Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अनिल भोसले यांचा राजीनामा?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 11, 2010 AT 01:16 AM (IST)
Tags: anil bhosale,   resignation,   ncp,   politics,   pune

पुणे - विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातूनही उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अनिल भोसले यांनी पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाचा राजीनामा महापौरांकडे दिल्याचे समजते. दरम्यान, भोसले यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न होत असल्याने राजीनाम्याबाबत महापौर मोहनसिंग राजपाल यांनी मौन बाळगले आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक जण इच्छुक असताना वंदना चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, पुन्हा डावलण्यात आल्याने भोसले यांनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा देऊन आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत ते शिवाजीनगर मतदारसंघातून इच्छुक होते. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या जादा असतानाही हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला गेला होता.
प्रतिक्रिया
On 05/11/2011 02:04 PM vikas chaudhari said:
वंदना ताईंचे काम खूप मोठे आहे कृपया त्यांच्या उमेदवारीबद्दल कोणीही आक्षेप घेऊ नये.आणि हे सगळीच माणसे जाणून आहेत.
On 07/01/2011 08:37 PM meghraj said:
अनिल भोसले यांचे काम खूप छान आहे. राष्ट्रवादी साठी त्यांनी खूप केले आहे. डावलू नये.
On 19/11/2010 08:34 PM Ati samanya manus said:
कोण आहे हे अनिल भोसले? कुणी सांगेल का यांची कीर्ती?
On 09/11/2010 07:37 PM samanya manus said:
आधी कामे करा ......लोकांना शिव्या घालणे थांबवा ...........तिकिटाच्या पाठीमागे लागू नका


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: