Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

भोसरीत सराईत गुंडाचा खून
सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 30, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: pune,   crime,   murder

भोसरी -  अनैतिक संबंधातून एका सराईत गुंडाचा डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. गुरुवारी (ता. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास येथील बालाजीनगर झोपडपट्टीत ही घटना घडली.

किसन भरत शिंदे (वय 50, रा. सध्या काळाखडक झोपडपट्टी, वाकड मूळचा बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अकबर मुनीर शेख (वय 42, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यास अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेख याला शुक्रवारी पिंपरी न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत (एक फेब्रुवारी) पोलिस कोठडी देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे याची पत्नी शांताबाई यांनी या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किसन शिंदे याच्या नावावर चोरी, घरफोडी असे विविध प्रकारचे नऊ गुन्हे भोसरी, विश्रांतवाडी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. पोलिस त्याचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. किसनचे दोन महिलांशी अनैतिक संबंध होते. त्यांपैकी एकीशी अकबरचे अनैतिक संबंध जुळल्याचे समजल्यावरून किसन चाकू घेऊन रात्री बालाजीनगर झोपडपट्टीत आला. त्याला पाहताच अकबर एका मुलाला "चल येथून पळ' असे म्हणाला. त्या वेळी त्या मुलाने किसनला दगड मारला. त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर अकबरने मोठा दगड किसनच्या डोक्‍यात घातला; तसेच तलवारीचे चार-पाच वार केले. त्यात किसनचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसांना रात्री उशिरा समजले. त्यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, सहायक निरीक्षक प्रभाकर पवार यांनी तातडीने तपास करून अकबरला अटक केली; तसेच किसनला दगड मारणाऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. या प्रकरणी श्री. चौधर तपास करीत आहेत.
प्रतिक्रिया
On 10/10/2011 02:32 PM pasha said:
अहो नायर साहेब तुमच्या नावाच्या टोळ्या सुद्धा मुंबईत आहेत म्हणून कोणी त्यांची बाजू घ्यावी हे चूकच आहे . परंतु ते कोणी साधू नव्हते बरे झाले गेले ते जैसी करणी वैसी भरणी. इथच करा इथच फेडा न्यायाची वाट कोणी बघा
On 7/31/2010 4:44 PM nair said:
अहो हणमंतराव मरणारा शिंदेच होता पण आपणास त्याचे काही सूतक नाही? मात्र आपला मुद्दा बरोबर आहे
On 4/30/2010 10:49 AM Hanmant Shinde said:
एकमेकाला मारणाऱ्या गुन्हेगारांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. असेच एकमेकाला मारत मारत मरून जाउदे त्यांना.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: