Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गंमत, मनोरंजन म्हणून भविष्य पाहा - शरद उपाध्ये
सकाळ वृत्तसेवा
Saturday, December 05, 2009 AT 11:45 PM (IST)

सांगली - भीती वाटते, असुरक्षित वाटते, हे विचारायला ज्यांच्याकडे आपण जातो तो माणूस तरी सुरक्षित असतो का? राशी भविष्य वाचून काहीही साध्य होत नाही.
 
गंमत व मनोरंजन म्हणून भविष्य पाहा, कारण या क्षेत्राचे निष्कर्ष स्थिर नाहीत, असे प्रतिपादन "राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांनी केले. भावे नाट्यमंदिरात जहांगीर हॉस्पिटलच्या (पुणे) वतीने आयोजित "व्याधीचक्र' कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, ""मेष राशीच्या माणसाचा संबंध थेट मस्तकाशी येतो. त्याने डोके सांभाळले पाहिजे. मिथुन राशींची माणसे कधी, कुठे, काय बोलतील हे सांगता येत नाही.''
श्री. उपाध्ये यांनी "व्याधीचक्र' कार्यक्रमात बारा राशींच्या माणसांचे स्वभाव गुणधर्म व त्यांचा शरीरातील अवयवांशी असणारा योगायोग विनोदी प्रसंग व किस्से सांगून श्रोत्यांना खळखळून हसवले. भविष्याकडे मनोरंजन म्हणून पाहा, असे आवाहन त्यांनी केले.

जहांगीर हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरास जिल्ह्यातील रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश यांनी शिबिराचे उद्‌घाटन केले. अप्पर जिल्हाधिकारी डी. एस. पाटील उपस्थित होते.

जहांगीर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी हृदयविकार, मेंदूचे विकार, पाठदुखी, मणक्‍याचे विकार व अर्धांगवायूच्या विकारांची तपासणी करून सल्ला मार्गदर्शन केले. दिवसभरात 600 स्त्री-पुरुषांनी लाभ घेतला. डॉ. अमोल रेघे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. अजित मेहता यांनी तपासणी व मार्गदर्शन केले. जहांगीर हॉस्पिटलचे उपसरव्यवस्थापक साईनाथ प्रधान यांनी संयोजन केले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: