तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 11, 2010 AT 12:15 AM (IST)
नागपूर, अकोट (जि. अकोला), ता. १० ः विद्यार्थ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच असून राज्यात आणखी तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट, नागपूर आणि मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अकोट येथील डी. एड. कॉलेजची विद्यार्थिनी कु. स्वाती रामेश्वर बालगुडे हिने रविवारी (ता. दहा) सायंकाळी सहाच्या सुमारास स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेऊन
आत्महत्या केली.
स्वाती बालगुडे ही येथील सावित्रीबाई फुले अध्यापक विद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती भाग्यश्री वसाहतीत एका मैत्रिणीसोबत भाड्याची खोली घेऊन राहत होती. आज मैत्रीण बाहेर गेली असताना तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. बाथरूमधील टबमध्ये अंगावर रॉकेल घेऊन तिने स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत स्वाती शंभरटक्के जळाल्याची माहिती अकोट पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक साकळकर,
उपनिरीक्षक मांडवे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भगत, पोलिस शिपाई वानखडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात स्वातीच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही, असे ए. एस.आय. भगत यांनी सांगितले.
स्वाती ही हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील चोंडी अंबी येथील रहिवासी असल्याचे श्री. भगत यांनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली नव्हती.
"आक्षेपार्ह ऐकण्यात नव्हते'
या घटनेसंदर्भात महाविद्यालयाचे विभागप्रमुख के. एस. यावले यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "रविवारी मी अमरावती येथे असताना मला दूरध्वनीवरून घटनेची माहिती मिळाली. स्वातीने दोन महिन्यांपूर्वी प्रथम सत्राला प्रवेश घेतला होता. ती अभ्यासात हुशार होती. तिच्याबाबत काही आक्षेपार्ह असे आमच्या ऐकण्यात नव्हते. अकोटला आल्यानंतर याबाबत चौकशी करूनच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल.'