Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

तिसऱ्या सामन्यात सचिन घेणार विश्रांती
वृत्तसंस्था
Thursday, February 25, 2010 AT 03:34 PM (IST)
ग्वाल्हेर - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून विश्‍वविक्रम नोंदविणाऱ्या सचिन तेंडुलकरने अहमदाबाद येथे २७ फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन सामन्यांची ही मालिका भारताने 2-0 अशी जिंकल्याने सचिनने स्वतःच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सामन्यातून सलामीवीर वीरेंद्र सेहवागलाही आराम देण्यात येणार आहे. सचिन विश्रांती घेतल्याने त्याच्याजागी संघात कोणाची निवड करण्यात आलेली नाही. आज चेन्नई येथे भारतीय संघ निवड समितीचे सदस्य भेटणार असून, यामध्ये तिसऱ्या सामन्यासाठी संघ निवडला जाणार आहे.
प्रतिक्रिया
On 2/25/2010 11:54 PM Rajaram Patil. said:
सार विश्व तुला स्यालुत करत आहे सचिन, जगाच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी भारताच नाव तुज्या ह्या अप्रतिम कामगिरीने सर्व्वोच्य शिखरावर कोरले गेले. केवढी स्तुती करावी तेवढी कमीच, "जय हिंद जय महाराष्ट्र "
On 2/25/2010 10:20 PM jotiram said:
Congratulations to SACHIN for his outstanding knock of 200* in last match. He is playing since last 20 years & to maintain the fitness for the upcoming world cup he must take rest & keep himself fit for the same. SACHIN India needs you for the world cup. Best of luck for the future & keep playing like this & give joy to millions of people of India.
On 25/02/2010 20:15 NITIN R. PATIL said:
सचिन नेहमीच संघाचा आणि सहकाऱ्यांचा विचार करतो, त्याला माहित आहे सिरीज जिंकलोय ते, त्यामुळे तो नवोदितांना संधी देतोय. सचिन तू ग्रेट आहेस वर्ल्डकपच्या द्रीष्टीने तू विश्रांती घेवून तू फीट राहा, कारण आम्हाला तूला वर्ल्डकप मध्ये म्यान ऑफ द सिरीज घेताना बघायचं. ये दिल मांगे मोर!!!!!!!!!!!!!!!!!
On 2/25/2010 5:58 PM Dhananjay said:
सचिन तुम्ही शेवट ची match खेळायला हवे, man of the series चा शर्यतीतून आपण बहार होणार हे ऐकून दुख होतंय. आपण जो निर्णय घेतला असाल तो विचारपूर्वक घेतला असेलच. २०० धावांचं पल्ला घातल्याबद्दल धन्यवाद.
On 2/25/2010 5:22 PM DATTATRAYA VYAVAHARE said:
सचिन तुम्ही एक असामान्य खेळाडू आहात .पण एक गोष्ट लक्षात ठेवा. world cup च्या दृष्टीने आपणास विश्रांती आवश्यक आहे.कारण आम्हा भारतीयांस आपल्या प्रकृतीची काळजी अधिक राहणार आहे.आपल्या द्विशाताकाबद्दल आपले त्रिवार अभिनंदन.
On 2/25/2010 5:10 PM suraj said:
इंटरेस्ट गेला.... सचिन शिवाय मजा नाही...
On 2/25/2010 4:12 PM ajay said:
Sachin must take rest after scoring 200 runs in second ODi against South Africa. Even Major batsman except Dhoni may take rest and given chance to other players.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: