|
|  |
| इथं एकटेपणाला कसं सामोरं जाल? (प्रतिभा देशपांडे)
तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी अमेरिकेला जायची कशी परवानगी दिलीत?''
माझी दोन्ही मुलं इंजिनिअर होऊन एकाच वर्षी अमेरिकेला शिकायला गेली, त्या वेळी
जवळपास प्रत्येकाचं असंच मत होतं. ........ |
भावनिक स्थैर्य सांभाळा! (अंजली जोशी)
मुलं परदेशी गेल्यामुळे घरकुलात एकटं राहून भावनिक स्थित्यंतरं अनुभवणाऱ्या आई-
वडिलांची ही व्यथा आहे; पण ही व्यथा केवळ एका आई-वडिलांपुरतीच सीमित नाही, तर
प्रातिनिधित्वाचा व्यापक पदर त्यात मिसळलेला आहे. मुलं परदेशी शिकावयास जाण्याचं व
स्थायिक होण्याचं प्रमाण हल्ली इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे, की
मुलांशिवायची रिक्त घरकुलं हे सुशिक्षित मध्यमवर्गातील घराघरांत सर्रास आढळून
येणारं चित्र झालं आहे. ....... |
सामाजिक बांधिलकीतच खरं उत्तर (डॉ. उल्हास लुकतुके)
वृद्धत्व आल्यावर आपली मुलं जवळ असावीत, त्यांनी आपल्याकडे पाहावं, असं प्रत्येक
ज्येष्ठ नागरिकाला वाटतं; पण अलीकडे करिअरच्या जगभरातल्या नोकरी-व्यवसायाच्या
संधींमुळे मुलं आईवडिलांपासून दुरावतात. मुलं कधी घर छोटं पडतं म्हणून एकाच शहरात,
पण वेगळीकडे राहतात. आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरी, व्यवसाय करण्यासाठी परगावी,
परराज्यात किंवा परदेशात जातात. ....... |
का धरिला परदेस? (नीलिमा बोरवणकर)
आता कशाला तिच्या नावाचा धोशा लावतो आहेस? तिनं स्पष्ट कळवलंय ना, पुढच्या
वर्षीच्या ख्रिसमसशिवाय सुटी घेऊ शकत नाही असं?''
""म्हणजे अजून दीड वर्ष? फार होतं गं दीड वर्ष... हा हापूस माझ्या घशाखाली उतरत
नाही. बाकी कशाचा हट्ट कधी धरला नाही पोरीनं, पण आंबा बाजारात दिसायला लागताच,
भुणभुण सुरू व्हायची तिची, ""बाबा, आंबे कधी आणायचे?...'' ........ |
|
|  |
|