Lagnagaath
हस्तोपचार

(डॉ. सचिन तपस्वी)
मानेची हालचाल पूर्ववत करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट अनेक गोष्टींचा वापर करतात. त्यात मानेला सरळ रेषेत ताण देऊन सांधे मोकळे करणे; मागून मानेवर विशिष्ट ठिकाणी दाब देऊन आखडलेले स्नायू आणि सांधे मोकळे करणे; एका बाजूने किंवा एका साईडने प्रेशर देऊन आखडलेली मान सैल करणे अशा प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते. काही वेळा दुखऱ्या स्नायूंच्या विरुद्ध दिशेने दिलेला ताण किंवा वर्तुळाकार पद्धतीचा मसाज उपयोगी पडतो. यापैकी कोणती पद्धत वापरायची ते फिजिओथेरपिस्ट तपासणी केल्यावर स्वानुभवाने ठरवितात. .......
ट्रॅक्‍शन - ट्रॅक्‍शन म्हणजे ताण. हा हाताने किंवा मशिनच्या साहाय्याने दिला जातो. ज्यांना मणक्‍यांमधील डिस्कचा त्रास आहे, अशांना ट्रॅक्‍शनचा खूप चांगला फायदा होतो. खूप वेदना होत असतील तर सलग किंवा कंटिन्यूअस ट्रॅक्‍शन उपयोगी ठरते. मानदुखी दीर्घकाळातील असेल तर इंटरमिटंट ट्रॅक्‍शन वापरतात. ट्रॅक्‍शन देताना कमी वजनापासून सुरवात करून ते वाढवीत जातात.

मानेचे व्यायाम - मानदुखीवर मानेचे व्यायाम हा खरा योग्य रामबाण उपाय. मानेवरचा ताण देणे; मानेच्या गोलाकार हालचाली करणे; इत्यादी अनेक प्रकार यात मोडतात.
मानेच्या हालचालींमध्ये वेगवेगळ्या दिशांनी मानेची सुयोग्य हालचाल करणे अपेक्षित असते. पैकी मान मागे टाकून ताणणे धोकादायक असल्याने टाळणे योग्य.

प्रोफेशन आणि मानदुखी - सतत मान खाली वाकवून ऑफिसमध्ये टेबलावर काम करणारे, कॉम्प्युटर आणि की बोर्डवर सतत काम करणारे लोक यांच्या प्रोफेशनमध्ये मानेच्या स्नायूंचा इंड्यूरन्स कमी होत जातो, आतील स्नायूंची शक्ती कमी होते आणि जवळचे मदतनीस स्नायू थकून जातात. म्हणून या प्रोफेशनल्सना मानदुखीचा त्रास होतो.शारीरिक ताणाबरोबर येणारा प्रचंड मानसिक ताण मान आणि डोकेदुखीला निमंत्रण देतो. अशा लोकांनी स्ट्रेस म्हणजे ताण घालविण्यासाठी योगासने, प्राणायाम, मसाज, मेडिटेशन आणि इतर तणावमुक्तीच्या साधनांचा योग्य वापर करणे उचित ठरते.

- डॉ. सचिन तपस्वी


SapSakal