Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या 'उदेक्कार'चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 27, 2009 AT 12:30 AM (IST)
Tags: pune,   book,   pratima ingole

पुणे -  ""स्त्रीवाद ही परिवर्तनवादी राजकीय जाणीव आहे. "बाईपण' वाट्याला आल्यामुळे आपण मुख्य परिघाबाहेर कसे फेकले जातो, याची जाणीव असणारे स्त्रीवादी असतात. ही गुंतागुंत समजून घेतल्याशिवाय स्त्रियांना आत्मसन्मानाचे भान येणार नाही,'' असे मत पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. विद्युत भागवत यांनी शनिवारी व्यक्त केले.

कवयित्री डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या "उदेक्कार' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ संपादिका विद्या बाळ अध्यक्षस्थानी होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. माधवी वैद्य, मधुकर निरफराके या प्रसंगी उपस्थित होते.

वैद्य म्हणाल्या, ""स्त्री जाणिवा असलेल्या कवितांचे विचारधन या काव्यसंग्रहामुळे मिळाले आहे. सर्व प्रकारच्या वाङ्‌मयप्रकारांना स्पर्शणारे काव्य, अभिव्यक्तता, वैदर्भीय भाषेची गोडी आणि भाषाशैली यांचा सुंदर समन्वय त्यात साधला गेला आहे.''

बाळ म्हणाल्या, ""लेखन हा लेखकांचा संवाद असतो आणि तो प्रत्यक्ष निरीक्षणे व अनुभवांवर आधारित असतो. या काव्यसंग्रहात स्त्री जीवनातल्या महत्त्वाच्या टप्प्यांची अनुभवात्मक निरीक्षण आहे.''

जीवनाच्या विविध टप्प्यांवर स्त्री जीवनाच्या वेदना आणि दुःख पाहात गेले, त्यातूनच या काव्यसंग्रहाची निर्मिती झाल्याचे इंगोले यांनी सांगितले.
अंजली कुलकर्णी व मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रभा सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.

Madhu Milan


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: