|
|  |
 | विदर्भात "बंद'ला संमिश्र प्रतिसाद नागपूर, ता. ३ - अमरनाथ ट्रस्टला जमीन देण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारने
रद्द केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला
विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाला. |
मिठाई स्वस्त; दारू, सुपारी महाग नागपूर, ता. ३ - लॉनपासून तर मॉलपर्यंत अनेक बाबींना कराच्या कक्षेत आणत, स्थायी
समितीचे अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी आज ७८४ कोटी रुपयांचे बजेट सादर केले. |
शिक्षकांसाठी मान्सून ऑफर नागपूर, ता. ३ - पालिकेच्या ज्या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला तेथील
मुख्याध्यापकांना एक इन्क्रिमेंट, ज्या शिक्षकांच्या विषयाचा निकाल पूर्णतः लागला
त्यांना एक इन्क्रिमेंट अशी मान्सून ऑफर आज सभागृहाने एकमताने मंजूर केली.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांवर बक्षिसांची उधळण केली. |
बालिकेला चिरडल्याने खापरखेड्यात तणाव नागपूर, ता. ३ - शाळकरी विद्यार्थिनीला भरधाव टॅंकरने चिरडल्यामुळे संतप्त जमावाने
चालकाला खाली खेचून बेदम चोपले. टॅंकर पेटवून दिला तसेच तुफान दगडफेकही केली. |
मोती खातो फक्त भाजीपाला ! सावरगाव (जि. चंद्रपूर), ता. ३ - ब्रह्मपुरी येथील जिजराम केजाजी ठोमणे यांच्या
घरचा मोती नावाचा कुत्रा चक्क कच्च्या हिरव्या पालेभाज्या खातो. |
"मिहान' प्रकल्पग्रस्तांचे सोनियांना साकडे नवी दिल्ली, ता. ३ - नागपुरातील "मिहान' (मल्टिमॉडेल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ऍट
नागपूर) प्रकल्पग्रस्तांनी आज थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दरबारी
धाव घेतली. |
शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी संस्थेला लीजवर भिवापूर (जि.नागपूर), ता. ३ - धरणाच्या नावाखाली संपादित केलेल्या जमिनी मूळ
मालकांना वापरासाठी देण्याचा पायंडा मोडून, एका खासगी संस्थेला लीजवर देण्यात
आल्याने, खुर्सापार येथील शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. |
आठवण झाली की, थरकाप सुटतो चंद्रपूर, ता. २ - जिकडे-तिकडे "शेर आया-शेर आया' एकच कल्लोळ सुरू होता. त्याला
पाहण्यासाठी लगबगीने अंघोळ करून, भिंतीवरून डोकावून पाहू लागलो. |
नागपूरसाठी हज यात्रेचा कोटा वाढविण्याची मागणी नवी दिल्ली, ता. ३ - हज यात्रेकरूंच्या कोट्याबाबत नागपूरबरोबर भेदभाव केला जात
असल्याची तेथील मजलिस- ए- उलेमाच्या सदस्यांची तक्रार असून, नागपूरसाठी हज
यात्रेचा कोटा वाढवून तो एक हजार करावा, अशी मागणी त्यांनी आज कॉंग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांच्याकडे केली. |
राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या विडंबनाचा निषेध द्रुगधामना, ता. ३ - वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक
प्रार्थनेची विटंबना करणाऱ्या संत आसाराम बापू यांच्या "ऋषीप्रसाद' या मासिकाचा
सोमवारी (ता. ३०) गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी विचार मंच व इतर सामाजिक,
राजकीय संघटनांच्या वतीने दत्तवाडी चौकात निषेध करण्यात आला. |
|
|  |
|