भारताच्या गटात ऑस्ट्रेलिया, पाक
युएनआय
Wednesday, December 16, 2009 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - आगामी हिरो होंडा विश्वकरंडक हॉकी स्पर्धेची गटवारी भारतासाठी प्रतिकूल ठरली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या "ब' गटात भारताचा समावेश आहे. नवी दिल्लीत 28 फेब्रुवारी ते 13 मार्चदरम्यान ही स्पर्धा होत आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने ही गटवारी जाहीर केली. गतविजेत्या जर्मनीला अग्रमानांकन आहे. त्यांचा "अ' गटात समावेश आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीला पात्र ठरतील. स्पर्धेचे वेळापत्रक डिसेंबरअखेरीस जाहीर केले जाईल.
गटवारी -
'अ' गट - जर्मनी, हॉलंड, कोरिया, न्यूझीलंड, कॅनडा, अर्जेंटिना.
'ब' गट - ऑस्ट्रेलिया, स्पेन, इंग्लंड, पाकिस्तान, भारत, दक्षिण आफ्रिका.