Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सचिन तेंडुलकरचे 44वे कसोटी शतक
पीटीआय
Tuesday, January 19, 2010 AT 12:00 AM (IST)
चितगाव - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 44 वे शतक आणि भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दिलेले तीन धक्के, ही बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी झालेल्या खूपच कमी षटकांच्या खेळातील वैशिष्ट्ये ठरली. आज सुरवातीला धुक्‍यामुळे खेळ उशिराने सुरू झाला, तर नंतर अपुऱ्या प्रकाशामुळे तो लवकर थांबवावा लागला. त्यामुळे आज केवळ 24.5 षटकांचाच खेळ झाला.

 
तेंडुलकरच्या भक्कम खेळामुळे भारताला 243 धावांपर्यंत मजल मारता आल्यानंतर बांगलादेशची दमदार सुरवातीनंतर 3 बाद 59 अशी अवस्था झाली होती.

बांगलादेशचाही डाव भारतापेक्षा वेगाने कोलमडणार, याचे संकेतच झहीर खान आणि इशांत शर्मा यांच्या वेगवान माऱ्याने दिले. त्यात प्रामुख्याने झहीरचा मारा अधिक भेदक होता. त्याच वेळी अपुरा प्रकाश बांगलादेशच्या मदतीस धावून आला. पहिल्या दिवशी भारताने सहा धावांत तीन फलंदाज गमावले होते, तर आज बांगलादेशचे तीन गडी पाच धावांतच बाद झाले.

 
भारताने कालच्या 8 बाद 213 वरून खेळावयास सुरवात केल्यावर आज 30 धावांची भर घातली. त्यात अर्थातच बहुतेक सर्व वाटा होता, तो तेंडुलकरचा. त्याने 29 धावांची भर घालताना आपले 44 वे शतक झोकात साजरे केले. त्यानंतर झहीरच्या रूपाने बांगलादेश संघावर वादळ धडकले. त्यातून त्यांना सावरले ते अपुऱ्या प्रकाशाने. आता उद्या तिसऱ्या दिवशी अर्धा तास लवकर खेळ सुरु होईल व त्याचा फायदा भारतीय गोलंदाज उठवतील, असे वाटते. तेंडुलकरला 44 वे शतक खुणावत असताना, त्याने महत्त्व दिले ते भारताची धावसंख्या शक्‍य तेवढी वाढविण्याला, पण त्याच्या अखेरच्या दोन सहकाऱ्यांना बांगलादेशने फार वेळ टिकू दिले नाही.

तमिम इक्‍बाल आणि इम्रूल कायेस यांनी बांगलादेशला जोरदार सुरवात करून देताना 8 षटकांत 38 धावा फटकावल्या होत्या. झहीरच्या साथीला इशांत शर्मा आल्यावर धावगती मंदावली. दोघांच्या अचूकतेमुळे बांगलादेशचे फलंदाज त्रस्त झाले होते. अनेकदा ते चकत होते. त्यांच्याविरुद्ध वारंवार अपील होत होते. तीन षटकांत दोनच धावा झाल्यामुळे त्रस्त झालेल्या कायेसने उजव्या यष्टीबाहेरील चेंडूंचा पाठलाग केला. याच वेळी भारतीय गोलंदाजांची हुकुमत राखणार असल्याचे स्पष्ट झाले.

 
कायेसला काही वेळातच झहीरने पायचीत केले. त्याच्या वेगवान तसेच यष्टींवरील चेंडूचा कायेसला अंदाजच आला नाही. आयसीएलचा अनुभव असलेला शहरयार नफीस याने उसळता चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर इशांतने त्याला धावांपासून चांगलेच रोखले. इशांतच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंनी तो त्रस्त झाला होता. पुढच्याच षटकात झहीरच्या आत आलेल्या चेंडूने त्याला चकविले, तर त्यानंतर तमिम इक्‍बालही परतला. तो त्रिफळाबाद झाला, तेव्हा चेंडू त्याच्या बॅटच्या खालून गेला होता. अवघ्या अकरा चेंडूंनी बांगलादेशच्या कसोटीवरील वर्चस्वाच्या आशा दुरावल्या होत्या.

बांगलादेशच्या प्रत्येकाने सचिनसारखी खेळी करण्याचे स्वप्न बाळगले होते, पण ते फक्त सचिनच प्रत्यक्षात आणू शकतो, हे ते विसरले असावेत. सचिनने हाच फरक दाखवून दिला होता. त्याने भारताच्या धावसंख्येस काहीसा आकार दिला. सचिन मैदानात आल्यानंतर 164 धावा झाल्या, त्यातील 105 धावा त्याच्याच राहिल्या. आज 76 धावांवरून सुरवात केलेल्या सचिनने तळाच्या फलंदाजांना स्ट्राईकपासून अधिकाधिक दूर ठेवले आणि 89 वे आंतरराष्ट्रीय शतक केले. शकीब अल्‌ हसन व शहादत हुसेन यांनी प्रत्येकी पाच बळी घेत भारताचा डाव संपविला.

 
सचिनला फलंदाजीपासून अधिकाधिक दूर ठेवत भारताच्या तळाच्या दोन फलंदाजांना लक्ष्य करण्याचा बांगलादेशचा इरादा होता, पण पहिल्या सहा षटकात सचिनने इशांतला केवळ सहा चेंडू खेळू दिले व त्यापैकी एकाच चेंडूवर इशांत चकला. चार षटकांत अखेरच्या दोन चेंडूंच्या वेळी क्षेत्ररक्षक धावा रोखण्यासाठी पुढे येत, त्या कालावधीत सचिनने 2,4,1,4 आणि 6 धावा घेत नव्वदीत प्रवेश केला. शहादतचा "राऊंड दी विकेट' चेंडू मात्र इशांतला खेळता आला नाही. त्यानंतर श्रीशांतने पहिल्याच चेंडूवर धाव घेतली आणि सचिनने षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर शतक पूर्ण केले. शकीब अल्‌ हसनचा श्रीशांतने आत्मविश्‍वासपूर्वक सामना केला. त्याच्यानंतरच्या षटकात अखेरचा चेंडू अप्रतिम वाईड यॉर्कर टाकत शकीबने सचिनला अखेरच्या चेंडूवर धाव घेण्यापासून रोखले. त्यानंतरच्या षटकात शकीबने श्रीशांतला टिपले, पण भारताचा डाव झटपट संपविल्याचा बांगलादेशचा आनंद त्यांना बसलेल्या धक्‍क्‍यांमुळे फार वेळ टिकला नाही.

धावफलक
भारत - पहिला डाव
कालच्या 8 बाद 213 वरून
सचिन तेंडुलकर नाबाद 105
246 मिनिटे, 166 चेंडू, अकरा चौकार, दोन षटकार
इशांत शर्मा झे. मुश्‍फिकर रहिम गो. शाहदात हुसेन 1
41 मिनिटे, 24 चेंडू
एस. श्रीशांत झे. इम्रूल कायेस गो. शकीब अल्‌ हसन 1
13 मिनिटे, 12 चेंडू
अवांतर 13
एकूण 70.5 षटकांत
सर्वबाद 243
बाद क्रम - 9-230
गोलंदाजी -
शफीउल इस्लाम
9-1-41-0
शाहदात हुसेन
18-2-71-5
रूबेल हुसेन
10-0-40-0
शकीब अल्‌ हसन
29.5-10-62-5
महंमदुल्ला
3-0-17-0
महंमद अश्रफुल
1-0-5-0
बांगलादेश - पहिला डाव
तमिम इक्‍बाल त्रि. गो. झहीर खान 31
81 मिनिटे, 45 चेंडू, सहा चौकार
इम्रूल कायेस पायचीत गो. झहीर खान 23
69 मिनिटे, 46 चेंडू, पाच चौकार
शहरयार नफीस झे. लक्ष्मण गो. इशांत शर्मा 4
महंमद अश्रफुल खेळत आहे 0
रकिबूल हसन खेळत आहे 1
एकूण 17 षटकांत
3 बाद 59
बाद क्रम - 1-53, 2-58, 3-58
गोलंदाजी -
झहीर खान
9-1-32-2
एस. श्रीशांत
3-0-13-0
इशांत शर्मा
5-1-14-1

दुसऱ्या दिवशी 24.5 षटकांचाच खेळ
या कालावधीत 89 धावांत पाच फलंदाज बाद
दोन दिवसांत 97.5 षटकांचाच खेळ
आत्तापर्यंत एकंदर 90.1 षटकांचा खेळ वाया
प्रतिक्रिया
On 7/30/2010 4:19 AM pratap khedkar said:
चक दे इंडिया..... झाले बहु होतील बहु परंतु यासम हा(सचिन).
On 1/20/2010 8:50 PM prakash said:
जय, सचिन बद्दल तू जे काही बोललास ते बरोबर नाही त्यावरून तुझ्या बुद्धीची कुवत कळली पहिले आपण कुठे आहोत ते तपासून पहा.
On 1/19/2010 5:13 PM sunil shingade said:
सचिन तेंडुलकर नाबाद 105
On 1/19/2010 1:11 PM suraj said:
वाह सचिन , भारताचे नाव मोठे केले .... कीप इत उप...
On 19-01-2010 12:11:54 Tushar said:
इस्ट ओर वेस्ट सचिन इज great
On 19/01/2010 3:51 AM Anup said:
सचिन संघासाठी खेळत नाही असे जर अजूनही कोणाला वाटत असेल तर त्यांना क्रिकेटबद्दल ज्ञान कमी आहे. जसे हुशार व्यक्ती नोकरी मध्ये पगारवाढ आणि फाजील मान मिळवण्यापेक्षा आपले काम चांगले करण्याकडे जास्त लक्ष देते आणि तिला फलस्वरूप त्या गोष्टी मिळून जातात. तसेच सचिन फक्त चांगले खेळतो आणि त्याचे विक्रम होत राहतात ( आणि हो त्याला मराठी कुपमंडूक टीका मिळतच राहते). हाच सचिन जर अमराठी असता तर कौतुक झाले असते. ह्याचा अर्थ आपण आणि आपल्यापैकी कोणी काही चांगले करू शकेल हा आत्मविश्वास नाही. सुधरा हो मंडळी.
On 1/19/2010 2:24 AM govind said:
शाब्बास सचिन!!! तू match वाचविणारा धीरोदात्त खेळ नेहमीच केला आहेस. पण आपले प्रती ब्राड्मान हे नाव सार्थ करणारा धडाकेबाज त्रिशतकी खेळ एकदा दाखवाच !!!आयुष्याच्या या वळणावर जिथे तुला कशाचीच ददात नाही व स्वत:च्या संघामधील स्थानाची चिंता नाही , तर हे कधी करणार. नाहीतर सुमार सेहवाग जे करू शकतो ते तू नाही केले तर ते आम्हाला बरे वाटणार नाही.
On 19/01/2010 01:29 Marathi said:
सचिन विरोधात बोल्नारयांनी आधी क्रिकेट समजून घ्यावे!
On 1/19/2010 12:33 AM aXXo said:
काही लोकांना ना (जय, आशिष, कोल्ते पाटील ) जगावेगळ मत मांडलं ना कि एकदम cool वाटत. Anyways... go to www.sachinandcritics.com & flush out your all misunderstandings about Sachin.
On 1/19/2010 12:24 AM aXXo said:
अरे kolte patil तू काळा दगड घे नाहीतर गोरा, पण Ponting कधीही Sachin च्या जवळपाससुद्धा येऊ शकणार नाही. स्वतः Ponting ने मान्य केलय ते. आणि लाराने एक दोन वेळा ३००+ रुन्स केल्या म्हणजे तो काही जास्त ग्रेट नाही झाला. त्या दोन्ही वेळा (३७५ & ४००) तो एकटा धावा करत होता. आपल्यात द्रविड, सेहवाग असे बाकीचे बरेच contributors असतात. त्यामुळे सचिनला तेवढ्या रुन्स करण्याची कधी गरज पडली नाही.
On 1/18/2010 8:27 PM sunil khorate said:
no dout sachin is the only man who can perform such type of performance.he is the great player and specialy motivative team leader,congrats sachin for u r one more century.
On 1/18/2010 8:17 PM Daulat said:
what a great inning by Sachin Tendulakr. Dhoni we मिस यौ इन middle order.
On 1/18/2010 8:04 PM Prashant said:
सचिन ला मानाचा मुजरा .....................
On 1/18/2010 7:31 PM ajit said:
जय & आशिष, तुमच्या बापाने तरी bat पकडली होती का रे ?
On 1/18/2010 7:23 PM Kolte Patil said:
सचिन पेक्षा लारा श्रेष्ट आहे. (४०० नाबाद ) आणि आज ना उद्या पोंटिंग सचिनचा सर्वाधिक रन व सर्वाधिक शतक विक्रम मोडणार हि काळ्या दगडा वरील रेघ आहे
On 1/18/2010 7:03 PM MP said:
S10-The Great Player,like Michael Phelps, KapilDeo,Sunil Gawaskaer and Don Bradmon.....
On 1/18/2010 6:13 PM Nilesh said:
हाती ( सचिन) चले बझार, कुत्ते (आशिष, जय) भोके हजार .!!!
On 1/18/2010 5:40 PM prasad chande said:
मनापासून सचिन चे आभिनंदन ४४ शतक पूर्ण केले म्हणून. अजून ६ शतक पूर्ण कर आणि शतकाची अर्धे शतक लवकर पूर्ण कर आणि जास्तीत जास्त रण काढत जा पुन्हा अभिनंदन
On 1/18/2010 5:06 PM SSD said:
मला अजूनही काळात नाही कि पूर्ण जगात सचिनबद्दल असूया, मत्सर, जळफळत राहणे ह्या गोष्टी महाराष्ट्रात सर्वात जास्त का आहेत. भारतातच काय पूर्ण जगात सचिनबद्दल वाईट बोलल्याचे कुठे ऐकले नाही. महाराष्ट्रात मात्र असे हजारो शेंबडे आहेत कि त्यांना सचिनची प्रगती म्हणजे स्वतःचा अपमान वाटतो कि काय देव जाने? anyway तुम्ही जळत राहा ( कुत्र्यासारखे भुंकत राहा ) सचिन पुढे जात राहील.
On 1/18/2010 3:41 PM ashok said:
congratulation 44th Centurey लवकरात लवकर १०० शतक पूर्ण कर. आनी इंडियाला वर्ल्ड कप २०११ मिळवूनच निवृती घे. best of luck sachin
On 1/18/2010 3:31 PM PV TODANKAR said:
आशिष आणीत जय करिता ------- are जाल्कुकाद्यानो तुम्चात दम असेल तर उतारा मैदानात.........आणि दाखवा दम असेल तर..........
On 1/18/2010 3:20 PM PV TODANKAR said:
शाब्बास ! सचिन ........ रिची पोन्तिंग च्या पोटात गोळा आला रे..............
On 1/18/2010 3:19 PM PV TODANKAR said:
शाब्बास ! सचिन ........ रिची पोन्तिंग च्या पोटात गोळा आला रे..............
On 1/18/2010 3:17 PM 10dulkar said:
हि पहा सचिन वास जाळणारी माणसे.... अरे माझ्या मित्रानो जरा इकडे लक्ष द्या. आज भारताने २४३ धावा केल्या... त्यापैकी सचिन ने किती केल्या??? उत्तर आहे १०५ मग २४३-१०५ ??? उत्तर आहे १३८ आरे जवळपास संघाच्या आर्ध्या धावा सचिन नेच काढल्या आणि शेवट पर्यंत बाद न होता बिच्र्याला कोणची हि साथ नाही मिळाली
On 1/18/2010 3:13 PM Avinash said:
कोण रे हा जय??, सचिन बद्दल वाटेल तो बोलतोय. सचिन भारताचा कोहिनूर आहे.
On 1/18/2010 3:01 PM Sachin said:
सचिन च्या नावामध्येच विक्रम आहे . जागा मधला एक मेव खेळाडू आहे तो.... Batting and fielding averages Mat Inns NO Runs HS Ave BF SR 100 50 4s 6s Ct St Tests 162 265 28 12970 248* 54.72 43 54 52 104 0 ODIs 440 429 40 17394 186* 44.71 20249 85.90 45 93 1901 182 134 0 First-class 264 416 44 21859 248* 58.76 70 100 172 0 List A 527 514 54 20946 186* 45.53 56 111 169 0
On 1/18/2010 2:54 PM Mumbaikar said:
'आशिष' तुजी लायकी aahe काय sachin समोर ubhi राहायची .... tuzya सारखे बावळट मूर्ख mansachi kaame तीच ....... कोणाचे हि chagale pahavat naahi ......
On 1/18/2010 2:53 PM pradeep patil said:
सचिन कुठल्याही मैदानावर खेळू शकतो म्हणून तो जगातला नंबर १ खेळाडू आहे.
On 1/18/2010 2:38 PM jay said:
काही नवल नाही. आम्हाला मत विन्नेर माणूस हवा. फक्त आपले रेकॉर्डची तुनतून हा वाजवतो. त्याला मच विनेरची सर येणार नाही. अप्पलपोट्या माणूस आहे हा. अपना सपना मनी मनी.
On 1/18/2010 2:36 PM ashish said:
महत्वाच्या match मध्ये काय करतो ते जगाला माहिती आहे फालतू तुमच्या सारखे लोक त्याल डोक्यावर घेतात
On 1/18/2010 1:49 PM ujwala Naik said:
aata asha pratikriya nakot ki sachin vayaktik vikramasathi khelala. Tyala khelaila jamle aani itarana jamel nahiye. Sachin fakta ubha rahato aani vikram hot jatat...... samajle
On 1/18/2010 1:32 PM nikhil said:
sachin tendulkar is the greatest batsman in the universe there is no other batsman like him
On 1/18/2010 1:16 PM AMIT said:
सचिन इस बेस्ट क्रिकेटर
On 1/18/2010 1:14 PM vaishali said:
वाह सचिन, तुझ्या मुले आज या धावा करता आल्या, नाहीतर आधीच डाव आटोपला असता.
On 1/18/2010 1:06 PM SSD said:
अभिनंदन सचिन. तू ग्रेट आहेसच. पण सचिनवर जळनार्यांच्या प्रतिक्रिया अजून कश्या आल्या नाहीत?
On 1/18/2010 12:48 PM Arvind said:
Sachin congratulation for scoring 44th century with remaining not out. Well done Sachin! You have played in crisis when all top batsmen except Viru and Ganbhir backed to pavillion without scoring double figure.
On 1/18/2010 12:08 PM laxman said:
savadhan , pointing mage aahe. patapat ajun centurya kar
On 1/18/2010 11:53 AM D J said:
Sachin is always great. कीप इत उप ...................
On 1/18/2010 11:45 AM sandip said:
mast khela yar tu
On 1/18/2010 11:32 AM Sachin said:
vaah re Sachya !!!!!!!!!!!!!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: