Update: 
      वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font

जोन्सचे सुवर्णपदक 'आयओसी'कडेच राहणार
पीटीआय
Friday, December 11, 2009 AT 12:00 AM (IST)
Tags: Marian Johnson,   ioc,   sports

जिनिव्हा - उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळलेली अमेरिकेची धावपटू मारियन जोन्स हिचे सिडनी 2000 ऑलिंपिक स्पर्धेत शंभर मीटर शर्यतीत मिळविलेले पदक आता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडेच (आयओसी) राहणार आहे.
 
जोन्सकडून हे पदक काढून घेण्यात आले होते. सिडनीत ग्रीसची कॅटरिना थानाऊ रौप्यपदक विजेती ठरली होती. मात्र, तिच्यावर देखिल उत्तेजक सेवनाचे आरोप असल्यामुळे आयओसीने हे सुवर्णपदक कोणालाच न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात आता या स्पर्धेत सुवर्णपदक देण्यात आले नाही असाच उल्लेख राहील.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: