Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बॉम्बस्फोट - गरज तत्त्वांवर ठाम राहण्याची
ललित महाडेश्वर (अमेरिका)
Thursday, February 18, 2010 AT 07:51 PM (IST)
हशतवाद आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. तो आपण रोखू शकत नाही. दहशतवाद्यांकडून कोठे आणि का विध्वंस घडविला जाईल, हे आता प्रश्‍न उरले नाहीत. केवळ कधी हेच आपण विचारू शकतो. मानवी सभ्यता आणि लोकशाहीची सर्वमान्य तत्त्वे जपणाऱ्या आपल्या सारख्या सभ्य समाजाला दहशतवादाशी त्याच स्तरावर जाऊन लढणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे आपल्या तत्त्वांवर आणि जीवन मूल्यांवर ठाम राहूनच ही लढाई लढावी लागणार आहे.

मुलतत्ववादच कारणीभूत
दहशतवादाची सुरवात जरी सहाव्या दशकापासून झाली असली. तरी, गेल्या दोन दशकांत त्याची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. जगभरात त्यांचे थैमान सुरू आहे. आता ही लढाई लष्करी ताकदीच्या जोरावर जिंकता येणार नाही, हे सुद्धा अमेरिकेच्या इराक आणि अफगाणिस्तानातील अपयशाने सिद्ध झाले आहे. या राक्षसाविरोधात लढण्यासाठी जनतेने जागृत होण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने जनसमुदायाला एका सामाईक आणि चांगल्या कारणासाठी चळवळीला उद्युक्त करेल असे नेतृत्वच आता दिसत नाही. त्यामुळे जनमत या विषयावर जागृतही केले जात नाही. मी म्हणतो तेच बरोबर आहे. इतरांनी त्याचे अनुकरण करावे, हा मूलतत्त्ववादच आजच्या युवकांना हातात शस्त्र घेण्यास भाग पाडत आहे. जगभरातील चांगले शिक्षण आणि भौतिक सुखसुविधा अशा तरुणांना हातात शस्त्र घेण्यापासून परावृत्त करू शकत नाहीत, हेही आता जगासमोर आले आहे.

अराजक...आणखी अराजक
साम्यवादी असो अथवा भांडवलशाही कोणतीही विचारधारा एका मर्यादेतच अडकलेली आपल्याला दिसते. साम्यवादी विचारधारेने नागरिकाचे मूलभूत हक्कच त्यांच्याकडून हिरावून घेतले होते. एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून निर्णय घेण्याचे कसलेच अधिकार त्यांच्याकडे नव्हते, या बंदीस्तपणाच्या अगदी विरोधी टोक भांडवलशाही आहे. या व्यवस्थेचा "बळी तो कान पिळी' हाच नियम झाला आहे. तुम्हाला जाहिरातीच्या मोहात गुंतवून तुमच्या खिशातून पैसा काढणे, हेच या व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मूलतत्त्ववाद्यांतही आपसांत संघर्ष आहेत. आपल्या गटांत माणसे ओढण्यासाठी किंवा मीच जास्त कट्टर आहे, हे दाखविण्यासाठी त्यांच्यातच होणारे रक्तरंजित संघर्ष थांबविण्यात त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे सर्वच बाजूनी अराजक आणि आणखी अराजक अशी स्थिती निर्माण झाली आहे.

स्वातंत्र्य हिरावण्याचा मार्ग...
जगाला भेडसावणारे असंख्य प्रश्‍न सध्या निर्माण झाले आहेत. अन्न आणि पाण्याची कमतरता, वातावरणात होत असलेले बदल, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, रोगराई या सारखे प्रश्‍न आपल्यासमोर आ वासून उभे आहेत. मानवाच्या कल्याणासाठी या प्रश्‍नांना भिडण्याऐवजी आपण वेगळ्याच मार्गावर जात आहोत. हजारो वर्षांपूर्वी आमच्या धर्मग्रथांत सांगितलेलेच सत्य, हा आव आणून प्रत्येकजण दुसऱ्याच्या जिवावर उठला आहे आणि खरी गोष्ट म्हणजे सर्वच धर्मग्रंथांनी शांततेने जगण्याचाच संदेश दिला आहे, याचा विसर यांना पडला आहे. आपल्या जगण्यावरच स्वार्थी आणि मतलबी राजकारण्यांनी अतिक्रमण केले आहे. हे सर्व सामरिक नीती आणि संरक्षणाच्या नावाखाली मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे पाहता हे दहशतवादविरोधी युद्ध नाही तर, आपल्या जीवनपद्धतीवर घातलेला घाला आहे. आपले स्वातंत्र्य, इच्छा, आकांक्षा याचे पंख कापण्याचे काम हे वाट चुकलेले तरुण करत आहेत. या तरुणांना काही काळासाठी सत्ता मिळेल, आपली धोरणे राबविता येतील, काही आर्थिक लाभही होईल. पण, एक गोष्ट नक्की आहे की, हे तरुणही त्यांनी ज्यांना विरोध केला त्यांच्याच मार्गावर जात आहेत. इतरांचे स्वातंत्र्य हिरावण्याचा मार्ग..

आळा कसा घालणार?
आपल्या स्वातंत्र्यावरील, जीवनशैलीवरील हा हल्ला रोखण्यासाठी आता सामान्य माणसानेच पुढे येण्याची गरज आहे. आपली व्यक्तिगत मते, आवड यांना बाजूला ठेवून दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी उभे ठाकले पाहिजे. आपल्या लोकशाहीचे रक्षणही आपणच केले पाहिजे. ठाम निश्‍चयाच्या आधारेच आपण या राक्षसी प्रवृत्तीला आळा घालू शकू.

प्रतिक्रिया
On 04/03/2010 03:13 shirish uk said:
कचरा माझ्या माहितीप्रमाणे लंडन मध्ये २०१० मध्ये काही झाले नाही. Also there was no major attack on usa after 9/11.
On 3/2/2010 10:16 PM Girish said:
ट्रुथ म्हणतो कि कवित इंडिया पण आज ऑस्ट्रेलियात भारतीयांना मारत आहेत तशीच परिस्तिथी त्याने सुचविलेल्या देशात उद्या झाली तर आपली अवस्था काय होईल? मग ना घरका ना घातका अशी होईल. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडोचा आदेश दिला होता ट्रुथ तो २०१० साली अमलात आणायचा विचार करत आहे का?
On 2/27/2010 5:52 PM kacharaseth said:
शिरीष, अहो मग, लंडन मध्ये वर्षानुवर्षे जे अतिरेकी हल्ले होत आहेत, ते काय सरकारने लावलेले करमणुकीचे खेळ आहेत? आयरिश आणि आत्ता मुस्लीम इतिरेक्यांनी २०१० मेध्येही बौम्ब स्फोट तेव्हा तुम्ही कुठे होतात? अमेरिका, इस्रायेल व इंग्लंड ही सर्व राष्ट्रे दहशतवाद रोखू शकली नाहीत, हे सिद्ध झाले आहे.
On 2/26/2010 3:59 PM dilip m bothare said:
नो कॉम्मेंत
On 26/02/2010 03:24 shirish uk said:
माझे मत असे कि दहशतvad कंट्रोल करणे सहज शक्य आहे फक्त सरकार ची इक्चा शकत हवी. अमेरिका आणि इंग्लंड पहा इथे एक अरी असा प्रकार घडवू शकत का हे लोक? कारान आहे security. आपलीa इथे साले भ्रष्ट पोलीस आणि सरकार आणि त्यांचे लांगुलचालन करणार त्यामुळे लोक हतबल आहेत त्याचा jab आपण का विचारत nahi?
On 2/25/2010 11:18 AM durdaiwane bharatiya, said:
अक्षय फक्त राजकारणी लोक नसून जनता पण कारणीभूत आहे. आपली जनता कुठल्याही देशात आपला स्वार्थीपणा, सामाजिक बेजबाबदार वर्तन इत्यादीत आघाडीवर आहे. सुनेला जाळणे, घरफोडी, भेसळ, करप्शन, चोर्या, अत्याचार- जातीय, लैंगिक, अंधश्रधा, हुंडा बळी, स्वछता,शिस्त, प्रामाणिकपणा यांचा अभाव, दारू सिगारेटचे व्यसन, या सगळ्यात आपण पुढे. माणसाचा माणसावर विशाव्ठेव्ने जिथे अवघड तिथे हे असेच व्हायचे. सरकारपेक्षा माणसांची वृत्ती कारणीभूत आहे. क्षेत्र वेगवेगळी परिणाम एकच. सुरक्षा, आरोग्य वा आहार सगळीकडेच असायचा हाहाकार .
On 2/24/2010 6:45 PM kaka said:
"मानवी सभ्यता आणि लोकशाहीची सर्वमान्य तत्त्वे जपणाऱ्या आपल्या सारख्या सभ्य समाजाला दहशतवादाशी त्याच स्तरावर जाऊन लढणे शक्‍य होणार नाही." मग कायदा- न्याय यंत्रणा असते कशाला? नपुसक 'सभ्यता' देशाचे निरोगी भविष्य निर्माण करू शकेल काय? आज देशाला महात्मा गांधी नव्हे तर रणरागिणी इंदिरा गांधींची गरज आहे. आठवा १९७१.
On 2/23/2010 8:12 AM akshay said:
aala ghalane mhanje kay? tyasathi desh powerful pahije je kadhi shakya nahi. mala vatate Truth che barobar aahe. he politians mhanje aaplya deshala ek shap aahe. voting karun kahi fayada nahi. sagalech bhrashtachari ani gund aahet. desh kharokharach budat aahe.
On 2/23/2010 3:15 AM mahesh said:
- implement same law to everyone - remove article 370 - declare the India as "Hindu State". This secularisum is killing us. Not hindu nor muslim are living in peace. - attack the enemy. If mosquitoes are biting then we can't decide that kill only those who are actually biting! Even goodnight/mosquito net will not useful. The only effective method is to attack the main source like open gutters. - only aggresiveness will kill this terrorisum. 'They' won't undestand Peace and prosperity.
On 2/22/2010 9:36 AM Anuja said:
that's right..nthere are problems in society...now it's time to think about solution on it and how...?.. some powerful education...which can create a genuine leader who will be real Kshtriya :) has to serve the society... any idea..? any good teacher who can create the great leaders..take care of democracy.. ..
On 2/21/2010 7:26 PM Lalit Mahadeshwar said:
अनुजा, तुम्हाला "अधर्म" ची जी व्याख्या अपेक्षित आहे, तो चोहीकडे पसरला आहे. दहशतवादी सुद्धा ह्याच अधर्माचे दाखले देऊन त्यांची दलभरती करत आहेत. स्वतःच्या आणि आपल्याच आप्तस्वकीयांच्या जीवावर उदार झालेल्या, वाट चुकलेल्या ह्या तरुणांना थोपवणे सोपे नाही. त्य्नाचा लढा हा आपल्या जीवनपद्धती विरुद्ध असेल तर त्याचा त्याग न करता दहशतवादाला दहशतीने मुकाबला करणे बिलकुल शक्य नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या सांस्कृतिक आणि नव्याने परिपक्व होत असलेल्या लोकशाहीच्या मुल्यांची जपणूक करण्यासाठी लढावे लागेल
On 2/21/2010 11:27 AM Anuja said:
i don't like Authors negative thinkings..In second sentence he said, we can't stop terrorism ..come on don't forget..अधर्माचा नेहमीच विनाश होतोय...
On 2/21/2010 9:59 AM Truth said:
Please Believe me. now time has come that we should quit india. It's impossible to live here. If you want live safely, go abroad, go to new zealand, scotland, switzerland, any peaceful country. you will miss india but at least you will be safe. Think of your future, ur family, children. Situation will be worse in coming years. I love India but it's just like Titanic now, slowly, it;s going to sink. There's no solution. Always Remember- Our life is extremely precious.
On 2/20/2010 9:54 PM ammy(from pune now in mumbai) said:
आधी आर्क्षानावारती आधारित वावस्था बदला samjatil दुफळी मितवा समान नागरी कायदा लागू करा फक्त स्वार्थासाठी चालवलेला हा आरक्षणाचा बाजार बंद करा मी भारतीय आहे मला कुठली हि जात पात नाहीये सगळे भारतीय माझे बांधव आहेत हि पार्थना प्रत्यक्षात उतरवा !
On 2/20/2010 7:39 PM yash said:
dahashvad ha samajik prashna aahe tyach barobar kattarta hi yaach khar mul aahe tyamule jati dharmala niyantranat aanane aani sarv dharmgurauna prashikshit kelyas kahi pramanat manviyata jagi hoil....
On 2/19/2010 6:37 AM sameer said:
Very well articulated thoughts.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: