Update: 
      वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीवर गिल समाधानी
पीटीआय
Tuesday, December 08, 2009 AT 12:00 AM (IST)

नवी दिल्ली - पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीबाबत केंद्रीय क्रीडामंत्री एम. एस. गिल यांनी समाधान व्यक्त केले असून, "या स्पर्धेची स्टेडियम तयार झाली की ती बघून बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेची आठवण होईल, इतकी ही स्टेडियम भव्य दिव्य असतील,' असे त्यांनी म्हटले आहे.

गिल यांनी सोमवारी इंदिरा गांधी इनडोअर संकुलाची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी आणि वर्षभर स्टेडियमच्या पूर्ततेसाठी काम करणाऱ्या अभियंत्यांशी चर्चा केली. इंदिरा गांधी इनडोअर संकुलात जिम्नॅस्टिक, सायकलिंग, कुस्ती खेळाच्या मैदानांचा समावेश आहे. जिम्नॅस्टिक आणि सायकलिंग वेलोड्रमची पाहणी केल्यानंतर गिल यांनी तयारीच्या वेगाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ""इंदिरा गांधी इनडोअर संकुलच इतके भव्य दिव्य आहे, की दर्जा आणि तांत्रिकदृष्ट्या ती क्रीडाजगतात सर्वोत्तम ठरतील. ही स्टेडियम उभी करण्यासाठी क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर अभियंते गेले वर्षभर प्रामाणिक कष्ट घेत आहेत, त्याला दाद द्यायलाच हवी.'' या संकुलाबरोबर गिल यांनी अन्य खेळांची मैदानेही वेळेवर पूर्ण होतील याबाबत विश्‍वास व्यक्त केला.

असे असेल इंदिरा गांधी इनडोअर संकुल
-एकूण जागा ः 80 एकर
-उभारण्याचा खर्च ः 675 कोटी रुपये
-जिम्नॅस्टिक, सायकलिंग, कुस्ती खेळाची मैदाने
-जिम्नॅस्टिकची क्षमता ः 16,000
-कुस्ती ः 7,500
-सायकलिंग ः 3,800
-अपेक्षित पूर्तता ः मार्च 2010


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: