Update: 
      वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font

साईना नेहवाल उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था
Saturday, December 05, 2009 AT 12:00 AM (IST)

जोहर बाहरू (मलेशिया) - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने वर्ल्ड सुपर सीरिज मास्टर्स फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या "अ' गटातून उपांत्य फेरी गाठली. तिने थायलंडच्या पोर्नटीप बुराणाप्रासरत्सुक हिच्यावर 21-13, 21-19 अशी मात केली.

जागतिक क्रमवारीत साईना आठव्या, तर पोर्नटीप 37 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी साईनाने तैवान स्पर्धेत पोर्नटीपवर मात केली होती. मात्र त्या लढतीत पोर्नटीपने साईनाला तीन सेटपर्यंत झुंजविले होते. त्यातच उपांत्य फेरी गाठण्यासाठी साईनाला आज विजय आवश्‍यक होता. त्यामुळे साहजिकच साईनावर दडपण होते. पहिल्या गेममध्ये सुरवातीला दोघींत चुरस होती. 3-3 अशी बरोबरी असताना साईनाने सलग तीन गुण घेत आघाडी मिळविली. त्यानंतर साईनाने पोर्नटीपला फारशी संधी न देता पहिल्या गेममध्ये बाजी मारली. साईनाचे स्मॅशेस अचूक होते. तसेच नेटजवळही तिने चांगला खेळ केला.

दुसऱ्या गेममध्ये पोर्नटीपने खेळ उंचावला. त्यामुळे सुरवातीपासूनच दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस होती. 15-16 अशी पिछाडीवर असताना साईनाने सलग तीन गुण घेत आघाडी मिळविली. त्यानंतर पाहता पाहता साईनाने तीन "मॅच पॉइंट' मिळविले होते. कडवी झुंज देत पोर्नटीपने दोन "मॅच पॉइंट' वाचविले. मात्र तिसरा "मॅच पॉइंट' सत्कारणी लावत साईनाने उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ही लढत 33 मिनिटे चालली. या स्पर्धेत अनुकूल "ड्रॉ' मिळाला असतानाही साईनाची सुरवात निराशाजनक झाली होती. तिला पहिल्या साखळी लढतीत मलेशियाच्या वॉंग म्यू चू हिने पराभूत केले होते. मात्र, दुसऱ्या लढतीत साईनाने कॅनडाच्या चार्मेन रीडवर मात केली होती.

मिश्र दुहेरीत व्ही. दीजू आणि ज्वाला गुट्टा यांनी दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी सॉंगफोन अनुग्रिटायावोन आणि कुंचला व्होराविचिटचाइकुल (थायलंड) यांच्यावर 21-12, 21-8 असा वीस मिनिटांत विजय नोंदविला. दीजू-ज्वाला यांनी काल हेंद्रा अप्रिदा गुणावान आणि व्हिटा मॅरीस्सा (इंडोनेशिया) यांच्यावर मात केली होती.
प्रतिक्रिया
On 12/5/2009 2:59 AM साईना को ठोकना है said:
साईना तू फक्त थायलंडच्या पोर्नटीप बुराणाप्रासरत्सुक हिच्यावर मात नाही केलीस माझ्या वरही मात केली आहेस... हाय येह दिल तुझपे फिदा हो गया.... sssssssss.... काय दिसते यार... love you darling
On 04/12/2009 17:27 sada punekar said:
छान छान !! क्रिकेट व्यतिरिक्त काहीतरी चांगली बातमी आली.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: