Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

महापौर निवडणुकीबाबत अजित पवार आज पिंपरीत
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 26, 2009 AT 12:00 AM (IST)

पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी पक्षाचे नेते ऊर्जामंत्री अजित पवार गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरात येत असून, महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या हालचालींना बुधवारी वेग आला. कार्यकर्त्यांचा मेळावा व नगरसेवकांच्या बैठकीत आपल्या नावाला पाठिंबा मिळावा, यासाठी इच्छुकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

येत्या एक डिसेंबर रोजी महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी योगेश बहल, महेश लांडगे, प्रशांत शितोळे, दत्तात्रेय साने, विठ्ठल ऊर्फ नाना काटे, रामआधार धारिया, एकनाथ मोटे, सिद्धेश्‍वर बारणे या आठ जणांनी, तर उपमहापौरपदासाठी गणेश भोंडवे, काळुराम पवार, हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी, शांता आल्हाट, प्रभाकर वाघेरे आणि सुजाता नांदगुडे या सहा जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते जगदीश शेट्टी यांच्याकडे इच्छुकांनी अर्ज दिले आहेत.

आमदार विलास लांडे यांचे समर्थक लांडगे आणि साने, आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक शितोळे आणि काटे; तसेच बहल हे पाच जण महापौरपदासाठी प्रमुख इच्छुक आहेत. या पाचही जणांनी गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापौरपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्या हालचाली वाढल्या. श्री. पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नगरसेवकांची बैठक होणार असल्याचे जाहीर झाल्याने इच्छुकांच्या हालचालींनी वेग घेतला. लांडगे यांच्यासाठी आमदार लांडेसमर्थक नगरसेवकांनी मंगळवारी बैठक घेऊन लांडगे यांच्या उमेदवारीसाठी पवार यांना निवेदन देण्याची तयारी केली. मात्र, या मुद्द्यावरून बैठकीत साने यांचा नगरसेवकांशी वाद झाला. त्यामुळे उमेदवारीसाठी ते आक्रमक झाले आहेत.

त्यानंतर आमदार जगताप यांच्या समर्थकांनी शितोळे यांच्या नावासाठी बुधवारी बैठक घेतली. श्री. जगताप यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस शितोळे, विठ्ठल काटे, खंडू कोकणे, राजेंद्र राजापुरे, कैलास थोपटे, शंकर जगताप आदी दहा ते बारा नगरसेवक उपस्थित होते. या सर्वांनी शितोळे किंवा काटे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी जगताप यांच्याकडे केली.

दुसरीकडे बहल यांनी नगरसेवकांशी संपर्क मोहीम सुरू केली. प्रत्येक नगरसेवकाची प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठिंब्याची विनंती केली. आमदार जगताप आणि अण्णा बनसोडे यांच्याशीही संपर्क साधून उमेदवारीसाठी त्यांनी विनंती केली. पक्षनेते शेट्टी यांनी बहल यांच्या नावाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून, समर्थक नगरसेवकांनी श्री. पवार यांच्याकडे त्यांच्या नावाचा आग्रह धरण्याचे ठरविले आहे.

बंडखोरांच्या प्रचाराचा मुद्दा
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पदे दिली जातील, असे श्री. अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघातून बंडखोरी करून उभे राहिलेले विलास लांडे यांचे काम केल्याचा मुद्दा बहलसमर्थकांनी लावून धरला; तसेच दोन वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक आहे. या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी कोणाला दिली जाते, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. कार्यकर्ते आणि नगरसेवकांची मते जाणून घेतली जातील. मात्र, उमेदवाराचे नाव आपणच निश्‍चित करू, असे श्री. पवार यांनी नुकत्याच झालेल्या िंपपंरी-चिंचवड भेटीत स्पष्ट केले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष गुरुवारच्या मेळाव्याकडे लागले आहे. शहराचे निरीक्षक रमेश शेंडगे आणि शहराध्यक्ष पानसरे यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता रहाटणीतील हॉटेल विमल गार्डन येथे मेळावा होईल.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 30/11/2010 02:25 PM kishor Hatagale said:
पतित पावन संघटन
On 30/11/2010 02:24 PM kishor Hatagale said:
पतित पावन संघटन
On 9/1/2010 5:18 PM Pimpri Palika said:
koni hi zale tari he rashtravadi vale palike la orbadanarch. kaho phark padat nahi
On 8/28/2010 12:24 AM Ashok said:
नाना वगैरे कोणी नाही यावेळी शेवंता ताई महापौर होणार.दादांचा त्यांनाच पाठिबा आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांचे सामाजिक कार्य फार मोठे आहे.येऊन येऊन येनार कोण शेवंता शिवाय हायेच कोण.
On 2/18/2010 12:09 PM mahendra said:
ह्या शहराला हुशार व्यक्ती आणि शहराचा विकासाची गरज आहे हा विकास पक्षाला बरोबर नेणारा उमेदवारच देवू शकतो. योगेश बहल
On 12/1/2009 5:34 PM Vishal said:
As per my opinion in PCMC no Corporator is Efficient for any of the Post.
On 11/29/2009 2:26 PM prasad said:
फक्त दादा chhhhhhhhhhhhhhhhhhhh
On 11/28/2009 10:25 AM Hemant said:
wait & watch on Kingmaker AJITDADA PAWAR
On 11/28/2009 4:20 AM RAHUL said:
श्रीरंग बारणे हेच सर्वात योग्य उमेदवार आहेत महापौर पदासाठी.
On 11/27/2009 5:02 PM santosh patil said:
अरे सगळे गप्प बसा .......... भाऊच्या मर्जीशिवाय कोण होईल का महापौर !!!! होणार तर फक्त नाना म्हणजे नाना काटे च नादच करायचा नाय !!! एकच नाव नाना आणि नानाच.............
On 11/26/2009 8:56 PM swaty thakar said:
आता एक से एक खिंडीत गाठणारे भेटतील . कुणी पराभूत निष्ठावंत म्हणून म्हाडा चे अध्यक्षपद मागेल तर कुणी आणखी कुठल्या तरी दुसर्या महामंडळाचे. आता जे पेरले आहे तेच उगवणार आहे .भोगा आपल्या कर्माची फळे !
On 11/26/2009 8:48 PM Pankaj said:
ऐ सन्नी तुला नीट मराठी तरी type करता येते का ? आधी स्वतः मराठी शिक मग इतरांना शिकव
On 11/26/2009 8:43 PM Pankaj said:
एकच वादा महेश दादा
On 11/26/2009 7:30 PM Rakesh kadam said:
श्रीरंग बारणे हेच सर्वात योग्य उमेदवार आहेत महापौर पदासाठी.
On 26/11/2009 19:19 sunny said:
ओन्ली योगश...... कोण महेश दादा ... तेला नित मराठी तरी येते का ... !!!! अस्शिक्षित ....!!! we need a perfect person like YOGESH Bhel n not any dada pada ........ let him learn the atticate sfirst n then be th MAYOR ... YOGESH BEHL ZiNDABAD
On 11/26/2009 6:41 PM avinash said:
mahesh mahesh mahesh only maheshhhhhhhhhhhhhhhhhhhhhh
On 11/26/2009 6:23 PM prashant said:
ह्या शहराला हुशार व्यक्ती आणि शहराचा विकासाची गरज आहे हा विकास पक्षाला बरोबर नेणारा उमेदवारच देवू शकतो. योगेश बहल
On 11/26/2009 6:22 PM prashant said:
ह्या शहराला हुशार व्यक्ती आणि शहराचा विकासाची गरज आहे हा विकास पक्षाला बरोबर नेणारा उमेदवारच देवू शकतो. योगेश बहल
On 11/26/2009 3:38 PM sunil said:
एकच वादा महेश दादा ओन्ली महेश दादा कोण कुटला योगेश............! नाद करायचा नाय....!
On 11/26/2009 3:19 PM sunil said:
एकच वादा महेश दादा ओन्ली महेश दादा कोण कुटला योगेश............! नाद करायचा नाय....!
On 11/26/2009 3:09 PM swaty thakar said:
आता पुन्हा आखाडा कुस्ती किंवा सही मोहीम रणधुमाळी !रस्त्यारस्त्यावर घोषणाबाजी हाणामार्या आणि जाळ पोळी !!नगरसेवकांना कसलं विचारताय ! जनतेला विचारा.पक्ष मोठा कि बंडखोर ! जनता आणि पालिकेचे हित महत्वाचे.अन्यथा ही शेवटची संधी असेल .
On 11/26/2009 2:53 PM umesh said:
mahesh landge ओन्ली
On 11/26/2009 2:52 PM vishal said:
महेश लांडगे हेच
On 11/26/2009 2:48 PM Akshay said:
Mahesh लांडगे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: