Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'तेलंगण'मुळे आंध्रात तीनशे कोटींचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 12:15 AM (IST)
Tags: national ,   trs,   telangana,   andhra pradesh,   snn

हैदराबाद - वेगळ्या तेलंगण राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आंध्र प्रदेशातील जनजीवन विस्कळित झाले आहे. वाहतूकसेवेबरोबरच कामकाज ठप्प झाल्याने राज्याचे रोज सुमारे तीनशे कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

तेलंगण राष्ट्र समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाचा हैदराबाद, तेलंगणासह राज्यातील माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन, वाहतूक, मनोरंजन, बांधकाम अशा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. आंध्र प्रदेश चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनानंतर राज्यातील परिस्थिती स्फोटक होत आहे. सरकारचे रोज 25 कोटी, तर औद्योगिक क्षेत्राचे तीनशे कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. राज्यात सध्या तेराशे "आयटी' कंपन्या असून, त्यात साडेतीनशे कॉल सेंटर आहेत. त्यांचे रोज 50 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

"आयटी हब' म्हणून ओळख असलेल्या हैदराबादमधील "आयटी' कंपन्यांनी या आंदोलनामुळे आपला व्यवसाय इतर शहरांमध्ये हलविण्याचा विचार सुरू केला आहे. या कंपन्या पुणे किंवा चेन्नई या शहरांकडे वळू शकतात, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. आंदोलनामुळे हैदराबादमधील आयटी कंपन्यांमध्ये केवळ 60 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहू शकली, अशी माहिती हैदराबाद सॉफ्टवेअर एक्‍स्पोस्टर्स संघटनेचे अध्यक्ष एम. नरसिंह राव यांनी दिली. दहा दिवसांपासून पेटलेल्या या आंदोलनामुळे रखडलेली कामे कशी पूर्ण करायची, असा प्रश्‍न या कंपन्यांना पडला आहे. या अशांततेमुळे राज्यातील कुशल अभियंतेही इतर राज्यांकडे वळण्याची भीती या कंपन्यांना सतावत आहे.
प्रतिक्रिया
On 12/11/2009 6:37 PM SHIVRAM GOPAL VAIDYA said:
पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे या निर्णयबद्दल अभिनंदन. टी.आर.एस. राव यांनी उपोषणाचे निमित्त करून आपल्या काही वैयक्तिक फायद्यासाठी ही वेगळ्या तेलंगणाची मागणी पुढे रेटली आहे. सरकारने अशा नेत्यांपासून सावध राहावे आणि अकारण हिंसाचार करून, सरकारी मालमत्तेचे नुकसान करून,जनतेला वेठीला धरून, पुन्हा वर हेच जणू माननीय महात्मा गांधी आहेत असे "अहिंसक" उपोषणाचे नाटक करून, "हिंसक" आंदोलन करत असलेल्यांच्या प्रवृत्तीला वेळीच लगाम घालावा.
On 12/10/2009 5:42 PM employee said:
हैद्राबाद IT कंपन्यांनी पुण्यामध्ये यावे. यामुळे येथील तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील.
On 12/10/2009 2:33 PM Uday Thakare said:
वेळीच लक्ष दिले असते तर नसते झाले नुकसान, विदर्भात सुद्धा तेच होणार I think!
On 12/10/2009 2:31 PM Uday Thakare said:
वेळीच लक्ष दिले असते तर नसते झाले नुकसान, विदर्भात सुद्धा तेच होणार I think!
On 12/10/2009 12:15 PM arun said:
बघा अंध्रावालेच एकत्र राहू शकत नाही कारण तिथे कोणावर तरी अन्यय होतो आहे आणि कोणी तरी एन्जोय करतो आहे. फक्त महाराष्ट्रात असे घडले तर uttarekadche koklayala lagtat.
On 12/10/2009 11:01 AM Sarfraz said:
पण ह्या कंपनी न तोटा का होईल हे पण सांगा ना
On 12/10/2009 8:59 AM Audumbar Kashid said:
if industrial area moves toward maharashtra it is better for maharashtra.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: