Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

विधान परिषदेसाठी ग्रामीण भागाला संधी द्यावी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 02, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: pune,   politics,   ncp

पुणे -  पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी किमान यंदाच्या पोटनिवडणुकीत तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी केली. यासाठी हे सदस्य पालकमंत्री अजित पवार यांचीही लवकरच भेट घेणार आहेत, असे याच पक्षातील काही सदस्यांनी गुरुवारी सांगितले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. त्या सभेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या मतदारसंघातून निवडून गेलेले लक्ष्मण जगताप विधानसभेवर गेल्याने, त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा सध्या रिक्त आहे. यासाठी कोणत्याही क्षणी निवडणूक लागण्याची शक्‍यता असल्याचेही या सदस्यांनी सांगितले.

या मतदारसंघातून पक्षाने आतापर्यंत सातत्याने पिंपरी-चिंचवड किंवा पुणे या दोन शहरांतीलच व्यक्तीला उमेदवारी दिली. यासाठी निम्म्यापेक्षा जास्त मतदार हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील असून, उमेदवारीसाठी मात्र या भागातील व्यक्तीचा साधा विचारही केला जात नाही. विशेषतः आतापर्यंत एकाही जिल्हा परिषद सदस्याला या मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकलेली नाही.

श्री. जगताप यांचा कार्यकाळ डिसेंबर २०१० अखेरपर्यंत होता; परंतु त्यापूर्वीच त्यांनी विधान परिषेदवरील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणूकविषयक तरतुदीनुसार कोणतेही पद हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे येत्या महिनाभरात या जागेची निवडणूक जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच, पक्षाच्या उमेदवारीसाठी पुणे महापालिकेतील काही ज्येष्ठ नगरसेवकांची नावे चर्चेत आल्याने, जिल्हा परिषद सदस्यांनी ही मागणी केली. त्यामुळे यासाठी शहर की ग्रामीण असा विचार पक्षाला करावा लागणार असल्याचेही या सदस्यांनी सांगितले.

ग्रामीण भागाचे २९९ मतदार
पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही महापालिकांचे सर्व नगरसेवक, जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांचे सर्व नगरसेवक आणि पुणे जिल्हा परिषदेतील सर्व सदस्य हे मतदार आहेत. यानुसार यासाठी जिल्ह्यात एकूण ५४८ मतदार आहेत. त्यापैकी पुणे महापालिकेचे १४४, पिंपरी-चिंचवड - १०५, सर्व नगरपालिकांचे मिळून एकूण २११ आणि जिल्हा परिषदेच्या ८८ सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकांचे मिळून २९९, तर पिंपरी व पुणे या दोन शहरांचे मिळून २४९ मतदार होत आहेत. या मतदारसंघाचा आमदार हा केवळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारांवर ठरत असल्याचेही या सदस्यांनी सांगितले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: