Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दक्षिण अमेरिकेतील तरूण 'मराठी' प्रवास...
वैभव पुराणिक, लॉस अँजलिस, अमेरिका
Saturday, February 13, 2010 AT 12:12 PM (IST)
एक मराठी तरूण. वय वर्षे २८. अमेरिकेत जन्मलेला. तेथेच राहणारा. त्यानं स्वप्न पाहिलं. दक्षिण अमेरिकेत मोटारसायकलवरून प्रवास करण्याचं. विरून जाऊ न देता हे स्वप्न त्यानं वास्तवात उतरवलं. 'ए घोस्ट ऑफ चे - ए मोटारसायकल राईड थ्रू स्पेस, टाईम लाईफ अॅन्ड लव्ह' या नावानं पुस्तकरुपानं हा स्वप्नवत प्रवास अमेरिकेत प्रसिद्ध झाला आहे. त्याविषयी....

युष्यात अनेक वेळा आपण स्वप्नं पाहतो. दिवसा बघितलेल्या या स्वप्नात अनेक वेळा शक्य कोटीतीलही अनेक स्वप्ने असतात. बहुतेकांची अशी स्वप्ने हवेतच विरुन जातात. पण मौक्तिक कुलकर्णी या २८ वर्षीय मराठी तरुणाने मात्र असंच एक स्वप्न बघितलं आणि ते साहसाने साकार करुन दाखवलं. 

पाच हजार मैलांचा प्रवास
चे गुव्हेरा हा एक प्रसिद्ध दक्षिण अमेरिकन  क्रांतिकारक. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मोटरसायकलवरुन दक्षिण अमेरिकेची सफर केली. त्याच्या या प्रवासामध्ये त्याने काढलेली टिपणे 'मोटारसायकल डायरीज' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यावर काढलेला चित्रपट पाहून अमेरिकेत न्यरॉलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेत  असलेल्या मौक्तिक कुलकर्णीने ठरवलं आपणही असाच मोटरसायकलवरुन दक्षिण अमेरिकेचा प्रवास करायचा. आपला बेत त्याने दोन तीन मित्रांना सांगितला. मित्रांनी तर त्याला वेडातच काढलं.  दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिशशिवाय कुठलीही भाषा न बोलणाऱ्या आणि जगातील सर्वात सुकं वाळवंट असलेल्या प्रदेशात सुमारे पाच हजार मैलाचा प्रवास एकट्याने आणि मोटरसायकलवरुन करणे ही काही साधी सुधी गोष्ट नव्हती. जळगावात असलेल्या आई वडीलांना तर सांगण्यात अर्थच नव्हता. अमेरिकेत असलेल्या भावालाही त्याने आपल्या या बेताची खबर लागू दिली नाही.

सुरूवातीलाच 'बंद'
पदव्युत्तर शिक्षण संपवून नोकरीवर रुजू होण्यापूर्वी त्याने संधी साधली आणि अचानक कोणालाही न सांगता तो एक बॅगपॅक घेऊन पेरुमधील एका विमानतळावर उतरला. प्रवासाच्या सुरुवातीलाच एक झटका बसला. कुझको या पेरुमधील शहरात ट्रव्हल एजंटस् नी बंद पुकारला होता. त्यामुळे पेरुमधून मोटरसायकल पुढच्या देशात घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र वेळेवर मिळणार नव्हते. जागोजागी लोकांनी रस्ते बंद करुन ठेवले होते (जगात इतरत्रही असेच बंद होतात हे ऐकून कदाचित मुंबईकरांना बरं वाटेल!). एक दिवस फुकट जाणार होता. आणि सुरुवातीलाच ही गत तर पुढे काय वाढून ठेवलं होतं देवच जाणे! 

आणि आता वादळ...
जसं जसं तो पुढे जात गेला तसं तसे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत गेले. चिले मध्ये जगातील सर्वात सुकं वाळवंट आहे. अँडीज पर्वतरांगाच्या पश्चिमेला पसरलेल्या या वाळवंटात वाळूची मोठमोठी वादळे येतात. अशाच दोन वादळात तो मोटरसायकल चालवत असताना सापडला. ताशी शंभर किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वाळूच्या वादळाने आसमंत भरुन गेला होता. दहा फुटापेक्षा जास्त अंतरावरचं काहीही दिसणं अशक्य. आजूबाजूला जीवसृष्टीच्या खुणाही नाहीत. दोनशे किलोमीटर प्रवास करुन पुढचं शहर अंधार होण्याआधी गाठणे आवश्यक असल्याने थांबणेही शक्य नव्हते.  वाऱ्यामुळे धडावर डोकं शाबूत ठेवण्यासाठीही प्रयत्न करावे लागत होते. वाऱ्यामुळे मोटरसायकल एका बाजूला झुकत होती. 'आपण चूक केली की काय?', 'परत फिरावं का?' असे विचारही त्याच्या मनाला चाटून गेले. अखेर कसंबसं वादळ शमलं. पण पुढच्या दोनशे किलोमीटरमध्ये पुन्हा एकदा याच दिव्यातून जाणं त्याला भाग पडलं.

हेलावणारी हिप्पीची भेट
अर्जेटिंनामधून जात असताना एका हिप्पीला त्याने लिफ्ट दिली. एक दिवस त्या हिप्पी बरोबर प्रवास केल्यावर त्याला जे कळलं ते त्याच्या मध्यमवर्गीय मनाला धक्का देणारं होतं. दुपारी जेवायला थांबल्यावर त्या हिप्पीने काहीच मागवले नाही. कारण त्याच्याकडे पैसे नव्हते. संध्याकाळी एका ठिकाणी थांबल्यावर त्याने दुकानदाराला आपण बनवलेले काही दागिने देऊन त्याच्या बदल्यात खाणे मिळवले. तोडक्या मोडक्या स्पॅनिशमध्ये बोलताना मौक्तिकला कळलं की हा हिप्पी एक भटका कलाकार आहे. त्याच्याकडे एका छोट्या पिशवीइतकंच सामान आहे. छोटे छोटे दागिने बनवायचे आणि दुकानात ते विकायला देऊन त्याच्या बदल्यात दुकानदाराकडून खाणं अथवा पैसे मिळवायचे. अशीच गुजराण करत देशभर भटकत रहायचं पण भीक मागायची नाही! एक पिशवी आणि हातातली कला एवढीच संपत्ती! आणि त्याच्या बळावर तो हिप्पी आपलं आयुष्य घालवत होता. आपण अनेक वेळा कितीतरी लहान सहान आणि क्षुल्लक गोष्टीसाठी रडत बसतो. पण ह्या हिप्पीने मौक्तिकला जणू साध्या जीवनाचं रहस्यच सांगितलं होतं. 

भेट वल्लींशी...
त्याला प्रवासात अनेक अशाच वल्ली भेटल्या. एक चिलेतील मोटर मेकॅनिक, एक ब्राझिली मुक्त भटक्या, बेल्जियन सायकलपटू, जर्मन समाजसेवक आणि मदत करणारे अनेक पेरुवीयन. अनेक संकटांना त्याला तोंड द्यावे लागले. मोटरसायकल दोनदा बंद पडली आणि तीही वस्तीपासून दूर डोंगराळ भागात. एकदा ती ट्रकला बांधून दोरीने अोढून न्यावी लागली. पण या सगळ्यातून तो तावून सुलाखून बाहेर पडला. जीवनाविषयी बरंच काही शिकला. भाषा, धर्म, जात, रंग असे कुठलेही साम्य नसणाऱ्या माणसांनी त्याला मदत केली. माणुसकी म्हणजे काय हे त्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं.  माणसांबरोबर त्याला निसर्गही ह्या सफरीत भेटला. हजारो किलोमीटर पसरलेल्या उजाड वाळवंट त्याने अनुभवलं तसंच त्याने झाडा झुडुपांनी आच्छादलेल्या पेरुमधील माचु पिच्चु या ८००० फुटी पर्वतावर चार दिवसांचं गिर्यारोहणही केलं. पेरु, चिले आणि अर्जेंटिना या तीन देशात त्याची सफर झाली. या देशातील लोकजीवन त्याला जवळून बघायला मिळालं. अखेर त्याने हे सगळे अनुभव शब्दबद्ध करायचं ठरवलं. त्यातूनच जन्म झाला - ए घोस्ट अॉफ चे - ए जर्नी थ्रु स्पेस, टाईम, लाईफ, अँड लव्ह या पुस्तकाचा. त्याचे हे पुस्तक अमेरिकेत इंग्रजीत प्रकाशित झाले असून त्याचा मराठी अनुवाद लवकरच भारतात प्रकाशित होईल अशी आशा आहे.

प्रेरणा देणारं पुस्तक
मौक्तिकचा जन्म अमेरिकेत झाल्यानंतर त्याच्या डॉक्टर वडिलांनी तो चार वर्षाचा असताना अमेरिका सोडली. ते जळगावात स्थायिक झाले. मौक्तिकचं शिक्षण जळगावात आणि पुढे पुण्यात झालं. वयाच्या एकवीसाव्या वर्षी तो जॉन हॉपकिन्स या प्रसिद्ध विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत परतला. जॉन हॉपकिन्समध्ये त्याने न्यूरॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. जन्माने अमेरिकन असलेला मौक्तिक बाकी सर्व गोष्टीत मात्र शंभर टक्के भारतीय आहे. त्याच्या ह्या साहसाची कथा वाचून भारतीय आणि विशेषत: मराठी तरुण तरुणींना नवनवीन शिखरे सर करण्यासाठी प्रेरणा मिळेल यात मला शंका नाही.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 17-09-2010 15:59:37 Prasant said:
फार सुंदर लेख . काही वाचकांच्या भूगोल चा गाड ज्ञान वाचून कीव पण आली
On 8/25/2010 8:12 PM pallavi said:
खूपच छान !! मौक्तिक, तुमचे खूप अभिनंदन !! मराठी तरुणांनी आपली रग अशा साहसामध्ये लावावी असे वाटते. खूप फिरावे, वेगवेगळ्या लोकांना भेटावे व भरपूर अनुभव मिळवावा. शिवाय रांधा-वाढा-उष्टी काढा किंवा घर-नोकरी अशा धबडग्यात अडकलेल्या माझ्या सारख्या सर्व सामान्यांना हे खूपच प्रेरणादायी आहे.
On 8/20/2010 9:32 PM Mohini said:
great daring great success
On 7/22/2010 4:57 PM Sachin said:
उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ह्यांचा भौगोलिक दृष्ट्या काहीही संबंध नाही. दोन्ही खंडांचे हवामान, लोक, जीवन मान वगैरे मध्ये खूप फरक आहे. ज्या प्रमाणे पुणे शहर आणि पुणे ग्रामीण मध्ये आहे..:-).. दक्षिण अमेरिके मध्ये बाइक घेऊन फिरायचे म्हणजे सोप्पी गोष्ट नाही...Congratulations मौक्तिक..नाव पण छान आहे हो..!!
On 7/4/2010 8:26 PM Bhushan More said:
काही लोकांना आपण काय प्रतिक्रिया देत आहोत याचं भान नसते. लेखकाला लेख वाचून पाहण्याचा सल्ला देण्यापेक्षा स्वतः व्यवस्थित वाचला पाहिजे. अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत तेवढाच फरक आहे जेवढा पश्चिम बंगाल व बांगलादेश यांच्यात आहे.
On 6/24/2010 12:30 PM संजय, कॅनडा said:
@ ek-marathi मी पुण्याला आल्यावर तुला अजिबात भेटणार नाहीये मला कल्पना नव्हती कि अमेरिकेला जाणे तुझ्या इतके जिव्हारी लागेल तुम्हा लोकांना मंगळवार पेठ आणि जुन्या बझारची वर्णने आवडत असावीत !!!
On 5/30/2010 12:25 PM sudhir metkar said:
लेंख चांगला वाटला.मीपण जळगाव चा असल्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन.मी पत्नी समवेत अमेरिकेला नुकताच २००९ साली जाऊन आलो.माझे नातीचा जन्म ही अमेरीकॅत झाला.तीआता दोन महिन्याची आहे.ती पण असाच अमेरिकेत प्रवास करेल अशी आशा बाळगू या .
On 5/19/2010 11:33 AM ek_marathi said:
अभिनंदन !! गुड, कोणीतरी अमेरिका शिवाय प्रवास वर्णन लिहिले. नाहीतर नेहमीचेच बाळबोध पुणेकर माझा मुलगा / मुलगी अमेरिकेत.. विमान प्रवास वगैरे वगैरे. आणि नंतर अमेरिकेला न गेलेल्या लोकांसमोर लई भारी गप्पा मारतात. अशा लोकांनी radio / TV वर कार्यक्रम करावेत - म्हणजे चानेल बदलता येईल. दक्षिण अमेरिका खूप खूप सुंदर आहे अगदी उत्तर अमेरिकेपेक्षाहि - (गुगल वर "माया" शोध करा.) - sunder article !! Keep it up !! and Be a sport!! इथल्या अमेरिकन लोकांना देखील south America चे खूप वेड आहे.
On 3/8/2010 2:21 PM Pratibha Buche,Nagpur said:
pravas karnaryachya dhadila salam. Mag to Bharatatil aso va America asa pharak karu naka.
On 2/26/2010 4:32 PM cyberdaku@gmail.com said:
भन्नाट आणि अचाट .... असेच वर्णन करावे लागेल .. बरेचसे टिपिकल पुणेकर टोमणा मारून मोकळे पण झाले पण कधी मोटारसायकल वरून सलग १०० कि मी (काटकर न्हवे !! ) प्रवास कडून दाखवा आणि मग प्रतिक्रिया द्या.. प्रत्येक गोष्टीत माझा काय फायदा... माझा काय तोटा..... बास करा कि राव आता. आपणच निवांत तंगड्या वर करून निपचिप बसायचे आणि दुसरा कुणी माझा फायदा करून देतो का असा विचार करत बसायचे.. भविष्य हातावर लिहिलेले नसते...मनगटावर लीहिलेले असते .मराठी माणूस इथेच मागे पडतो....! मौक्तिक च्या साहसाबद्दल त्रिवार मुजरा !!!!
On 2/26/2010 12:01 PM Me marathi said:
फारच अप्रतिम लेख...अभिनंदन तुझे !!!.....यात महाराष्ट्राचा फायदा काय विचारानार्याची कीव येते....मराठी माणसाने का संकुचित राहावे ??...उलट जगाच्या कान्या कोपरात जाव मराठी चा प्रसार करावा...धमक नसेल तर निदान कौतुक तरी करावे....
On 2/25/2010 5:47 PM nagrik said:
लोकांना कशाचा उदो उदो करायचा हे पण कळत नाही . अमेरिका म्हंटला कि लगेच डोळे पांढरे करतात. जे आधीच अमेरिकेत जावून बसले आहेत त्यांना मायदेशात परत यायची वेळ आली आहे. आणि इथल्या लोकांना अमेरिकेची दिवास्वप्ने पडत आहेत. सुजान लोक हो जरा स्वदेशाचा अभिमान पण बाळगायला शिका. आमचा भारत हा अमेरिकेपेक्षा कमी नाही ..... हं या देशाला प्रामाणिक राज्यकर्ते मिळाले नाहीत हि गोष्ट वेगळी आहे . पण म्हणून का आपण आपल्या देशाला कमी लेखायचं का ..........
On 2/25/2010 4:32 PM bharatiya said:
मला एक कळाल नाही. "अमेरिकेत जन्मलेला. तेथेच राहणारा. त्यानं स्वप्न पाहिलं. दक्षिण अमेरिकेत मोटारसायकलवरून प्रवास करण्याचं. " जो माणूस अमेरिकेत जन्मलेला आहे तो त्याच देशामाधल्या रस्त्यावरून मोटारसायकलवरून प्रवास करण्याचं स्वप्ना बघतो यात अनवीन असा काय आहे . याचा अर्थ असा होतो कि पुण्यामध्ये जन्मलेल्या माणसाने पुण्यातून मोटारसायकलवरून प्रवास करण्याचं स्वप्ना बघणे. मला तरी यात काहीच विशेष वाटत नाही. हान तो भारतात जन्मला असता आणि त्याने तसे स्वप्ना पहिले असते तर त्याला खरोकाहारच मानला असता .
On 2/25/2010 4:04 PM Vinayak Potghan said:
जीवनाची दुसरी बाजू पहाणे नेहमीच चांगले आस्ते. भारतामध्ये आपणाला नेहमीच बाकीचे जग चांगले वाटते. पण प्रत्यक्षात तसे नाही. तसेच एक निरीक्षक जे लिहितात कि कुलकर्णी जर भारतात राहतात तर मौक्तिक अमेरिकेत कसा. लेख जरा नीट वाचला तर हे समजून येईल.
On 2/25/2010 2:06 PM एक निरीक्षण said:
कुलकर्णी काका आणि काकू जळगाव ला रहातात, मग त्यांचे चिरंजीव अमेरिकेत कसे जन्मले? (......माज़या मते वैभव पुराणीकांनी लेख लिहिल्यावर शांत पणे वाचून नाही बघितला. मौकटीक च्या धाडासा बद्दल वाद नाही...अत्यंत प्रेरनादायी).
On 2/24/2010 5:15 PM vijaya said:
फारच धाडसी आहे मौतिक. वेरी गुड यार. असाच पुढे जात राहा vijaya. भरपूर शुबेचा तुम्हाला
On 24/02/2010 15:16 atul said:
'hats off to Mauktik' ! सकाळ नेही बऱ्याच दिवसांनी 'एक हटके ' लेख लिहिला... त्यांचेही अभिनंदन... सध्या आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे ते विदारक आहे... आणि त्यावर लिहिल्यागेल्या बातम्यांचे माथळे वाचून मन सुन्न होत असताना अशी बातमी वाचण्यात यावी म्हणजे जणू वाळवंटामध्ये तहानले असतां एकदम ओआसीस नजरेस पडावे.... अशी एकूण ईकडची परिस्थिती जाहली...
On 2/24/2010 11:43 AM Ganesh said:
छान कौतुक करावस वाटतय... मराठी अनुवादाची वाट बघतोय. आणि हो एक फेरी महाराष्ट्राचीही कर... इथे बरच काही आहे मित्रा...एक नविन महाराष्ट्र घडवायला तुझे अनुभव कमी येतील...
On 2/22/2010 9:31 PM राजेश पाटील said:
मौक्तिक चे अभिनंदन !!! पण त्याने त्याचे पुस्तक हे मराठीत लिहायला हवे होते !!! तेव्हडीच मराठीची मान ताठ झाली असती !!!
On 2/22/2010 8:19 AM s.m.Bhave said:
मला तुझा एमैल ईद हवा आहे माझा ईद समभावे@याहू.काम आहे तरी कृपा करून मला मैल कर आणि माल तुझा फोने नो पण दे तुझा श्रीपाद भावे
On 2/21/2010 3:22 AM Mahesh said:
Rustam tujha mail id dewu shakatos ka? mala join karayache aahe sadhya mi swiss madhe aahe pan asach plan majha manat khup diwas hota, nakki mail id de kiva mala mail kar cmahesh91@yahoo.com
On 2/20/2010 12:54 PM Anand said:
वाह्ह्ह क्या बात हे !!! मराठी तरुण आशय अफलातून गोष्टी करू शकतो , खराज प्रेरणादायक , आत्माविःवास वाढवणारे आहेत , Please let us know about this book, i would definately like to read and know of this great marathi hero. Thanks Vaibhav for this info.
On 2/20/2010 11:21 AM sachin said:
मराठी माणसा चा आभिमान आणि आतमविश्वास वाढला आहे याचे एक उदहरण
On 2010-02-18 04:05 Tanaji More said:
wow, just amazing, very few has guts and try what their heart demands.. i am not a regular book reader but i am sure i will read this ...that too by purchasing orginal book...and not from other source its something about i always wonder..just by reading this news im planning to do something...lets see hope now his parents and friends are proud of him best wishes
On 2/17/2010 3:53 PM prashant said:
थान्क्स......वैभव..........
On 2/17/2010 3:51 PM prashant said:
मस्त रे.......अलचेमिस्त.....अस वाचयला भेटलं कि मजा yete........मौक्तीकला त्याच्या पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी shubhecha....
On 2/16/2010 11:46 PM अमित said:
हे पुस्तक amazon .com च्या बेस्ट सेलर्स च्या यादीत 868,११६ व्या कामांकावर आहे. NRI लोकहो, पुस्तक खरेदी करून आपण आपली जबाबदारी पार पडायला हवी.
On 2/16/2010 10:16 PM neeteen Vaidya said:
farach surekh............. pustache tapsheel sangal ka please? kuthe milel?prakashak,kimmat vagaire...vat pahato...
On 16/02/2010 16:54 Gurav Vijay said:
Great यार, The movie Motorcycle Diares is quite inspiring, the South American continent is very beautiful also. Please watch the movie, But Marathi Manasani mhanje aapan sagalyaani aata asach motha vichar karayla hava aahe.Aapan kharech khoop chote zaalo aahet due to these politicians, Chatrpati Shivaji Maharajanchi maanse aapan....
On 2/16/2010 1:28 AM Vishal said:
फारच धाडसी आहे मौतिक. वेरी गुड यार. असाच पुढे जात राहा वैभव. भरपूर शुबेचा तुम्हाला.
On 15/02/2010 01:35 Bal Bhim! said:
भारतीय राजकारण्यांनो शिका जरा काहीतरी!
On 15/02/2010 01:34 Marathi said:
तोडून मोडून फेकून दिलेत!
On 2/14/2010 11:37 PM dattu said:
ओक..पण महाराष्ट्र चा काय फिदा झाला त्यात ?
On 2/14/2010 10:54 PM Shriram said:
अभिनंदन मौक्तिक , खरोखरच स्फुर्तीदायक अनुभव आहेत तुझे .देव तुला सदैव यश देवो !
On 2/14/2010 10:57 AM Dr deshpande said:
वेगळे, नवीन आणि चांगले लिहिल्या बद्दल आभार चांगला आहे नाहीतर आजकाल फालतू लेख बरेच येत आहेत भारतीयाचा उद्धार करणारे तैवान series सारखे.
On 2/14/2010 7:14 AM Chandrakant said:
माझ्या मुलांनी नुकतीच एंक अजस्त्र ६५० cc मोटोर सायकल विकत घेतली आहे. मी त्याला मुक्तपणे सफर करण्याची मुभा देऊ शकेन असे वाटते.
On 2/14/2010 4:00 AM deeps said:
rustam मला पण यायला आवडेल नक्की कालवा
On 2/13/2010 10:54 PM जयदेव said:
एक नंबर भाव !! फक्त मराठीत अनुवाद व्हायची वाट बघतोय !!
On 2/13/2010 9:52 PM Dr Deshpande said:
Changla ahe nahitar aajkal faltu lekh barech yet ahet bhartiyacha uddhar karnare. - Taiwan series sarkhe navin ani changle lihilyabaddal abhar
On 13/02/2010 9:50 PM neellima said:
अभिनंदन. खरेच किती हा धाडसीपणा. पुस्तक मराठीतून आल्यावर कधी वाचेन असे झाले आहे
On 2/13/2010 9:36 PM Ajay Kumbhar said:
Very amazing...... it's very inspiring to Marathi youngster's to capable themselves to life's new challenges & achieve great through it. It's better to set life's goals rather than indulging in unnecessary political issues. Mautvik has been proved that Marathi peoples are able to set new unforgivable moments. It's time to grew up youngster's.......
On 2/13/2010 8:44 PM TheMask said:
अप्रतिम! Amazing!!!
On 2/13/2010 8:40 PM kalika said:
सही हे पुस्तक आता मी वाचणारच.
On 2/13/2010 5:10 PM भाऊराव कुम्भार said:
जय महाराष्ट्र..........................................
On 13/02/2010 17:06 Rustum Khedkar said:
अतिशय छान. मी देखील पुढील २ वर्षात (लंडन-परीस-पोलंड-रशिया-चीन-थायलंड-म्यानमार-बांगलादेश-भारत (पुणे)) अशी रेल्वे ट्रीप करायचे ठरवत आहे. कुणी जॉईन होऊ इच्छित असेल तर कळवा. कदाचित माझा एक मित्र जो अमरिकेत आहे तो जॉईन होणार आहे. दुसरी रेल्वे ट्रीप करण्याची इच्छा आहे ती (लंडन-परीस-इस्तंबूल-इराण-(अफगाण/पाक)-भारत (पुणे)). मात्र भीती आहे ती अफगाण/पाक प्रवासाची. बघुयात काय होते आहे आणि कोणता प्लान यशस्वी होतो आहे. आणि नंतर भारत भ्रमंती, हिमालय व मानस सरोवर सह.
On 2/13/2010 12:54 PM Sunil said:
प्रेर्नादाई! आत्ताच्या तरुण पिढीसाठी आवशक गोष्ट. पुस्तक मराठीमधून असायला हाव.
On 2/13/2010 12:42 PM Raj said:
really so much terrific and challenging.... Best Compliments to Mautvik.!!!!!
On 2/13/2010 12:29 PM Kshitij said:
मित्रा, तुझे अभिनंदन. नक्कीच मराठी असूनही तू केलेले धाडस अभिनंदनीय आहे. तुझे अनुभव तू भारतात जाऊन कधी तरी सांगावेत आणि अशीच एखादी भारत भ्रमंती करून आपल्या देशाचा पण थोडा अभ्यास करावा !!! तुझ्या सारख्या जग बघितलेल्या मराठी माणसांची आज महाराष्ट्राला गरज आहे कारण आजही आपला मराठी माणूस डबक्यात उद्या मारण्यात धन्यता मानतो आणि 'जय महाराष्ट्र ' म्हणून एकमेकांना शिव्या घालत आपलेच हशा करून घेतो. ह्या कुपमंडूक मराठी राजकारण्यामुळे महाराष्ट्राचे नाव आज सर्व भारतीय मध्ये खराब झाले आहे.
On 2/13/2010 12:14 PM sushant patil said:
छानच लेख. वैभव, या मौक्तिकची काहीच माहिती आम्हाला नाही. हे पुस्तक मराठीत आणले पाहिजेच. ई सकाळ तुम्ही काहीतरी करा. पुस्तक मराठीत आणा. धन्यवाद वैभव.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: