमोरिअल हॉल येथे होत आहे. मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक कुमारवयीन मुलांसाठी आहे.

    "बीएसएनएल' आणखी २० टॉवर उभारणार - चंद्र प्रकाश
    पुणे, ता. १७ - शहरातील मोबाईल दूरध्वनी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी भारत संचार निगम (बीएसएनएल)तर्फे लवकरच अजून वीस मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत.

    संगीत संयोजकांची कला आज रसिकांसमोर
    पुणे, ता. १७ - चित्रपटातील गीतांना सदाबहार चाली लावून त्यांना अजरामर करणारा संगीतकार अनेक काळ रसिकांच्या लक्षात राहतो; मात्र त्या गीतावर अनेक संस्कार करणारे संगीत संयोजक (ऍरेंजर) पडद्यामागेच दुर्लक्षित राहतात.

    "कॅंटोन्मेंट'साठी आज मतदान
    पुणे, ता. १७ - पुणे कॅंटोन्मेंट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून मतमोजणी उद्या रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून उद्या सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे.

    शिक्षणाचा दर्जा सुधारणे गरजेचे - देशमुख
    पुणे, ता. १७ - ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा सुधारणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांनी शनिवारी व्यक्त केले.

    जर्मनीतील महिला आरोग्याविषयी जागरूक - प्रा. हॅन्स टिनिबर्ग
    पिंपरी, ता. १७ - भारतीय महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोगाचे प्रमाण २३ टक्के; तर जर्मनीत ते केवळ पाच टक्के आहे.

    "भुदरगड'चे ठेवीदार याचिका दाखल करणार - बी. एफ. पिंटो
    पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवडमधील ठेवीदारांची रक्कम परत केल्याशिवाय भुदरगड आणि बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील विलीनीकरण अन्याय्य ठरेल.

    कुमठेकर रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा वर्धापनदिन
    पुणे, ता. १७ - विविध संघटनांतर्फे कुमठेकर रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा वर्धापनदिन उपरोधिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

    संरक्षित स्मारक करणे शक्‍य नाही; सरकारचा निर्णय
    पुणे, ता. १७ - महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरामध्ये सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची "भिडे वाडा' ही वास्तू "ऐतिहासिक जागा' म्हणून; तसेच "संरक्षित स्मारक' म्हणून जाहीर करणे राज्य सरकारला शक्‍य नसल्याचे कळविण्यात आले आहे.

    "पूना' विरोधाला उत्स्फूर्त प्रतिसाद
    पुणे, ता. १७ - "पूना' नावाला आक्षेप घेत पुण्यात भारतीय विद्यार्थी सेनेने केलेल्या आंदोलनाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सुमारे शंभर व्यापाऱ्यांनी फलकावर बदल केला आहे, असा दावा संघटनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला आहे.

    ...तरच समाजवादी चळवळीला संजीवनी मिळेल! - पुष्पा भावे
    पुणे, ता. १७ - जनतेशी संवाद साधून त्यांचा विश्‍वास संपादन केल्याशिवाय समाजवादी चळवळीला संजीवनी मिळणार नाही, असे मत ज्येष्ठ समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी आज येथे व्यक्त केले.

    भारतीय महिला जबाबदारी नाकारत नाहीत - शबाना आझमी
    पुणे, ता. १७ - ""युरोपसह इतर पाश्‍चात्त्य देशांत महिलांमध्ये मी, माझे हक्क याबद्दल चढाओढ आहे. भारतीय महिलांना मात्र हक्क हवे असले, तरी त्या जबाबदाऱ्या कधीच नाकारत नाहीत.

    मजुरांच्या कमतरतेने शेतकरी हैराण
    बारामती, ता. १७ - परिसरातील शेतकऱ्यांसमोर सध्या शेतमजुरांची समस्या असून, तिच्यावर नेमकी कशी मात करायची याबाबत संभ्रमावस्था आहे. परिसरातील कारखाने व बांधकामांमुळे मजुरांची समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

    सामाजिक सुरक्षितता सर्वांसाठी आवश्‍यक - लाकसवार
    पुणे, ता. १७ - ""पत्रकारांसह सर्वांनाच सामाजिक सुरक्षितता आवश्‍यक आहे. शोषणमुक्त होण्यासाठी कामगारांनी संघटित होणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन पुण्याचे कामगार उपायुक्त अनिल लाकसवार यांनी आज येथे केले.

    मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे - शिवाजीराव आढळराव
    आळेफाटा, ता. १७ - ""लाखो शिवसैनिकांच्या पाठिंब्याने व थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने खासदार होण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे पुण्य लाभले आहे. विरोधी पक्षात असूनही लढाऊवृत्ती व संघर्षाच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत,'' असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केले.

    प्रगती एक्‍स्प्रेस, सिंहगड आज रद्द
    पुणे, ता. १७ - बदलापूर ते वांगणी या दरम्यान दुरुस्तीचे काम सुरू असल्याने उद्या (रविवारी) काही गाड्या रद्द, तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी कळविले आहे.

    पदवीपूर्व काळातच विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना द्यावी
    पुणे, ता. १७ - परदेशात विद्यार्थ्यांना पदवीपूर्व काळात संशोधन करण्याची संधी मिळते. आपल्याकडे अशा विद्यार्थ्यांना संशोधनास वाव देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत "आयसर'चे संचालक डॉ. के. एन. गणेश यांनी व्यक्त केले.

    आतिष पिल्ले यांचे अपघाती निधन
    पिंपरी, ता. १७ - इमारतीच्या लोखंडी दारावर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात आकुर्डीतील उद्योजक आतिष शिवदास पिल्ले (वय २९) यांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी ही घटना घडली.

    वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे - रवींद्र मंकणी
    पुणे, ता. १७ - ""वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाल्यास शहरातील वाहतूक समस्या सुटेल,'' असा विश्‍वास ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांनी आज येथे व्यक्त केला.

    बारा बलुतेदार देशाचे पोशिंदे - सुधाकर गणगणे
    पुणे, ता. १७ - बारा बलुतेदार हे देशाचे पोशिंदे आहेत. त्यांना अंधारात, अज्ञानात ठेवले तर एक दिवस त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार सुधाकर गणगणे यांनी आज दिला.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600