"व्होडाफोन'चे सीईओ अरूण सरीन राजिनामा देणार
लंडन - "व्होडाफोन'ला अभूतपूर्व नफा मिळवून देणारे मुख्य कार्यकारी अधिकारी
अरूण सरीन राजिनामा देत असून त्यांच्या जागी व्हिट्टोरिओ कोलाओ यांची नियुक्ती
होणार आहे. "द टेलिग्राफ'ने हे वृत्त दिले आहे. जुलैमध्ये सरीन राजिनामा देतील.
सरीन यांच्या कारकीर्दीत व्होडाफोनने भारत आणि तुर्कस्थानात प्रवेश करून विक्रमी
कामगिरी केली. शिवाय, जपानमध्येही चांगले निकाल दिले. नव्या बाजारपेठांमध्ये जाऊन
तेथे यशस्वी होण्याचे तंत्र सरीन यांनी स्विकारले होते. आता, या बाजारपेठांमध्ये
सिंगापूर टेलिकम्युनिकेशन्स लिमिटेड आणि भारती समुहाशी टक्कर देण्याचे आव्हान
कोलाओ यांच्यासमोर असेल.
सरीन (वय ५३) भविष्यकाळात काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर
सल्लागाराचे काम पाहतील. |