SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

आभाळमाया - ऋतुराज पावसाळा
शायराला वेड लावणारा, मोराला धुंद-फुंद करणारा आणि ज्याच्या आगमनाची चाहूल लागताच सहस्रावधी सुगंधी कुप्या उधळून टाकणाऱ्या लाजऱ्याबुजऱ्या लतावेली माहेरवाशिणीसारख्या कुजबुजू लागतात, हसू-खेळू लागतात. असा ऋतुराज पावसाळा सुखद वाटतो.

गहिवरलेलं आकाश पाहिलं, की मला उगीचच उदासवाणं वाटतं. का कोण जाणे? पण त्याचवेळी मला वाटतं, देवाच्या देव्हाऱ्याला उजळून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्या झरझरणाऱ्या रेशमी धारांमध्ये आहे. आणि मग मनाचाही गाभारा उजळून जातो, पावसानंतरच्या स्वच्छ, शुभ्र, निरभ्र आकाशासारखा! मग निघतो पवित्र मांगल्याचा धूर, निघतात पवित्र प्रेमाचे सूर, दुमदुमून टाकतात सारा आसमंत... आणि मधूनच एखादा राग गावासा वाटतो, सतारीची तार छेडावी वाटते. बाहेर डोकावून बघावं तर निसर्ग बहुरूप्याचं सोंग घेऊन बसला आहे की काय असं वाटतं. गंध भारलेल्या पृथ्वीचे, तृप्तीचे सुस्कारे टाकून आपल्या अंगाखांद्यावर लडिवाळपणे लतावेलींना-वृक्षराजांना खेळताना पाहिलं की, नातवंडं अवतीभोवती घेऊन बसलेल्या आजीची आठवण येते. या वेळी खोडकरपणे आकाशाच्या कोपरातून हा खेळ बघणारं इंद्रधनुष्य अधिकच विलोभनीय-कमनीय दिसतं. हिरव्या पिकांतून डोंगरदऱ्या आणि भरगच्च वाहणाऱ्या नद्यांमधून हा वर्षाऋतू जीवनाचा नवा अर्थ सांगून जातो. व्यक्तिमत्त्व हसरं, प्रसन्न बनवितो. वर्षभर उराशी साठवलेली दुःखं वर्षाऋतूच्या आगमनानं सरीत्पावन होतात. वर्षाऋतूच्या हिरवेपणात जाई, जुई, पारिजातकाच्या राशींमध्ये स्वतःला हरवून बसावंसं वाटतं. काळ्याकुट्ट मेघांनी भरलेलं आकाश मला पाहवत नाही; पण या काळ्याकुट्ट नगाऱ्यावर सृष्टीसुंदरी दामिनीचे हात नाचू लागले, की मन मुग्ध होऊन जातं.

खरंच! पावसाचं दृश्‍य किती मनोवेधक. मला तर पावसात फिरायला खूप आवडतं. छत्री घेऊन पावसात फिरायला जायचं, निसर्गाचं हिरवं, ताजं, टवटवीत रूप बघायचं. पावसाचे थोडेसे थेंब अंगावर घ्यायचे. शाळेत जाणारी रेनकोट घातलेली मुलं किती सुंदर दिसतात! झाडाखाली, आडोशाला थांबलेल्या गायी-म्हशी, पाऊस थांबल्यावर उडणारे पक्ष्यांचे थवे, इंद्रधनुष्याचे तोरण. असा हा भिजलेला, हिरवा नटलेला निसर्ग मन मोहून टाकतो. जगावं तर या क्षणांसाठीच! असं होऊन जातं. वनराईनी नटलेला निसर्ग मन टवटवीत करतो. दिवस उत्साहात, आनंदात जातो. हा निसर्ग मन ताजंतवानं ठेवतो. कधीकधी वाटते या पावसाचा प्रत्येक थेंब व्हावं, तासनतास बघत बसावं पावसाचा खेळ. वाटतं आपल्या जीवनातील सगळा अंधार, दुःखं या पावसात विरघळून जावीत. नवा प्रकाश, नवी दिशा, नवी आशा यांनी जीवन उजळून जावं, गंधित व्हावं....

- डॉ. आरती दिनकर


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600