Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गांगुलीने धक्का दिलेल्या डेक्कनसमोर आता धोणी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, March 13, 2010 AT 07:51 PM (IST)

चेन्नई - सौरव गांगुलीच्या झुंजार नेतृत्व कौशल्यामुळे गतविजेत्या हैदराबाद डेक्कन चार्जर्सला सलामीला कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्ध हार पत्करावी लागली. या पराभवातून सावरण्यापूर्वीच हैदराबादला महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्या मैदानावर सामना करावा लागणार आहे.

गतस्पर्धेतील हैदराबादचे विजेतेपद जेवढे धक्कादायक होते, त्यापेक्षाही जास्त धक्का क्रिकेटतज्ज्ञांना त्यांच्या सलामीच्या पराभवाने बसला. आपण चांगली सुरुवात करून दिल्यावर पावणेदोनशेपेक्षा कमी धावांचे लक्ष्य आपल्या संघास गाठता आले नाही, हे गिलख्रिस्टला सलत असेल. त्यातच चेन्नईचा संघ कागदावरही भक्कम आहे. अष्टपैलू जस्टिन केम्पमुळे चेन्नईची ताकद वाढली आहे; पण त्यांची गोलंदाजी काहीशी कमकुवत आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचे चेन्नईचे लक्ष्य असेल.
दोघांमधील यापूर्वीच्या चेन्नईतील लढतीत हैदराबादने सात गडी राखून विजय मिळविला होता; पण हा इतिहास विसरून चेन्नई सलामीच्या पराभवाने खच्ची झालेल्या हैदराबादला अधिक खच्ची करण्याचा प्रयत्न करील. अर्थात वास आणि हेडन यांच्यातील सुरुवातीच्या षटकातील लढत सामन्याचा निर्णय करू शकेल. ही लढत वासने जिंकली, तरी चेन्नईकडे सुरेश रैना, बद्रीनाथ व स्वतः धोणी आहे. गतमोसमात सलामीस खेळणारा पार्थिव पटेलही चेन्नईच्या प्रतिस्पर्ध्यांची डोकेदुखी झाला होता. एकंदरीत चेन्नईचे पारडे सध्या तरी चांगलेच वरचढ भासत आहे.

गांगुली की कुंबळे?
कोलकत्ता - सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे या भारताच्या माजी कर्णधारांत उद्या कोलकत्त्यात लढत होईल. सलामीच्या विजयाने उंचावलेला आत्मविश्‍वास, त्यामुळे चाहत्यांचा लाभणारा जोरदार पाठिंबा ही कोलकत्ता नाईट रायडर्सची जमेची बाजू असेल; पण कुंबळेच्या प्रभावी नेतृत्वामुळे गतवर्षी बेंगळुरूने अंतिम फेरीत धडक मारली होती, हे विसरून चालणार नाही. सलामीच्या विजयानंतरही आमची गोलंदाजी चांगली झाली नाही, त्यात सुधारणा हवी आहे, असे सांगत गांगुलीने आपल्या गोलंदाजांना कमीत कमी चुका करा, असाच इशारा दिला आहे. उद्‌घाटनाच्या सामन्याच्या वेळी डी. वाय. पाटील स्टेडियममध्येच असलेल्या कुंबळेने कोलकत्ता संघाचे कच्चे दुवे हेरून नक्कीच व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असेल व त्यामुळेच दोघा माजी कर्णधारांतील कौशल्याचा कस निर्णायक ठरू शकेल.
प्रतिक्रिया
On 4/2/2010 1:59 PM Ashay Gandhi said:
गांगुली हाच सर्वोत्तम !!!!!!!!!!!!!!!
On 4/2/2010 12:11 PM pravin ingawale said:
best luck anil we are rock in india..................
On 3/14/2010 10:52 AM vikas said:
Kumbale is one of the greatest captaiN india because he is real fighter......


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: