|
|  |
 | आमीरमामूंनी माझी ऑडिशन घेतली... अभिनेता आमीर खानचा भाचा या एका ओळखीमुळं नवोदित इम्रान खानबद्दल प्रेक्षकांच्या
अपेक्षा उंचावल्या आहेत. "जाने तू या जाने ना' या सिनेमाबद्दलची त्याची ही
निरीक्षणं.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
कनिष्ठ न्यायाधीशांची संख्या खटल्यांनुसार निश्चित करा; उच्च न्यायालय मुंबई, ता. ३ - मुंबईतील शहर दिवाणी न्यायालय व राज्यातील धनादेश न
वटण्यासंदर्भातील किती खटले न्यायालयांत सध्या प्रलंबित आहेत, नव्याने किती खटले
येण्याची शक्यता आहे, हे ध्यानात घेऊन तेथील न्यायाधीशांची संख्या निश्चित
करण्यात यावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केली. |
बेकायदा हुक्का पार्लरवर पालिका कारवाई करणार ंमुंबई, ता. ३ - शहरातील बेकायदा हुक्का पार्लर व नियमभंग करून हुक्का पुरविणारी
रेस्टॉरंट यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी हमी महापालिकेने आज उच्च
न्यायालयात दिली; तर हुक्का न पुरविण्याचे आश्वासन संबंधित हॉटेलने दिल्याने या
विषयावरील याचिका खंडपीठाने निकालात काढली. |
बॉयलरच्या स्फोटात सात कामगार जखमी भिवंडी, ता. ३ - येथील पद्मानगर भागातील कापड डाईंग कंपनीत झालेल्या बॉयलर स्फोटात
सात कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
कम्पोस्टिंग मशीन्सवरील व्हॅट कमी करा; "डिसेंट'ची मागणी मुंबई, ता. ३ - कचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या कम्पोस्टिंग मशीन्सवर
आकारण्यात येणारा भरमसाट "व्हॅट' कमी करून तो चार टक्क्यांवर आणण्याची मागणी
"डेव्हलपमेंटल ऍण्ड इको फ्रेंडली एन्टरप्रायझेस' (डिसेंट) या कम्पोस्टिंग मशीन्सचे
उत्पादक, व्यापारी, ग्राहक; तसेच चालक यांच्या संघटनेने केली आहे. सध्या या
मशीन्सची किंमत चार लाखांपासून सुरू होते. |
अकरावीची पहिली निवड यादी जाहीर मुंबई, ता. ३ - अकरावी प्रवेशाकरिता पहिली निवड यादी आज दुपारी ३ वाजता जाहीर
झाली. ही यादी पाहण्यासाठी महाविद्यालयांमध्ये आज विद्यार्थी-पालकांची झुंबड उडाली
होती. |
ठाण्यात अकरावी प्रवेश टक्केवारीनुसारच ठाणे, ता. ३ - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पर्सेंटाईलनुसार जरी
लावण्याचे आदेश असले, तरी ठाण्यात मात्र अनेक महाविद्यालयांत टक्केवारीनुसारच
याद्या लावण्यात आल्या आहेत. |
महापालिकेकडून शाहरूखला नोटीस मुंबई, ता. ३ - शाहरूख खान याचा "मन्नत' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला
आहे. निवासी जागेचा व्यावसायिक वापर केल्याने पालिकेने शाहरूख खानला कारणे दाखवा
नोटीस बजावली आहे. |
विश्व हिंदू परिषदेच्या बंदला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मुंबई, ता. ३ - अमरनाथ देवस्थान मंडळाला देण्यात आलेली जमीन जम्मू-काश्मीर
सरकारने परत घेतली असून ती जमीन देवस्थानला दिलीच पाहिजे, या मागणीसाठी विश्व
हिंदू परिषदेने पुकारलेल्या "भारत बंद'ला आज मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. |
अरुण गवळीच्या बालमित्राला अटक मुंबई, ता. ३ - प्रभादेवी येथील विकसकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात डॉन
आमदार अरुण गवळीच्या बालमित्राला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी अटक केली. |
बोरिवलीतील तिहेरी हत्याकांडाच्या आरोपीला फाशी? मुंबई, ता. ३ - मालकाने थोबाडीत मारली म्हणून त्याच्या दोन वर्षांच्या निष्पाप
मुलासह पत्नी व आठ वर्षांच्या मुलाची कोयत्याने हत्या केल्याच्या आरोपात आज सत्र
न्यायालयाने आरोपी रोहिदास यशवंत गांगुर्डेला (२२) दोषी ठरविले. |
दादर चौपाटीच्या कृत्रिम संवर्धनाला हरकत ंमुंबई, ता. ३ - गुजरातमधील पिवळ्या धम्मक सोन्यासारख्या चमकणाऱ्या वाळूचा कृत्रिम
किनारा तयार करण्याच्या पालिकेच्या साडेचार कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला
"केंद्रीय जलसंशोधन आणि अनुसंधान केंद्राने' (सीडब्ल्यूपीआरएस) हरकत घेतली आहे. |
पॅडीच्या विनोदाला स्वरांचेही कोंदण! मुंबई, ता. २ - विनोद हे त्याचं अंगभूत लक्षण. त्यामुळे तो समोर असला, की हास्याचे
तरंग उठणारच, तसे ते उठत असतानाच कुणीतरी गाण्याचा आग्रह केला आणि सुरू झाली "न
झटको जुल्फ से पानी' ही सिनेमातली गझल... |
उंदरांच्या पिंजऱ्यांची खरेदी रखडणार मुंबई, ता. ३ - उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने दहा हजार पिंजरे खरेदी करण्याचा
निर्णय घेतला असला, तरी पिंजरे खरेदीचा प्रस्तावच अद्याप स्थायी समितीत सादर
झालेला नाही, त्यामुळे ही खरेदी रखडल्याचे वृत्त आहे. |
महालक्ष्मी रेसकोर्सच्या इमारतीला भीषण आग मुंबई, ता. ३ - महालक्ष्मी रेसकोर्सच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर आज रात्री भीषण
आगी लागली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी
कोट्यवधींची वित्तहानी मात्र झाली. |
पोलिस नीरज ग्रोव्हरचा चेहरा बनविणार मुंबई, ता. ३ - देशभरात खळबळ माजविणाऱ्या "सिनर्जी ऍडलॅब्ज'चा क्रिएटिव्ह हेड नीरज
ग्रोव्हर याच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस त्याची
कवटी सुपरइम्पोज करून, त्याच्या चेहऱ्याची प्रतिकृती बनविणार असल्याची माहिती
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी "सकाळ'ला दिली. |
मुंबईतील मालाची आवक घटली मुंबई, ता. ३ - "ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस'ने पुकारलेल्या
मालवाहतूकदारांच्या राष्ट्रव्यापी बंदचा परिणाम आज दुसऱ्या दिवशी राज्यात दिसून
आला. |
|
|  |
|