|
|  |
 | विश्वाशी जडावे अवघे मराठी विश्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत भरविण्याचा निर्णय झाल्यानंतर अवघ्या
महाराष्ट्रातील साहित्यविश्व ढवळून निघाले आहे. मतमतांतरांना उधाण आले आहे. या
पार्श्वभूमीवर संमेलन आयोजित करण्याची तयारी दर्शविणाऱ्या महाराष्ट्र मंडळ बे
एरियाची भूमिका मांडताहेत अध्यक्ष संदीप देवकुळे. ........ |
हे कृतघ्न होणे नाही काय? (अरुण जाखडे)
लाखो रसिक मराठी माणसांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संमेलनाला प्रतिष्ठा
दिली आहे. ती एका दिवसात वा एका पिढीत निर्माण झालेली नाही. लाखो मनांचा, त्यांनी
दिलेल्या योगदानाचा तो एकत्रित परिणाम आहे. अशी प्रतिष्ठा निर्माण करून देणाऱ्या
काही पिढ्यांतील रसिकांचा, वाचकांचा, साहित्यिकांचा, प्रकाशकांचा आणि मराठी मनाचा
अवमान करून, त्यांच्याकडून हे संमेलन हिसकावून घेऊन परदेशात नेणे, म्हणजे गेली
काही वर्षे राबविलेल्या या लोकांप्रमाणेच छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांशी कृतघ्न
होण्यासारखे नाही का? ....... |
इंटरनेटच्या विश्वात...पालक अंधारात! (सम्राट फडणीस)
इंटरनेटवर मुलं नेमकं काय करतात, हा पालकांच्या दृष्टीनं एकाच वेळी कुतूहलाचा आणि
काळजीचाही विषय. मुलांच्या इंटरनेट वापराबाबत पालक अंधारातच आहेत, असं नुकत्याच
झालेल्या जागतिक सर्वेक्षणातून उजेडात आलं आहे. इंटरनेटचा प्रभावी वापर होत
असलेल्या आठ देशांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणाचे अनेक निष्कर्ष प्रचलित समज मोडून
काढणारे आहेत. ........ |
वारी - सांस्कृतिक संचित (यशवंत पाठक)
समूहमनांचा जाणता भावगर्भ आविष्कार म्हणजे वारी. वारीची परंपरा आजही सुदृढ आहे. आज
तर याची फार गरज आहे. आज मोबाईलवरून वरवर बोलून समाज शुष्क आणि हॉटेली बनला आहे.
नाटकी बोलणे आणि देखल्या देवाला तात्पुरता दंडवत घालणे यात आजचा ई-मॅन् गुरफटलाय.
अशा वेळी मनातले मोकळेपणे सांगायला माउलींशिवाय कोण आहे? .......
वारीचा कॅनव्हास - पाहण्यासाठी इथे
क्लिक करा |
वाट चुकलेली दिशा (डॉ. अरुण गद्रे)
कुणाही व्यक्तीची कोणतीही वर्तणूक बदलायची असेल, तर त्या व्यक्तीस स्वत-ला तसं
वाटल्याशिवाय आणि तिनं तो निर्णय स्वत- घेतल्याशिवाय ती वर्तणूक कुणीही बदलू शकत
नाही. बाहेरील दबाव, धमक्या काहीही उपयोगी पडत नाहीत. वेश्या व्यवसायात असणाऱ्या
स्त्रियांबाबत हेच निरंतर सत्य लागू आहे. जोपर्यंत प्रत्येक स्त्री स्वत-हून
निर्णय घेत नाही, तोपर्यंत वेश्या व्यवसाय संपणार नाही. ....... |
सूर्यप्रकाशात न्हाः! (अपर्णा पाखमोडे)
सूर्यप्रकाश शरीराच्या त्वचेला घातक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि जो तो
त्यादृष्टीने स्वतःची काळजी घेत असतो. पण जीवनसत्त्व "ड' मिळण्यासाठी सूर्यप्रकाश
हा महत्त्वाचा स्रोत आहे, हेदेखील सगळ्यांना माहीत असणार. पण सूर्यप्रकाश आणि
हृदयविकार याचा महत्त्वाचा संबंध आहे, हे किती जणांना ठाऊक आहे? ही गोष्ट एका
नव्या संशोधनाद्वारे सिद्ध झाली आहे. ....... |
दोन शब्दांत एक संस्कृती! (खुशमितसिंग)
सॅनफ्रॅन्सिस्कोजवळच्या कार्नव्हिले नगरातील टुमदार बंगल्यात एक झोकदार वळण घेत
सरलष्करांनी आपली मोटार पार्क केली. ते मूडमध्ये होते, याचे कारणही तसेच खास होते.
"माझे जीवन- एक प्रवास' या त्यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाचे अमेरिकेतील अ. भा.
मराठी साहित्य संमेलनात कौतुक झाले होते; अन् सौंच्या "सातासमुद्रापलीकडील
कविता'च्या तर काही प्रती प्रदर्शनात विकल्याही गेल्या. ....... |
खरी संवेदनशीलता (मोनिका गजेंद्रगडकर)
पुढच्या वेळी आम्ही परत याच मैत्रिणीच्या प्राणिसंग्रहालयात जमलो तेव्हा एका
पोपटाची भर पडली होती; पण हा पोपट पंख नसलेला म्हणजे छाटलेला होता. कुणीतरी त्याचे
पंख कापून सोडून दिलेला होता. ........ |
गाणाऱ्या गावातील गाणारी माणसं (कलापिनी कोमकली)
पंडित कुमार गंधर्वांचं घर म्हणजे गाणाऱ्या माणसांचं गाणारं घर. त्या आसमंतातलं
लोकजीवन जणू स्वरांचाच श्वास घेणारं. शास्त्रीय संगीत व लोकसंगीताचे परस्परसंबंध
तपासणाऱ्या कुमार गंधर्वांची कन्या कलापिनी कोमकली तिच्या ऋणानुबंधाच्या
गाठींबद्दल सांगते आहे... ...... |
देवाणघेवाण सुसंस्कारांची (डॉ. श्रीकांत चोरघडे)
मुलांना फक्त घेणं माहिती असलं आणि देणं शिकवलेलं नसलं, तर बाहेरच्या जगात
गेल्यानंतर इतरांशी पटवून घेणं कठीण होतं. आपल्या वस्तू देणं, मदत करणं, दान करणं
या गोष्टींची मुलांना सवय असणं हा सुसंस्काराचा भाग आहे. ....... |
अहिंसेच्या अतिरेकी प्रभावातून संशोधन मुक्त व्हावे नोंदवही स्वातंत्र्यलढ्याची - अखेरचा लेखांक (आनंद हर्डीकर)
गेल्या वर्षी एप्रिलपासून सुरू झालेल्या या लेखमालेतील हा शेवटचा लेखांक.
राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित अक्षरशः हजारो मुद्द्यांपैकी केवळ काही
मुद्देच या लेखमालेच्या मर्यादेत स्पर्शिले जाऊ शकले. तथापि, प्रामुख्याने १८५७-५८
च्या महाविप्लवी घटनाक्रमाच्या निमित्ताने आपल्याच इतिहासाकडे किती वेगवेगळ्या
प्रकारे पाहता येते, जुन्या-नव्या आणि देशी-परदेशी साधनांचा ओझरता परिचय करून देता-
घेतानासुद्धा अभिनिवेश टाळून राष्ट्रीय दृष्टी कशी जपता येते, हे काही प्रमाणात
स्पष्ट करता आले. ...... |
कॉफीशॉप - "हान, होउंदे'! आपल्या समद्यांच्या आयची भाशा... म्हंजे मायमऱ्हाटी ह्या भाशेला सद्या फारच
उक्रूश्ट दिवस आल्येले हायेत. मऱ्हाटीच्या सक्सेसच्या यशाचे सनई-चौघडे, नगारे,
ढोल-ताशे, पिपान्या सगळीकडं दुमदुमून राह्यले हायेत. मराठीतल्या थोर्थोर लेखक
लोकांची, म्हंजे साहीत्य संमेलनाची जाहिर सभा अमेरिकेत सॅन होजे इथं लावन्यात
आल्याचं समद्या पेप्रांत डिक्लेअर करन्यात आलेलं हाये. ....... |
|
|  |
|