लंडन - भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय व्यग्र कार्यक्रमाचे कारण देत इंग्लंडमधील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत मिडलसेक्सकडून खेळण्यास नकार दिला. मिडलसेक्स कौंटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, 'आम्हाला सचिनशी करार करण्याची खूप इच्छा होती. त्याच्या निर्णयाने आम्ही निराश झालो आहोत. त्याच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्याचे मन वळविण्यात अपयशी ठरलो.''