|
|  |
 | लक्ष्य ऑलिंपिकचे - आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने शुक्रवारी दिलेल्या निकालामुळे ऑस्कर पिस्टोरियस या
अपंग धावपटूला ऑलिंपिकमध्ये सक्षम खेळाडूंबरोबर शर्यतीत भाग घेता येईल. |
कोलकता-चेन्नई आज आमनेसामने कोलकता, ता. १७ - इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आता प्रत्येक सामन्यागणिक उपांत्य फेरी
गाठण्यासाठी चुरस वाढत आहे. उद्या (रविवार) कोलकता नाईट रायडर्सविरुद्ध चेन्नई
सुपर किंग्ज सामना होणार आहे. |
सलग सहाव्या विजयाचा मुंबईचा निर्धार हैदराबाद, ता. १७ - "आयपीएल'मध्ये मुंबई इंडियन्सची उद्या (रविवारी) डेक्कन
चार्जर्सशी लढत होत आहे. या सामन्यात मुंबई सलग सहावा विजय नोंदविण्याच्या
निर्धाराने उतरणार आहे, तर डेक्कन चार्जर्स थोडी फार प्रतिष्ठा कमावण्यासाठी
घरच्या मैदानावर उतरणार आहे. |
मलेशियाला हरवून भारत अंतिम फेरीत इपोह, ता. १७ - आपली विजयी घोडदौड कायम ठेवत भारताने अझलन शाह हॉकी स्पर्धेची
अंतिम फेरी गाठली आहे. आज स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारताने यजमान
मलेशियावर मात केली. |
इंग्लडच्या बिनबाद ८९ धावा लंडन, ता. १७ - न्यूझीलंड विरुद्ध खेळताना इंग्लडने आज तिसऱ्या दिवशी आपल्या
पहिल्या डावात बिनबाद ८९ धावा केल्या होत्या. |
आयपीएलमध्ये आता उत्तेजक चाचणी होणार नवी दिल्ली, ता. १७ - इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंची
आजपासून "वाडा' जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीकडून उत्तेजक चाचणी घेण्यात येणार
आहे, अशी माहिती आयपीएलचे सर्वेसर्वा ललित मोदी यांनी दिली. |
रामनरेश सरवान विंडीजचा कर्णधार सेंट जॉन्स (अँटिग्वा), ता. १७ - जमैकामध्ये २२ ते २६ मे दरम्यान होणाऱ्या
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडीजच्या
कर्णधारपदी रामनरेश सरवानची नियुक्ती करण्यात आली आहे. |
प्रॅक्टिस, जयभवानीचा पुढील फेरीत प्रवेश कोल्हापूर, ता. १७ - ईएसपीएन महासंग्राम चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस
फुटबॉल क्लबने राजे संभाजी तरुण मंडळाचा टायब्रेकरवर ४-१ गोल फरकाने, तर जयभवानी
स्पोर्टस इन्स्टिट्यूटने पाटाकडील तालीम मंडळाचा (ब) २-०ने पराभव केला. |
नाथा गेंडने गजानन सोळंकीला अस्मान दाखविले पुणे, ता. १७ - नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया व साईराज प्रतिष्ठान आयोजित
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आज साठ किलो वजन गटात कोल्हापूरच्या नाथा गेंडने
अटीतटीच्या लढतीत अमरावतीच्या गजानन सोळंकीला निकाल डावावर अस्मान दाखविताना
उद्घाटनाचा दिवस गाजविला. |
|
|  |
|