Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी "एनआरआय' ना साद
सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 10, 2010 AT 08:49 AM (IST)

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1915 मध्ये परदेशातून स्वदेशात येताना मुंबापुरीत पाऊल ठेवले होते. गुंतवणूक करताना अशी मुंबई राजधानी असलेल्या परिपूर्ण, सुरक्षित व स्वरक्षित महाराष्ट्राला अनिवासी भारतीयांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केले.

प्रवासी भारतीय दिनाच्या समारोप कार्यक्रमात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांना आवाहन केले. "गुंतवणूक करताना अडचण आली तर थेट माझ्याशी संपर्क साधा', असे सांगताना त्यांनी आपला वैयक्तिक "ई-मेल' पत्ताही उपस्थित गुंतवणूकदारांना दिला. दिल्लीतील संपर्काची जबाबदारी निवासी आयुक्त अमिताभ राजन व उद्योग सचिव ए. एम. खान यांच्यावर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

""व्यावसायिक गुंतवणुकीसाठी कुशल मनुष्यबळ व पोषक वातावरण, मुक्त व्यापार धोरण, केंद्र व राज्य शासनातील उत्तम समन्वय यामुळे विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे नंदनवन ठरले आहे. आपणही आम्हाला अग्रक्रम द्यावा,'' अशी साद मुख्यमंत्र्यांनी प्रभावी इंग्रजी भाषणाद्वारे जगभरातील अनिवासी भारतीयांना घातली. गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यास भारतात महाराष्ट्राशिवाय अजूनही पर्याय नसल्याचे आपल्या लक्षात येईल, असा आत्मविश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

येथील विज्ञान भवनात गेले तीन दिवस झालेल्या प्रवासी भारतीय दिनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी "पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन'द्वारे विचार मांडले. त्यांनी भारतीय संस्कृतीचा विश्‍वव्यापी प्रसार केल्याबद्दल जगभरातील सुमारे 130 देशांतील 25 दशलक्ष अनिवासी भारतीयांचे आभार मानले. या भारतीयांनी कठोर मेहनत व बुद्धिवैभवाने जगभरात आर्थिक व सामाजिक प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने गुंतवणुकीसाठी आवश्‍यक त्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आघाडी घेतली आहे. कुशल कामगार पुरविण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न दीडपटीने जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली.

आगामी पाच वर्षांत 12 कोटी लोकसंख्येच्या आमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक "लक्षाधीश' बनविण्याचा सरकारचा संकल्प आहे. या संकल्पासाठी आपणही हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रगत उद्योग, संपन्न सागरी किनारपट्टी, खनिज संपत्तीने समृद्ध विदर्भ आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई यामुळे देशाच्या एकूण उत्पन्नापैकी 13 टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून मिळते. राज्यानेही विकासदर सातत्याने नऊ टक्के राखला आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. "26-11'च्या मुंबई हल्ल्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांच्या मनातील धास्ती ओळखून मुख्यमंत्र्यांनी मुंबईत उभारलेले "फोर्स वन' संरक्षण दल तसेच अन्य सुरक्षा उपायांची माहिती देत ""मुंबई-पुण्याबरोबर राज्याच्या अन्य भागांतही आपण निर्धास्तपणे गुंतवणूक करा,'' असेही आवाहन केले. मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या तीन वर्षांत राज्यात 20 विमानतळ जन्माला येत आहेत. राज्यात तब्बल 146 विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती होते आहे. 271 अभियांत्रिकी महाविद्यालये, 323 तंत्रनिकेतने व साडेसातशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून राज्यात दर वर्षी पाच लाख कुशल मनुष्यबळाची निर्मिती होते. थेट गुंतवणुकीत तब्बल 53 टक्के वाटा उचलणारे महाराष्ट्र हे देशातले आघाडीचे विकसित राज्य आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या वेळी योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया, केंद्रीय प्रवासी भारतीय मंत्री वायलर रवी, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, राज्याचे उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
On 2/22/2011 10:59 AM Dhananjay said:
फक्त पैसा द्या ....तो सुद्धा स्वतः .....मोठे बकरे शोधायची गरज नाही...ए-मैल id दिलाच आहे.
On 13/11/2010 07:38 AM Eak Punekar said:
Reply to Eak Maratha: I agree with your comments about Marathi Asmita. But dis-agree with to remove them from the root. If you have that much guts then apply against corrupt Politians and try to remove their corrupted roots. Maharashtra need Clean, Prosperous & Progressive Leadership & Implementation. Not just dicussion or comments.
On 7/25/2010 1:51 PM Neutral_Marathi said:
Good to here this from CM of Maharashtra. He was Industry Minister earlier so he has better idea about industries in Maharashtra.
On 8/07/2010 7:40 a.m. Ek Maratha (NZ) said:
अरे नचिकेत, अंशुमन आणि इतर तुम्ही आपल्या माय मराठीला होपलेस म्हणता. काही लाज वाटायला पाहिजे. उद्या तुम्ही आपल्या माता पिता यांनासुद्धा होपेलेस म्हणाल. मी लांब राहत असलो तरी मराठी मातीशी संबंध ठेऊन आहे. ज्या मातीने तुम्हाला घडवले मोठे केले त्यांना शिव्या घालता. नालयक कुठले. तुमच्यासारखी नाकर्ते मरती मातीत जन्माला आले हा मराठी मातीचा अपमान आहे. तुमचा धर्म बदला तुम्ही मराठी धर्माला लायक नाही. इंग्रजांची अवलाद साली. या अवलादीला आणि प्रवृत्तीला मुळापासून छाटले पाहिजे तरच महाराष्ट्राचे कल्याण होईल.
On 02-07-2010 12:26:58 kiran said:
jai maharashtra
On 7/2/2010 6:41 AM Shreya said:
Thank God I am in US. Why come back to India, to see ugliness and filthiness and corruption in India?
On 6/23/2010 8:00 PM marathi said:
Dear NRI friends.. Please note that we Indian not safe in India.. No electricity, no water, no roads ... main is no Security ,,, Nora ml man is killed like dirty dog and ministers and their sons are making money.. none of the single is intresetd for development... Dont give any single rupees to Indian govt as we already paying 30% tax... still it is not sufficient for this corrupted Govt and their employee... our sister and mother are not safe .. law and order in Maharashtra is worst ..
On 06/06/2010 9:28 PM MAHESH said:
NRI need to buy visa to India I am Canada i have pay 62 cad for each visits NRI lose Indian citizenship when they acquire other country citizenship and to come India either pay 62 for visa, going consulate is like going post office in India same rude face other hand app for Pio FOR which one has to pay 490 cad, going back to my country who i need this hassle , even Pakistan allow smooth duel citizenship , and our minsters like UP , Bihari beter they need invest from NRI ?
On 3/16/2010 1:29 PM मयुरेश जोशी said:
या या ..... NRI उद्योगपतीनो जरूर या.... पण येताना वीज, पाणी आणि दसपट पैसे आणा कारण निम्मे पैसे तर नेत्यांच्या घशात ओतावे लागतील, उरलेल्यातील निम्मे सरकारी अधिकाऱ्यांच्या खिशात जातील...... आणि मग उरल्यासुरल्या पैशात मेधा पाटकर ला पाटावर बसवून हळद कुंकू लावावे लागेल...... त्यातूनहि काही पैसे उरले तर काढा तुमचे उद्योग.......! शहाणे असाल तर गुजराथ ला जा.... सुखाने व्यवसाय करून तुमची व गुजराथ राज्याची भरभराट होईल.
On 3/15/2010 3:25 PM Rahul said:
थोडी लाज बाळगावी राजकारणी लोकांनी ( नाही जनाची तरी मनाची तरी ) !!! NRI लोकाचा पैसा दिसतो , गरीब शेतकऱ्याचा आत्महत्या दिसत नाहीत !!!
On 27/02/2010 13:31 Rahul said:
येस मिस्टर CM , वीज पण आणा म्हणव
On 2/24/2010 10:30 AM Nitin said:
मराठी लोकांनी बिहार मध्ये invest करावे म्हणजे migration कमी होईल, स्वस्त नोकर मिळतील, जास्त वेळ फुकट काम करतील - त्यामुळे महाराष्ट्र स्वच्छ आणि चांगला राहील. शिवाय मराठी लोक स्वस्तात मालक बनतील.
On 2/24/2010 1:57 AM Yogesh said:
Wow! Many frustrated, losers NRIs here. If you wanna vent out your anger,go away, don't comment here. Nice appeal by the CM, hope he take actions to back his promises. Maharashtra is a great investment destination with huge talent pool, intellectual society & good infrastructure (compared to Indian standards). It does provide a nice low-cost option. & people who criticize, please be aware that NRIs inject the economy with huge cash, misdeeds are bound to happen everywhere not just in Maha.
On 2/21/2010 4:17 PM sandesh said:
महाराष्ट्र हे होपेलेस आहे. मराठी लोकांनी आणि मुख्यामात्र्यांनी गुरगाव दिल्ली गुजरात येथे जाऊन पाहावे आणि स्वतः तुलना करावी.
On 08/02/2010 16:26 Aniket said:
NRI ने महाराष्ट्रात गुंतवणूक करा म्हंजे नक्की कशात पैसे गुंतवायचे? त्या पैश्याचा योग्य उपयोग केला जातो का? कोणाच्या हाती हा पैसा जातो? Is this investment 'a value for money'? All prices are already escalated by 5-6 times, there is no point in investing in land or an apartment, investments will never grow in that for next 10 years. What are other good investment options then?
On 08/02/2010 15:57 joshi said:
राजकारणी मंडळी आणि Builder Lobby ने पैश्या चे आमिष दाखवून शेतकऱ्याची काळ्या माती शी असलेली नाळ तोडली. आजकाल सगळेच शेतकरी जमिनी विकून गुंठा मंत्री बनतात, आणि कुठल्या तरी पक्षात प्रवेश करतात. आजून २५ वर्षा नंतर सगळे विकून खालले असेल, तेवा पिकवायला कोणी नसेल..अन्न घान्याचा प्रश्न फार बिकट होणार आहे.
On 08/02/2010 15:42 mantri said:
NRI गुंतवणुकी मुले गेल्या १० वर्षात गुंठा मंत्री culture बोकाळले.ज्यांना लिहिता वाचता येत नाही आश्यांच्या खिशात करोडो रुपये आले, builder lobby ने flat च्या किमती ५ पट केल्या, त्याचा प्रचंड फायदा पुढारी/नेते मंडळी आणि agent लोकांना झाला. स्थानिक मध्यम वर्ग आहे तसाच राहिला, खरे तर मध्यम वर्ग गरीब झाला. NRI लोकांनी चुकीच्या लोकांच्या हाती त्यांचा पैसा दिला, सगळी वाट लावली. आता परिस्तिथी बदलणे शक्य नाही. पिढ्या-न-पिढ्या आता ह्यांच्या गुलामगिरीत जगा.
On 08/02/2010 15:18 swapnali said:
NRI ची गुंतवणूक Real Estate मध्ये असते. ह्या धंद्यात तमाम पुढारी मंडळी ची गुंतवणूक / भागीदारी आहे. महणून मुख्य मंत्र्याचे कळ-कळी चे आवाहन आहे कि NRI लोकांनी महाराष्ट्र मध्ये भरपूर गुंतवणूक करावी म्हंजे त्यांचे खिसे भरतील. सुधारणा झाल्या कि नाही हेय पहिला NRI कधी येतात पाहिला, वीज, पाणी, रस्ते नाही मिळाले तर त्यांना काय फरक पडतो हो. NRI मंडळी तर तिकडे परदेशात राहतात ना..!! £$ convert मारले कि झाले लाखो करोडो रुपये,
On 14/01/2010 04:22 Jai Maharashtra! said:
महाराष्ट्र हे ढोंगी,भ्रष्टाचारी आमदार आणि खासदारांचे राज्य आहे. येथे विदर्भ, कोंकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा अस्मिता आहेत. देवा! त्यापेक्षा इंग्लंड बरा!
On 1/10/2010 8:21 PM Harish said:
Its all fake. People दो नोट हवे infrasturute सुच अस एलेक्टीचीत्य अंड अंड मान्य other things अंड how can he साय्स तहात पेओप्ले शौद्ल invest इन इंडिया. फिर्स्त इम्प्रोवे यौर कोल्लेक्तिओन लेवेल.
On 1/10/2010 7:34 PM Tikakar said:
"महाराष्ट्राने गुंतवणुकीसाठी आवश्‍यक त्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आघाडी घेतली आहे." वाचून मला वाटलं की मुख्यमंत्री त्यांना पडलेलं स्वप्न सांगताहेत की काय. पायाभूत सुविधा म्हणजे काय हे कोणीतरी यांना समजावून सांगायची गरज आहे.
On 1/10/2010 6:32 PM Vasant said:
Why any top politician in maharashtra makes his son or duaghter industralist? They choose only politics for their bright future. Answer of this question will give nature of maha problem
On 1/10/2010 5:59 PM Maathi1 said:
नचिकेत , महाराष्ट्र आपला आहे. बाहेर बसून judge करण्यापेक्षा काहीतरी करून दाखवा. महाराष्ट्र industrial प्रगतीमध्ये अग्रेसर आहे.आणि राहणारच. जय महाराष्ट्र, जय भारत.
On 1/10/2010 5:59 PM Vinay said:
Great study and Vision!!! CM Chavan sir we are proud of you!!! please keep it up!! Under your leadership Maharashtra will definitely progress and remain at No.1 postion in overall development and we wish you all the best for Global Maharashtra project!!!! Well educated, honest and visionary leadership of you is need of hour.
On 1/10/2010 3:27 PM Nitin said:
How much trust-worthy are you and your government, Mr. Chavan? Please prove.
On 1/10/2010 1:50 PM Nagesh said:
Mr. So called cheep (??) Minister ask all minister to invest balck money. Himmat aahe ka?
On 1/10/2010 1:44 PM marathi said:
Dear all NRI, Im staying in Mumbai, There is no MARTHI manus in mumbai now days, day by day things are worst and we dont find aany solutions. Kayada suvyastha kuthe ahe yache bhan nahi, our sister and mother are not safe. Shetkari atmaahatya karat ahet.. Mantri 5 paishyachya layki che nahi... Rich become more rich and poor become more poor... so think twice befor doing any help.. Also Mr Chavan tumhi paise kai kaaranr ahet.. Mr chavan misguiding u..Stay Hepply there only .....BYE<
On 1/10/2010 1:38 PM Ganesh_Indian said:
Santosh & many people who wants to communicate directly with CM ...Lets try with this mail ID..... chiefminister@maharashtra.gov.in & ashokchavanmind@rediffmail.com Thanks.
On 1/10/2010 1:20 PM Ravindra said:
महाराष्ट्राचा विकास होत आहे कबूल आहे पण सोबत प्रोबलेमेस पण वाढत आहेत,रस्ते आणि पाणी कमी पडते आत्ता पुणे आणि मुंबई मध्ये पाण्याचे आणि विजेचे वांदे आहे रस्ते कमी पडत आहेत ट्राफिक वाढतंय आता अजून जर इथे गुंतवणूक झाली आणि बाहेरचे लोक येऊन राहू लागले तर मग प्यायला पाणी आणि वीज आणायची कोठून? आणि किती? याचा मुख्यमंत्री साहेबांनी जरा विचार करावा , आधी पासून जे लोक आहेत त्यांचीच चांगली सोय करा आणि मग बाकीच्यांना इकडे येण्याचे आमंत्रण द्या,
On 1/10/2010 12:25 PM Sandeep Pingale said:
I would like to thanks Honerable Chief Minister Mr. Chavan for giving the boosting package to maharashtra. This package would definately boost state's standard & economy. But we need to see if we have that kind of infrastructure available or not? One of the imp factor is ELECTRICITY, transportation through metro, Cheaper land availability, water, govt. tax concessions etc. We should announce these items then automatically investors will attract. Anyway Good Luck Mr. Chavan...Investor From Dubai.
On 1/10/2010 12:13 PM Nagesh said:
मित्र नचिकेत, तसा negatively विचार केला तर complete system च hopeless आहे. म्हणून असा लोकांना अडव्न्या पेक्षा त्यांना actively participate करू देत.
On 1/10/2010 11:58 AM shivaji mumbai kar said:
महाराष्ट्राची अशी प्रगती झाली तर खरोखरच आम्हाला आनंद होईल. पण विजेच्या प्रश्नाची बोंब सर्वांना ठाउक आहेच. तो सोडवा मग उद्योग आपोआप येतील. व मुलांच्या आत्महत्या बंद करा देअष्याचा काळा पैसा आणा kaeda shuvevasta kadak kara jara kaaran krimlance khup vadhli aahe.
On 10/01/2010 11:45 Ramesh said:
मला महारास्त्रात उद्योग सुरु करायचे आहे पण मला खूप बाबींचा सामना करावा लागतोय. कृपया आपण मुख्य मंत्री साहेबांचा e-मेल पाठवा तर मी त्याचं मदत घेऊ सकेन.
On 1/10/2010 11:27 AM rajendra awate said:
And what you will give in return to NRIs : when they arrive at CSIA - kachara, ghan, rastyatil khadde, vas yenare toilets, gardi & pradushan; mahagai, saglikade bhratachar ani vijechi bomb, panyacha tudvada, etc etc Mahag vastu , mahag petrol ani mahag vij. yasathi NRI ni Maharshtrat guntavnuk karaychi ? aho CM saheb jara dolyavarchi zapadd kadha ani song band kara.
On 1/10/2010 11:23 AM Nikhil said:
आम्ही खरोखरीच महाराष्ट्रात गुंतवणुकीचा प्रयत्न केला होता .. आपल्या सरकारने आम्हाला seriously घेतलाच नाही .. आम्हाला गोवा आणि इतर राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाल म्हणून आम्हाला तिकड जाव लागल .. CM चा mail मिळाला तर आम्ही सांगू शकतो detail मध्ये कि नक्की कायproblem आला
On 1/10/2010 11:09 AM Pramod said:
Keep it up Maharashtra....This is so true, and especially I have seen it closely after living in US for almost 7 years and coming back here and settled well. The progress and contribution from M.S. to the Indian economy is amazing and so true, barring few nonsesitive policitcal events everything is always attracting the professionals and investors as it's blessed. I agree that it's amongst the best state from all perspective, state is making tremendous strides on economy.
On 1/10/2010 10:57 AM veer sainik said:
कामापुरता मामा म्हणतात ना तशी हि गात आहे. जेव्हा गरज असते तेव्हा NRI आठवतात. इथेरवेली कुणी विचारत सुद्धआ नाहीत. विमानतळावर बघा कसा त्रास देतात. ह्या राजकारण्यांकडे भरपूर पैसा आहे NRI च्य पैशांची गरज पडणार नाही.
On 1/10/2010 10:52 AM limaye said:
जमीन खरेदी केली तर सातबारा करताना तलाठी पैसे खाणार, पुढे वीज जोड मिळायला पैसे चारावे लागणार, मग सतराशे साठ परवानग्या काढायला पैसे चारा. कशाला मरायला उद्योग महाराष्ट्रात येतील? गुजरात उत्तम आहे. तिथे वीज कपात नाही.
On 1/10/2010 10:48 AM Pune_Pratinidhi said:
आजीबात पैसे देऊ नका त्यांना. ते घेतील आणि समुद्रात शिवाजीचा पुतळा बांधतील. महाराष्ट्रात वीज पाणी रास्ते होणार नाहीत आणि पुढच्यानिवडणुकीत भिकार्यासारखे परत पैसे मागू लागतील आणि मूर्खासारखी आश्वासने देतील. हे असले मुखमंत्री म्हणजे भारत भूमीचे दुर्दैव आहे. नशीब सकाळ सारखे पेपर आहेत हे छापण्यासाठी. धन्यवाद.
On 1/10/2010 10:47 AM satya said:
महाराष्ट्रात गुंतवणूक जरूर करावी पण २०११ पासून भारतीयांना १० % tax आणी अनिवासीयाना ३० % tax हा कुठला न्याय हो. एकीकडे अनिवासीयाना मतदानाचा हक्क देण्याचे मनमोहनसिंग बोलतात आणी दुसरीकडे ३० % flat tax लावतात. असे असेल तर हे बरोबर नाही. सगळ्यांना सारखाच कायदा आणी सारखाच tax असण्यात गैर काय?
On 1/10/2010 9:57 AM Anshuman said:
ह्या होपलेस राज्याला प्रगत करण्याची जवाबदारी पण आपलीच आहे. मुख्यमंत्री महोदय, आम्ही आपल्या सोबत आहोत!
On 1/10/2010 9:41 AM Practical said:
आधी पाणी, वीज आणि गुन्हेगारीचा बंदोबस्त करा मग लोक विचार करतील .... काम राहिलं बाजूला आणि फालतू गोष्टीत वेळ काढण्यात लोक पटाईत आहेत आपले... तानाजीचा घोडा पांढरा होता का काळा यातही लोक वाद घालतील ....काही भरोसा नाही...
On 1/10/2010 6:42 AM santosh said:
BTW .. what is CM's email id?
On 10/01/2010 05:52 Anthony Gonzalviz said:
गांधींनी मुंबईत येण्याचा आणि परदेशी गुंतवणुकीचा काय संबंध? मुख्यमंत्री साहेब थोडं स्पष्ट कराल काय?
On 1/10/2010 5:43 AM dontbelieve said:
Nonsense
On 1/10/2010 4:10 AM खोचक said:
महाराष्ट्राची अशी प्रगती झाली तर खरोखरच आम्हाला आनंद होईल. पण विजेच्या प्रश्नाची बोंब सर्वांना ठाउक आहेच. तो सोडवा मग उद्योग आपोआप येतील. शुभेच्छा !
On 1/10/2010 12:37 AM Rameshsingh Pardeshi said:
NRI हा भारत देशाचा अभिमान आहे.मी ही शिकलो,घडलो याच भारत देशात.आज मी ही खारीचा वाटा उचलत आहे. Ramesh Pardeshi ( NRI )
On 10/01/2010 00:26 Nachiket said:
महाराष्ट्र हे होपेलेस राज्य आहे. सध्या मी इंग्लंड मध्ये राहतो, जन्माने मराठी आहे, माझी सर्वाना विनंती आहे महाराष्ट्राला गांभीर्याने घेऊ नका. गुजरात, कर्नाटक बरेच चांगले पर्याय आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: