Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

बाबरीप्रश्‍नी शिवसेना लोकसभेत आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 09, 2009 AT 12:15 AM (IST)

नवी दिल्ली - "1942 च्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही रामजन्मभूमी आंदोलन अधिक उग्र होते आणि त्याचे नेतृत्व शिवसेनेने केले याचा अभिमान वाटतो', असे प्रतिपादन शिवसेनेचे गटनेते अनंत गिते यांनी मंगळवारी लोकसभेत व्यक्‍त केला. साऱ्या देशात बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढे येऊन शिवसैनिकांनी हे काम केले असेल, तर त्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली होती, याची आठवण करून देत या आंदोलनाचे श्रेय केवळ भाजपला जाऊ नये, याची खबरदारीही शिवसेनेने घेतली.

लिबरहान आयोगावरील चर्चा शेवटच्या टप्प्यात असताना ती तापण्यास गिते यांच्या भाषणापासूनच सुरवात झाली. "लिबरहान आयोगाच्या अहवालामध्ये बाबरी मशीद पाडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे अयोध्येत होते', असे म्हटल्यावर आक्षेप घेऊन लिबरहान यांनी तरी हा अहवाल वाचला आहे का, अशी पृच्छा केली.

शिवसेनेला चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या दृष्टीने केलेल्या या भाषणाने सभागृहातील वातावरण बिघडू लागल्याने लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी गिते यांना संवेदनशील विषयावर बोलताना शब्द जपून वापरण्याची सक्‍त ताकीदच दिली. "बाबरी मशीद पाडणे हे काही चुकीचे पाऊल नव्हते. वादग्रस्त वास्तू पडल्याचा शोक देशाने 17 वर्षे करण्याची काय आवश्‍यकता आहे', असा सवाल करून गिते यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. त्यांच्या या वक्‍तव्यावर सभागृहात कमालीचा गोंधळ झाला. बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांमुळे असुरक्षित वाटणे धोकादायक असल्याचे वक्‍तव्य करून ते म्हणाले, "भारतातील संसदेत आहात म्हणून अल्पसंख्याकांना अशा प्रकारे वागता येते. मात्र, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना अशा प्रकारची मोकळीक नाही.' यावर जम्मू - काश्‍मीरमधील खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावर काश्‍मीरमधून साडेतीन लाख हिंदूंना स्थलांतर का करावे लागले, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

गिते हिंदीतून भाषण करायला लागल्यावर "हिंदीतून बोलाल तर महाराष्ट्रात राज ठाकरे तुम्हाला जाब विचारतील, मुंबईत मारलेले बिहारी हिंदू नव्हते का', अशा प्रकारची शेरेबाजी सत्ताधाऱ्यांनी केली. गिते जाणीवपूर्वक वातावरण तापविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे लक्षात आल्यावर गृहमंत्री पी. चिदंबरम हेदेखील अस्वस्थ झाले होते
प्रतिक्रिया
On 14/09/2011 06:13 PM Prasadsingh Dalavi said:
बाबरीच्या खूप दशक आधीपासून हिंदुना काश्मीर मधून कापून काढण्यात आले त्यावेळी कुठे गहन ठेवला होता तुमचा सर्व धर्म समभाव?
On 26/07/2011 03:07 PM aashish said:
मस्त रे .............लगे रहो...........मी मराठी............
On 26/05/2011 09:09 AM sagar said:
वेल done अनंत गीते साहेब . आम्ही तुमच्या सोबत आहोत...
On 9/17/2010 3:19 PM Dev said:
अनंत गीतेना वाघाची पदवी द्यावी असे वाटते. जय महाराष्ट्र....!!!
On 7/21/2010 9:39 AM dev said:
'' Gurv se Kaho Hum Hindu Hai '' One Day we all make pakistan become Hindu country... Jay Hind..jay Maharashtra..Jay Shisena..
On 6/24/2010 12:37 PM Amol kambale said:
coin has two sides that every muslim is not terrorist, but most muslim involved in terrorist activites. this, is fact. But, i am afraid that if this continue, then my hindu brothers will take revenge of that which affects countrys development. jay hind
On 6/5/2010 10:44 AM vishal bhosale said:
वेल done अनंत गीते साहेब . आम्ही तुमच्या सोबत आहोत... आगे बढो. हिंदू भूमी ला जर वाचवायचे असेल तर हा हिंदुत्वाचा बाणा कायम ठेवा. सगळे हिंदू एक न एक दिन तुमच्या मागे जरूर येतील.
On 6/3/2010 8:13 AM Hemant said:
Marathi, Hindi aani English ha vishyach nahi, aapale mat dusrya paryant jane te mahatvache. Yethe Nahi Maharashtra and Marathi Phakat Hindu aani Pkat Hindu, Je Babarane kele te pap aani je congress ne kele te pap.
On 5/4/2010 12:56 PM Dhananjay said:
वेल डन गीते साहेब.
On 4/17/2010 9:00 AM vijay magar said:
Good anant gite sahab
On 3/26/2010 11:10 PM Ranchodas said:
अधून मधून शिवसेने ला अशी जाग येते. मुंबई मध्ये आता महापालिका निवडणुका आल्या आहेत त्याची हि पूर्व तयारी आहे. कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप हे सगळे पक्ष सारखेच आहेत. मतपेढी चा राजकारण एवढाच त्याचा आर्थ आहे. नंतर परत सगळे All is Well म्हणून सगळे गायब होतील - पुढच्या निवडणुकी पर्यंत.
On 3/23/2010 9:55 AM Ramnath said:
मंदिर किंवा मस्जीत पाडणे पाप आहे. पण शेकडो वरश्या पूर्वी बाबराने मंदिर पडून मस्जीत बांधली. ते सुद्धा पापच होते. कारसेवकांनी मस्जीत पाडून ते पाप धुतले आणि हिंदू जनतेला न्याय मिळवून दिला. कॉंग्रेसने पुन्हा बाबरासारखे पाप करू नये आणि राम मंदिर बनू द्यावे. जय हिंद जय महाराष्ट्र
On 3/14/2010 3:28 PM KK said:
गीते साहेब पहिल्यांदा महाराष्ट्रातील शिवसेनेचे झालेले पानिपत दूर करा आणि मगच बाकीच्या विषयात हात घाला ? आता संसदेत का नाही बोलत मराठीत तिथे हिंदी चलते ,उगाच उत्तर भारतीयाचा विरोध करायचा ? कशाला लोकांची दिशाबुल करता ? या सर्व गोष्ठी पेक्षा विकास च्या गोष्ठी करा मंजे काय तरी शिवसेनाला फायदा होयील ?
On 2/14/2010 7:58 PM SATISH PATIL said:
वा वा निलेश राउत म्हणजे तुझ्यात आणि झीझी या लादणार्या मुघालांमध्ये फरक काय राहिला . मला वाटत आहे आपली लोकशाही ६० एक वर्षाची बालाव्स्थेत आहे संपृक्त होण्यास अजून १०० वर्षे लागतील तोपर्यंत असेच चालायचे . आपला देश पाकिस्तान चालवतो कि काय असे वाटण्याची वेळ आहे . साधी गोष्ट आहे कायदे कानून पाशिमात्या देशांसारखे पाला आणि अल इझ्झ वेल प्रक्षोभक भाषणाबद्दल उद्धव आणि राज न अटक का होत नाही कारण कायदा पालन नाही
On 1/16/2010 2:54 PM abhijit said:
You are doing your business( of Politics) only You have no worries for common peoples, The Congress Govt. Is Not Best But due Your This Attitude Most of Peopls Think That u are not liable to go to in govt. Just Think Which Problems The Muslims & Other Comminities Giving to you NOTHING But Only For You Benifits You are Fighting two Communities & You Sit In A/C Rooms Seeing the Picture, but Ek LAkxat Theva GITE Saheb YEH PUBLIC HAI SAB JANTI HAI<,
On 1/15/2010 4:01 PM ak said:
हिंसेने प्रश्न सुटत नाहीत पण चर्चेने तरी कोठे सुटतात ? कोणी चर्चेने सुटलेल्या प्रश्नांची उदाहरणे येथे देईल काय ? आपल्या कडे चर्चेचे गुराळ वेळ काढण्यासाठी वापारले जाते. बेळगावची चारच्या ६० वर्षे चाललीच आहे कि ? पाकिस्तानची चारच्या चालूच आहे कि. चीन शी चारच्या चालूच आहे कि. हातात काय मिलेले ?
On 1/15/2010 11:37 AM popat patil said:
बाळासाहेब ठाकरे कि जय ..!! जय शिवसेना, जय हिंदुत्व, जय हिंदुस्तान ...!!! हजारो बाळासाहेब ठाकरे निर्माण होतील या पावन भूमीमध्ये .... या जिहादींचा सर्वनाश करण्यासाठी .... वेल डन अनंत गीते साहेब. हिंदू भूमी ला जर वाचवायचे असेल तर हा हिंदुत्वाचा बाणा कायम ठेवा. सगळे हिंदू एक न एक दिन तुमच्या मागे जरूर येतील.
On 1/15/2010 6:41 AM saudagar said:
anant gite saheb you are great. only one person who have said actual situation
On 1/15/2010 12:31 AM विचारी मुस्लीम said:
बाबरी मशीद पाडुन काय मिळवले? असे विचारणायानी ईतिहासात मुघलांनी मंदीरे का पाडली? ब्रिटिशांनी धर्म प्रवर्तक का पाठवले? आजही जगात मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्म परीवर्तनाचा का हट्ट मांडतात? मुसलमान राष्ट्रापेक्षा धर्म का आधी आणतात? महाराष्ट्रातील मुठ्भरच मुसलमान मराठी का बोलतात? जीथे पीढ्यान पिढ्या राहतात त्या स्थाना पेक्षा दुसर्या देशातील समधर्मीयाला जवळ का करतात? अश्या स्वस्थान विरोधक वागणुकीची ऊत्तरे द्यावीत.
On 1/7/2010 9:55 AM Atul Chahure said:
इतिहास वाचा म्हणजे समजेल की मंदिरे पाडण्यात, मूर्ती फोडण्यात मुस्लिमांना भूषण वाटत आलेले आहे. बाबरी मशीद ही देखील मंदिर पाडूनच बांधण्यात आली.
On 1/7/2010 5:25 AM Anand said:
पाकिस्तानात तर हिदू काय मुसलमान पण सुरक्षित नाही.आपल्या काश्मीर मध्ये हिंदूंची काय कत्तल चालवली आहे.मध्यंतरी शीख मारले गेले,मुसलमान मारले गेले,हिंदूहि दंगलीत मरतात.तेव्हा मारून,युद्धाने,हिसेने कोणताही प्रश सुटत नाही. महात्मा गांधींचा मार्ग हाच अंतिम योग्य मार्ग आहे सर्वांना व जगाला समजेल तो सुदिन.
On 12/28/2009 12:03 PM NILAM KHAN said:
हिंदुस्तानातील बहुसंख्य मुस्लीम हे काही बाहेरून आलेले नाहीत त्यांची जर मुळे शोधली तर ते मुघल राजवटी पूर्वी हिंदू होते हे निष्पन्न होईल तेव्हा उगाच जिहाद ह्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेत स्वराष्ट्राचे नुकसान करू नये वर्तमानात जगताना सत्य परिस्थिती पाहूनच मुस्लीम बांधवानी निर्णय घ्यावा उगाच लंडन मध्ये कोणी खाबीस इंग्रज पैगबारांच्ये चित्र काढतो आणि आपण सोलापुरात बस जळतो याला अर्थ नाही. अरे अयोध्येत भगवान रामाचे मंदिर बांधा व मस्जिद हि शेजारी बांधा काय हरकत आहे?
On 12/28/2009 6:18 AM niyaj thakur said:
अंत गीते सारखा लोकसभेच खासदार आपल्या भाषणात सहज पने सांगतेय कि बाबरी मस्जिद पाडून भादुरी केली परंतु बाबरी मस्जिद पडल्यावर झालेल्या दंगलीत अनेक हिदू मुस्लीम धर्मीयांची कुटुंबे बेचीराग झाली, अनेकांचा उद्याग धंदा उद्वस्त झाला, अनेक लोकांचा आया बहिणींचा अब्रू बरोबर खेळ खेलानेत आले त्यास जब्बदार कोण भगवान राम कि बाबर दोनी पिकी कोणीही नाही त्यास जबाबदार अमी भोळ्या भाल्या जनतेने निवडून दिलेली माननीय गीते साहेबां सारखे नेते आणि त्यांना असे वाक्तुत्वा नंतर वाघ सिह हाती म्हणारे बिनडोख पाठीराखे .
On 26/12/2009 9:21 AM Sarang Madgulkar said:
"1942 च्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही रामजन्मभूमी आंदोलन अधिक उग्र होते" .... पुड्या!!
On 12/23/2009 12:55 PM vishal bagkar (9764059865) said:
गेल्या दहा वर्षात शिवसेनेने बेरोजगारी , महागाई ,देशाचा विकास ,नेत्यांचा भ्रष्टाचार या साठी जर आक्रमकता दाखवली असती तर आज देशात थोडे फार तरी चित्र वेगळे दिसले असते ..................
On 12/23/2009 2:35 AM हिंदू राष्ट्र said:
लई भारी गीते साहेब... आम्ही तुमच्या सोबत आहोत... आगे बढो !!! जय हिंद हि हिंदू भूमी होऊदे !!!
On 12/20/2009 5:21 AM bhaurao kumbhar said:
नाद करायचा nahi वाघांचा .....शिवसेना वाघांचा पक्ष आहे.
On 12/18/2009 3:43 PM Nilesh Raut said:
गीतेनी खरेतर संपूर्ण भारताची मातृभाषा मराठी करण्यासाठी लढा द्यायला हवा
On 12/17/2009 7:04 AM suresh kulkarni said:
लीब्र्हन रेपोर्त हे मुस्लीम तुष्टीकरण नाही का यातून सेचुलारीसम कॉंग्रेसचे उघडकीस येत नाही का आता हा अहवाल वाढणारी महागाई सामान्यांना जगणे मुश्कील होत असताना महत्वाचा आहे का .कॉंग्रेस सेकुलर असेल तर हा अहवाल गुंडाळून नवा निर्माणाचे कार्य करेल.वोट बँक वाध्वाची राजनीती बंद करा.
On 12/10/2009 5:38 PM swaty thakar said:
या अधिवेशनात आता कोणताही लोकोपयोगी मुद्दा येणार नाही असे दिसते.सर्व महत्वाचे ,जीवनावश्यक निर्णय जैसे थे रहाणार .एक गोष्ट खरी सामान्य जनतेच्या समस्येची तळमळ संपली कि असे नुसते जयहो ,जय जय कार ऐकावे लागतात.सभागृह याच साठी आहे का ?देशाला जगन्नाथाच्या रथासारखे चालवत आहेत .मूर्तीच्या जागी हे नेते आणि जनता बिचारी मारते आहे धक्का !
On 09-12-2009 15:50:11 dinkar jadhav yenape karad said:
WE PROUD SHIV SENA
On 12/9/2009 2:07 PM vaibhav shhirodkar said:
बाळासाहेब तुम्ही खरेच ग्रेअत आहात.
On 22/12/30 11:47 ? Himesh Prajapati said:
बाळासाहेब ठाकरे कि जय ..!! जय शिवसेना, जय हिंदुत्व, जय हिंदुस्तान ...!!! हजारो बाळासाहेब ठाकरे निर्माण होतील या पावन भूमीमध्ये .... या जिहादींचा सर्वनाश करण्यासाठी .... वेल डन अनंत गीते साहेब. हिंदू भूमी ला जर वाचवायचे असेल तर हा हिंदुत्वाचा बाणा कायम ठेवा. सगळे हिंदू एक न एक दिन तुमच्या मागे जरूर येतील.
On 12/9/2009 11:21 AM jolly said:
१९४२चे आंदोलन खरोखरच उग्र नव्हते खरे आहे का? आणि हे जर खरे असेल तर त्याचे ही कारण आहे आणि ते कारण त्यात मुस्लीम पण सहभागी होते म्हणूनच ते उग्र नव्हते आणि त्याचेही कारण आहे ते असे की मुस्लीम हे शांतंता प्रिया आहेत आणि जर मुस्लीम सहभागी नसते तर आपण आज पर्यंत स्वतंत्र अनुभवले नसते ह्याची जाणीव ठेवावी. कोणीही उठावे आणि काहीही बोलावे ह्याला की अर्थ आहे का? बाबरी मशीद पडून काय साधले आज पर्यंत? ते सांगा आधी जनतेला मग उगाच ध चा मा करु नका आणि जनतेची दिशाभूल करू नका
On 12/9/2009 10:57 AM Ajay G said:
अनंत गीते म्हणजे सेनेचा वाघ. गीते साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हे
On 12/9/2009 8:53 AM san said:
well done anant gite saheb.......... HUM TUMARE SATH HAI.........
On 12/9/2009 8:52 AM NK said:
१९४२ च्या आंदोलनात 'बिना ढाल बिना तलवार' होते हो....... पण १९९२ च्या आंदोलनात कुदळ, फावडा, पहार असेपण होते. त्यामुळे १९९२ उग्र होते हे नक्की.....


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: