SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • पिंपरीत चोरट्याने मंदिरातील चांदीचे दागिने पळविले
  • तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील महिलेचा मृत्यू
  • पीएमपीएलच्या बसची धडक बसून दुचाकीस्वार ठार
  • बालेवाडी - शिवछत्रपती क्रीडानगरीचे गुरुवारी संयोजन समितीकडे हस्तांतर करण्यात आले. त्या वेळी नव्याने उभारण्यात आलेल्या शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्य साधताना भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी.

    "सकाळ'च्या "करिअर प्लॅनिंग' पुस्तकाला उत्तम प्रतिसाद
    पुणे, ता. ३ - विविध क्षेत्रांतील "करिअर' संधींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच विद्यार्थ्यांनी "करिअर'चे नियोजन कसे करायचे, याची माहिती देणारे "करिअर प्लॅनिंग' हे पुस्तक "सकाळ'तर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

    पुण्यात अधिकारी संख्या वाढविणार
    पुणे, ता. - आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची (व्हीआयपी) पुण्यातील वाढती वर्दळ लक्षात घेऊन दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपल्या प्रतिक्रिया लिहा पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर

    एकाच वर्षात दहावी उत्तीर्ण आणि पदवीही प्राप्त!
    पुणे, ता. ३ - एकाच वर्षात दहावी उत्तीर्ण आणि कला शाखेची पदवी घेण्याची कामगिरी अशोक मच्छिंद्र साळवी याने केली आहे. सध्या तो बारावी; तसेच "एमबीए' आणि पदव्युत्तर पदवीच्याही दुसऱ्या वर्गात आहे.

    अमेरिकेतील शालेय विद्यार्थ्यांना "कचरा व्यवस्थापना'चे धडे
    पुणे, ता. ३ - मुलांनी शाळांमध्ये दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त धडे घ्यावेत, असे सांगून अमेरिकेतील शिक्षण व पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ थांबले नाहीत. त्यांनी त्यासाठी "कचरा निघाला शाळेत' असा कृतिकार्यक्रम आखला. तो काही शाळांमध्ये १९९१ मध्ये सुरू करण्यात आला.

    "राष्ट्रवादी'वर टीका करण्याचा अधिकार भाजपला आहे का? - अरुण गुजराथी
    पुणे, ता. ३ - संसदेत प्रश्‍न विचारण्यासाठी ज्या पक्षाचे खासदार पैसे घेतात, त्या भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केला.

    पाडळे पॅलेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी गुरुवारी मार्गदर्शन केले. या वेळी (डावीकडून) राजलक्ष्मी भोसले, जयदेव गायकवाड, रमेश शेंडगे, मदन बाफना, गुजराथी, कमल ढोले-पाटील, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार राजेश पाटील-वाठारकर.

    कोणत्याही परिस्थितीसाठी "राष्ट्रवादी' तयार - अरुण गुजराथी
    पुणे, ता. ३ - पुणे महापालिकेतील भाजप-सेनेबरोबर केलेली आघाडी ही सैद्धांतिक नसून, स्थानिक राजकारणाच्या अपरिहार्यतेतून स्वीकारलेला निर्णय आहे.

    जीवशास्त्राविषयीच्या संकेतस्थळाला गुगलचे पहिले "रेटिंग'
    पुणे, ता. ३ - जीवशास्त्रात जगभरात सुरू असणाऱ्या संशोधनापासून, ई-बुक्‍स, सायन्स व्हिडिओ, शिष्यवृत्ती; तसेच भारतात उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधीपर्यंत जीवशास्त्राविषयी इत्थंभूत माहिती पुरविणाऱ्या www.abhayjere.com या संकेतस्थळाला गुगलने पहिले "रेटिंग' दिले आहे.

    "विहिंप'च्या बंदला संमिश्र प्रतिसाद
    पुणे, ता.३ - अमरनाथ देवस्थानला शंभर एकर जमीन देण्याचा निर्णय रद्द केल्याच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषदेने पुकारलेल्या "भारत बंद'ला शहरात आज संमिश्र प्रतिसाद मिळाला.

    मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतून निधी नसल्याचा खुलासा - श्‍याम देशपांडे
    पुणे, ता. ३ - ""युवक कल्याणकारी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतून कोणताही निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला नाही,'' असा खुलासा आज स्थायी समितीचे अध्यक्ष श्‍याम देशपांडे यांनी केला.

    महापालिकांच्या कर पद्धतीत सुधारणा
    पुणे, ता. ३ - देशभरातील महापालिकांच्या मिळकत कर कायद्यात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारनेच आता पाऊल उचलले आहे.

    "ट्रॉमा केअर सेंटर' ससूनमध्ये उभारणार
    पुणे, ता. ३ - अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयात "ट्रॉमा केअर सेंटर' उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून ८० लाख रुपयांचा निधी मिळाला असून पुढील महिनाभरात रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत हे केंद्र सुरू होणार आहे.

    संशयावरून दोघांकडून एक किलो चरस जप्त
    पुणे, ता. ३ - दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने शिवाजीनगर बस स्थानकाबाहेर संशयावरून पकडलेल्या दोघांकडून एक किलो चरस जप्त केला. त्यांनी तो नेपाळहून आणल्याची माहिती मिळाली आहे.

    ऑलिंपिकच्या तयारीवर "डिस्कव्हरी'वर मालिका
    पुणे, ता. ३ - बीजिंगमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेची तयारी लाखो जण कशी करत आहेत, यावर एक विशेष मालिका डिस्कव्हरी वाहिनीने तयार केली आहे. "अल्टिमेट ऑलिम्पिक्‍स' या नावाने पाच भागांची मालिका १४ जुलैपासून रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे.

    भार्गव, दीक्षित यांच्यासाठी पुणेकरांचा कृतज्ञता सोहळा
    पुणे, ता. ३ - राज्यभरात नागरिकांना हैराण करणाऱ्या वीज भारनियमनामधून पुणेकरांची सुटका करण्याऱ्या "पुणे मॉडेल'च्या स्थापनेसाठी पुढाकार घेणारे "कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज' (सीआयआय)च्या राज्य शाखेचे अध्यक्ष प्रदीप भार्गव आणि प्रयास ऊर्जा गटाचे शंतनू दीक्षित यांचा येत्या रविवारी पुणेकरांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

    विधायक दिशा
    भावे शाळा - अहमदनगर शहरवासीय मित्रमंडळाच्या पुढाकाराने दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुरू होत असलेल्या "हिम्मत शाळे'चे उद्‌घाटन गुरुवारी झाले.

    "ऑनलाइन' बदल्यांमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
    पुणे, ता. ३ - कधी नव्हे ते यंदा प्रथमच कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकून प्रशासनाने बदल्यांबाबतीत इतिहास घडवला असला, तरी प्रशासनाच्या या निर्णयाने जिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी नाराज असल्याचे समजते.

    हिम्मत शाळा आजपासून सुरू
    पुणे, ता. ३ - शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आता हिम्मत शाळेच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातले एक नवे पर्व सुरू झाले. बरोबर १४३ वर्षांपूर्वी वासुदेव बळवंत फडके आणि सहकाऱ्यांनी पहिली हिम्मत शाळा सुरू केली, त्याला या घटनेने उजाळा मिळाला आहे.

    शेखसल्ला दर्गा परिसरात बांधकामांना परवानगी नको
    पुणे, ता. ३ - कसबा पेठ येथील धाकटा शेखसल्ला दर्गा शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक आहे.

    "जेएनएनयूआरएम' प्रकल्प ठेवी मोडण्याची पालिकेवर वेळ
    पिंपरी, ता. ३ - जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) प्रकल्पांच्या मूळ निविदांपेक्षा वाढीव खर्चामुळे "ठेवी' मोडण्याची वेळ पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आली आहे.

    माळेगावच्या विकासासाठी १५ कोटींचा निधी - बाळासाहेब तावरे
    माळेगाव, ता. ३ - ""माळेगाव परिसरात विविध वॉर्डांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते, बहुउद्देशीय सभागृह, भुयारी गटार, नवीन पाणीपुरवठा योजना आदी विकासकामांसाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांतून पंधरा कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, योग्य विनियोग व कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी संबंधित प्रशासन व ग्रामस्थांनी आवश्‍यक ती काळजी घेण्याची गरज आहे,'' अशी अपेक्षा माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केली.

    पिंपरीत "बंद'ला अल्प प्रतिसाद
    पिंपरी, ता. ३ - पीएमपीएमएलच्या दोन बसवर निगडी येथे झालेली दगडफेक वगळता, विश्‍व हिंदू परिषदेने पुकारलेल्या "बंद'ला पिंपरी-चिंचवडमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. दगडफेकप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

    "विश्‍वकल्याण'मध्ये शांतता
    पिंपरी, ता. ३ - स्वेच्छानिवृत्तीची रक्कम एकदम मिळावी, या कामगारांच्या मागणीमुळे वेतनवाढीच्या कराराची बोलणी काल फिसकटल्यानंतर बजाज ऑटो कंपनीतील वातावरण आज काहीसे गंभीर होते.

    हैदराबाद, नागपूरसाठी "जेट'ची थेट विमान सेवा
    नवी दिल्ली, ता. ३ - "जेट एअरवेज'तर्फे पंधरा जुलैपासून पुणे ते हैदराबाद, नागपूर आणि अहमदाबाद या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

    पालखी सोहळ्यात हरित ऊर्जा दिंडी
    जेजुरी, ता. ३ - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची समर्थ भारत हरित ऊर्जा दिंडी सहभागी झाली आहे.

    पाण्याच्या बादलीत पडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू
    पिंपरी, ता. ३ - येथील एका घरात खेळताना पाण्याने भरलेल्या बादलीत काल पडलेल्या एका दहा महिन्याच्या बालिकेचा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.

    श्रीक्षेत्र देहू पालखी सोहळ्याचे आज दुपारी प्रस्थान
    आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उद्या (बुधवारी) प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराज जन्मचतु:शताब्दी वर्ष यंदा संपूर्ण राज्यभर साजरे होत आहे.

    पालखी आगमनामुळे शहरातील वाहतूकव्यवस्थेत बदल
    संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा येत्या शुक्रवारी (ता.२७) पुणे शहरात दाखल होत असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पालखी मार्गावरील वाहतूकव्यवस्थेत बदल केला आहे.


    Yashashree
    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600