Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जेव्हा 'तिला' मुलं बघायला येतात...('तो' आणि 'ती')
विजय लाड vijay.lad@esakal.com
Tuesday, March 16, 2010 AT 12:00 AM (IST)
त्याला नोकरी शोधण्यासाठी थोडा वेळ मिळावा म्हणून तिनं घरी चहा-पोह्यांच्या कार्यक्रमांना इच्छा नसतानाही होकार दिला. त्यानं प्रयत्नांची शर्थ केली. पण रिसेशनमुळे चांगली नोकरी हातात पडत नव्हती. शेवटी एका चांगल्या कंपनीचा कॉल आला. अंधारात चाचपडताना आशेचा किरणसुद्धा प्रखर वाटू लागला.
 
तिनं चहा-पोह्यांच्या कार्यक्रमांना होकार दिल्यावर घरची मंडळी कामाला लागली. जोशीकाकांच्या उत्साहात तर भरच पडली. त्यांच्याजवळ आधीच स्थळांची भलीमोठी यादी तयार होती. त्या यादीतील नावांची छाननी करून एकापेक्षा एक सरस अशी स्थळं सिलेक्‍ट करण्यात आली. अर्थात, तिच्या मम्मी-पप्पांनी सिलेक्‍शन केलं असलं, तरी जोशीकाकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं होतं. जोशीकाकांनी सिलेक्‍ट केलेल्या मुलांशी बोलून "बघण्या'च्या कार्यक्रमाची तारीख आणि वेळ निश्‍चित केली. तिला "फाइव्ह डे वीक' असल्यानं सोयीनुसार शनिवार-रविवार राखून ठेवण्यात आला.

या शनिवारी तिला बघायला दोन स्थळं येणार होती. एक दुपारी आणि एक सायंकाळी. त्या दोघांचा भेटण्याचा कार्यक्रम ओघाओघानं कॅन्सल झाला. दोघांची थोडीफार चिडचिड झाली. दुपारी मुलगा बघायला येणार असल्यानं तिच्या मम्मीनं सकाळीच हिरव्या रंगाचा शालू कपाटातून बाहेर काढून ठेवला होता. तो शालू घरात येता-जाता तिच्या नजरेस पडत होता. त्यावरून अधेमधे मम्मीशी खटके उडत होते. पप्पांनीही खाण्या-पिण्याचा पदार्थांपासून तयारी चालविली होती. जणू आज त्यांच्या घरी काही खास समारंभ आहे, अशा थाटात तिचे मम्मी-पप्पा वावरत होते. तिला मात्र काही देणं-घेणं नव्हतं. ती आपली निवांत होती. अगदी बारा-साडेबारादरम्यान तिनं अंघोळ आणि जेवण आटोपलं. त्यानंतर आयपॉडवर गाणी ऐकत बसली.

दुपारी दोन वाजता पहिला मुलगा आणि त्याचे आई-वडील घरी आले. मुलगा पुण्यातल्या एक मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. सध्या तो एका प्रोजेक्‍टवर सिंगापूरला काम करीत होता. उंचापुरा-देखणा आणि विशेष म्हणजे पाच आकडी पगार असलेला हा मुलगा तिच्या मम्मी-पप्पांना आधीच आवडला होता. याखेरीज तो त्यांच्या दूरच्या मावशीचा जवळचा नातलग असल्यानं त्याला प्रायॉरिटी देण्यात आली होती. प्रारंभी थोडी तोंड ओळख झाल्यावर बेगडी शालीनता पांघरून ती बैठकीत आली. मुलाच्या आईनं तिला काही टिपिकल प्रश्‍न विचारले. तिनं यथायोग्य उत्तरं दिलीत. मुलाच्या वडिलांनीही आपली उपस्थिती नजरेस आणून दिली. मुलाची आई तिच्याकडे बघून म्हणाली, ""हे बघ...! तुझ्या नोकरीला आमची हरकत नाही. तू लग्नानंतरही आपल्या करिअरकडे लक्ष देऊ शकतेस. पण आमच्या घरी बाहेरच्या बाईनं स्वयंपाक केलेला ह्यांना चालत नाही. मी आजही पूर्ण स्वयंपाक करते. तुला नोकरी सांभाळून सकाळी मला स्वयंपाकात मदत करावी लागेल. आणि रात्री पूर्ण स्वयंपाक. तुला पटतंय का ते बघ...'' ती काहीच बोलली नाही. फक्त थोडा वेळ त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बघत होती. ""तुम्हाला नोकरी नसल्यानं तुम्ही स्वयंपाक केला नाही, तर शेजार-पाजारच्या बाया नावं नाही का ठेवणार! आणि मी दहा तासांची ताणतणावानं ओतप्रोत भरलेली नोकरी सांभाळून तुम्हाला स्वयंपाकात मदत करायची, अशी अपेक्षा तुम्ही धरता. कमालच आहे बुवा तुमची! तुमचा मुलगा करतो का नोकरीवरून आल्यावर स्वयंपाक... स्त्रीच स्त्रीची शत्रू असते, ही म्हण तुमच्यावरूनच पडली असावी...!'' ती मनातल्या मनात पुटपुटली. तिच्या मम्मीनं दोघींमधील छुपा "सुसंवाद' अचूक टिपला. वातावरणातील तणाव दूर करण्यासाठी तिची मम्मी म्हणाली, ""आमच्या हिला ना... पूर्ण स्वयंपाक येत नसला, तरी काही पदार्थ ती अप्रतिम करते. (तिच्या डोळ्यांसमोर गाजराचा हलवा तरळून आला) लग्न होईस्तोवर स्वयंपाक करायला ती सहज शिकेल.'' तिचे पप्पा गप्पच होते. मुलाच्या आईचं वागणं कदाचित त्यांना खटकलं होतं.

सायंकाळी सहा वाजता दुसरा मुलगा बघायला आला. तो मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर होता. त्याचे आई-वडीलसुद्धा वैद्यकीय व्यवसायात होते. या मुलाचाही पगार पाच आकडी होता. याखेरीज कोकणात भरपूर वडिलोपार्जित जमीन. मुंबईत दोन प्रशस्त फ्लॅट. चहा-पोहे झाल्यावर खरी बैठक सुरू झाली. मुलाच्या आईनं पुन्हा टिपिकल प्रश्‍नांचा पाढा वाचला. तिला उत्तरं अगदी पाठ झाली होती. हे कुटुंब थोडं "मॉडरेट' असल्यानं त्यांनी मुलाला आणि मुलीला बोलायला मोकळा वेळ दिला. मुलाचे वडील रिटायर्ड असल्यानं थोडे गप्पिष्ट होते. मुलाच्या आई-वडिलांना तिच्या नोकरीविषयी काही तक्रार नव्हती. त्यांच्या घरीही थोडं मोकळं वातावरण होतं. स्थळ तसं अनुरूप होतं.

रात्री जेवण झाल्यावर मम्मी-पप्पांनी स्थळांचा विषय काढला. त्यांना दुसरं स्थळ आवडलं होतं. त्यांनी तिला विचारल्यावर तिनं साफ इन्कार केला. मुलगा दिसायला चांगला नव्हता, अशी पळवाट तिनं काढली. त्यावर त्यांनी काही आक्षेप घेतला नाही. "तुला नाही ना पसंत. मग नको करू... त्यात काय एवढं...!' एवढंच ते म्हणाले. चहा-पोह्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली हीच त्यांच्या दृष्टीनं आनंदाची बाब होती. आणि तिला काही कमी स्थळं चालून आलेली नव्हती. आज नाही तर उद्या पसंत पडेल, असं त्यांना वाटलं.

रविवारी सायंकाळी दोघं संभाजी उद्यानात भेटले. तिनं सगळी हकिकत सांगितली. ""मला वाईट वाटतं रे लोकांची मनं दुखवायला. लोकं किती तरी अपेक्षा घेऊन मुली बघायला जातात. त्यांच्या आशा-अपेक्षांच्या आपण ठिकऱ्या उडवतोय,'' ती कळवळून म्हणाली. त्याचंही तसंच मत होतं. त्याचा तर चहा-पोह्यांच्या कार्यक्रमालाच विरोध होता. तिनं दुसऱ्यांसमोर पोह्यांचा ट्रे घेऊन जावं, हे त्याचं मन स्वीकार करीत नव्हतं. तो म्हणाला, ""मला एक कंपनीची ऑफर आहे. पण पगार काही मनाजोगा नाही. सध्या दहा हजार देतो म्हणालेत. पुढे परफॉर्मन्स बघून वाढवतील. करू का ही नोकरी?'' ती म्हणाली, ""चालेल. आणि पुढच्या रविवारी तू माझ्या मम्मी-पप्पांना भेटायला ये. आता पुरे झालं हे नाटक. कमी पगाराची का असेना, नोकरी आहे ना हातात. बघू या काय होतं ते.'' त्यानंही होकारार्थी मान हलविली.
(क्रमशः)

(या लेखाच्या लेखकाशी तुम्हाला संवाद साधायचा असेल किंवा आपल्या समस्या मांडायच्या असतील, तर तुम्ही  vijay.lad@esakal.com या इ-मेल आयडीवर इ-मेल पाठवू शकता. तुमच्या मतावर योग्य ती प्रतिक्रिया पाठविली जाईल. धन्यवाद.)

मित्रांनो, 'तो' आणि 'ती' या लेखमालेतून एक ना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या दोघांची प्रेमकथा वाचून आपण न कळत त्या जुन्या आठवणींमध्ये रमलो आणि आपणच आपले राहिलो नाही. ते दिवस...त्या आठवणी...ती चर्चा...त्या गाठी-भेटी...सगळंच कसं आपल्या डोळ्यांसमोर तरळून आलं.
तसं बघितलं तर हे नातं दोघांचच. दोघांपूरतं मर्यादित. पण आपल्या या हळव्या आठवणी इतरांनाही अत्यक्षपणे सांगायला काय हरकत आहे. मराठी वृत्तपत्रांमधील आघाडीचे संकेतस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या 'ई-सकाळ'ने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक खंबीर व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय...तर चला लिहतं होऊया...
आपण पाठविलेल्या काही आठवणी 'ई-सकाळ'वर प्रसिद्ध केल्या जातील...धन्यवाद

आमचा पत्ता webeditor@esakal.com

* मेलच्या सब्जेक्‍टमध्ये न चुकता लिहा "To aani Ti"
* मेलमध्ये तुमचे पूर्ण नाव आणि पत्ता आवश्‍यक.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 5/27/2011 3:07 PM Pravin said:
khupach sundar............
On 5/27/2011 3:05 PM Pravin kuwar said:
khupach sundar.......................
On 8/4/2010 7:44 PM nilesh said:
खूपच छान ...........................................
On 6/15/2010 3:42 PM SagarR said:
खूपच छान
On 6/15/2010 2:52 PM madhuri said:
मला अस वाटत प्रेम पैशावर नाही केल जात प्रेम माणसावर केल जात ५ आकडी पगार आपल्यअ मुलीला सुख देईल का हा विचार आई वडिलांनी नक्की करावा...
On 09-06-2010 14:52:28 ulhas said:
कथा छान आहे पण
On 6/7/2010 1:02 PM Sandip Hivarkar said:
Aaj kalche mule prem mhanje sarv kahi samajtat parantu prem mhanje aaj chya yugar sarv kahi nasate tyani love marriage kelyavar tya doghanchya kutumbat kiti tantavache vatavarn nirman hoel yachi aplyala kalpana aahe ka. tasech tichya aai vadilanchi abru veshiwar tangali jail mhanun mazya mate tari tya doghani aapaplya ghari sarvanchya samor aple prem vyact karave v tyanchya mhannyapramane vagave karan tyanchahi aplyavar thodaphar adhikar ahe ki nahi?
On 5/20/2010 10:07 AM Abhi said:
पण मी काय म्हणतो ... ज्याला ५ पैसे कमवायची अक्कल नाही... त्यांनी असल्या पोरींच्या मागे लागावाच कशाला? आणि मुलीसुद्धा अव्यवहार्य निर्णय घेतात आणि आयुष्य रडत घालवतात
On 5/18/2010 1:13 PM ankur said:
Doctor u r so smart then dont disturb others its personal for them not for u if it relates to u then we also post the comment against u!!!!
On 5/15/2010 5:02 PM jitendra said:
कथा छान आहे शेवटी त्या द्डोघांचे मतही महत्वाचे आहे .पण ह्यांच्या भवितव्याबद्दल काही सांगू शकत नाही .शेवटी आई वडिलांचा हि काही हक्क आहे का नाही तुमच्यावर लहानाचे मोठे केलं आतापर्यंत सर्व केले तुमच्यासाठी आणि तुमच्या भवितव्याबद्दल हि चांगलाच विचार करणार ते .त्यांना काही अनुभव आहे कि नाही
On 5/6/2010 10:45 PM Dilip Sonawane said:
खूप खूप सुंदर आवडली ...(कथा बरका नाहीतर ''ती समजाल )
On 17/04/2010 14:30 संतोष said:
love marriege kara पण पळून जावून नका, karan त्यामुले बाकीच्या सर्वाना त्रास होतो. तुम्ही tumchya दोन्ही कुटुंबाला त्रास होतो.
On 3/29/2010 11:00 PM vishu said:
खूपच chaan आहे ,पण एक मात्र नक्की जे काही करशील kivva कराल त्यावर नंतर पश्याताप करू नका , aata वेळ आहे व्यवस्तीत विचार करा, लग्न he khup विचार karun karanyachi गोष्ट आहे सो नो hurryyy....all d best
On 3/28/2010 3:37 PM Prashant said:
Mala khup chan watali karan mi swata hyach stage var aahe. Mala naukri aahe pan majhe aai vadil nahi mhanatat karan mulgi dusrya jatichi aahe mhanun. Lavkar pudhil bhag liha mhanje mala pan kahitari marg sapdel.
On 3/26/2010 11:49 AM manali dalvi said:
pudhil bahg keva publish honar ahe? pl. date sanga.
On 3/25/2010 9:17 AM prakash said:
शेवटी विजय त्या दोघांचाच होणार आहे . जरी तिच्या आई पप्पानी नकार दिला तरी .कारण जर दोघे एकमेकांवर फर्म असेल तर कोणी काहीच करू शकत नाही. अल द बेस्ट
On 3/24/2010 10:01 AM Dhawal said:
पुढचा पार्ट कधी पोस्त करणार मी फार आतुरतेने वाट पाहत आहे !!!!!!!!!!!!!!!!
On 3/23/2010 3:42 PM ACP Ajay N said:
प्रेम वगैरे काहीची नसते. सब बोलणे कि बाते रेहती ही.....love करा marriage करा पण love marriage चुकून हि नाही.....personal exp and even all my frnd who did love marriage said the same......Thanks शेवटी तुमची इच्छा अल थे बेस्ट
On 3/23/2010 2:47 PM swati said:
To ani Ti Shevati tyana ekatra rahyach ahi mag pagar10,000 aso ki 1,00000 te tya madhesukhi ahi na maggharchyan kay problem ahi.
On 3/23/2010 1:58 PM vidya said:
त्या मुलाचे जर खरच प्रेम असेल तर त्यने तेच्या लायक बनून दाखवावे.
On 3/23/2010 12:48 PM Sidhu Kshetri said:
आई वाद्लीनाच्या विरोधात जाऊन कुठली हि गोष्य करू नये मी तर असेच म्हणेन . तिने खरच प्रेम केले आहे न मग तिने सर्वांच्या समोर स्वाभिमानाने उभे राहवे आणि तिच्या प्रेमाविषयी बोलावे . जर ती स्वाभीमाने उभी राहिली कि घरच्यांना त्याची थोडी तरी जाणीव होते तेवाच घरचे समजू शकतील . प्रेमाची साथ कधी सोडू नका रे पण आई वाद्लीना पण कधी प्रेमासाठी सोडू नका .
On 3/23/2010 11:45 AM satish said:
खरा प्रेम काय असत ? त्या प्रेम करत असलेल्या मुलाची आई कशी होती ?
On 3/23/2010 10:59 AM Sushil said:
अगदी अशीच परिस्थिती माझ्या बरोबर उद्भवली. यातला मी तो नव्हतो पण तिला बघायला येणाऱ्या स्थळांपैकी होतो. तिच्या आईवडिलांना घाबरून तिने माझ्याशी लग्न केलं पण तिचे त्याच्याशी कॉन्ताक्ट्स चालूच होते. याची परिणीती घटस्फोटात झाली. त्यामुळे प्रेम करणाऱ्यांना माझही कळकळीची विनंती आहे कि प्रेम केल्यावर ते निभाहून न्यायला शिका. नाहीतर माझ्ह्यासार्ख्यांचे ज्याचा यात काहीही संबंध नाही त्यांचे आयुshya udhvastha hote.
On 3/23/2010 10:21 AM Archana said:
All the best......but u should also thought about ur future.
On 3/23/2010 8:56 AM Vaachak said:
घरी सांगण्याची हिम्मत नसेल तर प्रेम करू नये.इतरांना त्रास कशाला!
On 23/03/2010 2:28 AM shekhar said:
अरे पुढे काय ???????
On 3/22/2010 8:35 PM Hanumant shinde said:
go confidentally in your life
On 3/22/2010 2:56 PM Renuka said:
खूपच छान पण वास्तवतेचा ब्राम्निरास होऊ न देणे त्या दोघांच्या हातात आणि काही प्रमाणात नशिबावर अवलंबून आहे.
On 3/22/2010 2:44 PM mona said:
Go ahead best of luck for ur future
On 3/22/2010 1:16 PM Rasika Desai said:
लवकर पुढे न्या.. (क्रमशः बंद करा)
On 3/22/2010 12:21 PM Nikhil said:
मुलीने आई व बाबा ला सागणे गरजेचे आहे कारण आई व बाबा ला धोक्यात ठेवण चुकीचे आहे ,उगाच का ते लहानपणापासून आपल्या चांगल्याचा विचार करतात. मग लग्नाच्या वेळी का असा स्वार्थीपणा.
On 3/22/2010 10:31 AM rbg002 said:
cut this crap , please. Are there girls like these really aorund ? Not in Pune for sure :).
On 3/22/2010 10:15 AM Nilesh said:
Luvkar puthacha part dya
On 3/22/2010 8:46 AM subhash said:
प्रेम विवाह नसेल तर चहा पोह्या शिवाय दुसरा पर्याय तरी सामान्य माणसा कडे कोणता आहे?
On 3/22/2010 4:52 AM mandar said:
hya sagalya typical lovestories fakt lagnachya payripryantach chitra dakhavatat, khari pariksha lagnanantar suru honar ,aata ji bharavun jate ahe premane tich nantar itaranshi tulana suru karanar and tyala ugach palavanr . lagnanantar pan kami apeksha thevun kahri sath denar ka hach doghanchay ayushyacha mahatvacha prashna aahe. tyasathi vichar and principles julun prem hona kinwa lagna hona mahatavacha,nahitar prem vivah aso va arranged marriage te yashasvi honarach nahi..
On 3/21/2010 7:37 PM Rameshwar said:
Tottaly agree with Nivedita. Please stop this non-sense.
On 3/21/2010 2:27 PM rahul u. said:
खूपचचं छान , मनाला लागली
On 3/21/2010 11:44 AM Sonal said:
तिला बघीला आल्यावर ATLEAST तुला काम karaw लागेल म्हणण्यापेक्षा,मला एकटीला कर्मात नाही,मला आनंद होईल जर तू माझ्या सोबत राहशील,आपण मिळून सांभाळू असा विश्वास का त्या मुलाची आई देओ शकत नाही,ती आपली सून आहे,आणि तिने कामालाच महत्व दिला पाहिजे,नाही तर संस्कार नाही असा म्हटल्या जाते,मुलींना पण आई वडिलांचा घर सोडला कि एक नवीन आयुष ACCEPT KARAILA जरा त्रास जातो,त्या नवीन गोष्टी तिला शिकाव्या लागतात,हे सासू पेक्षा आई बनून सांगितला तर वाद होत नाही,parat नवरा बैको मध्ये किती UNDERSTANDING आहे हे पण garajecha aahe.
On 3/20/2010 8:02 PM jyoti said:
खूपच छान !!!!!!
On 3/20/2010 5:13 PM kavita said:
sadhyachya fast life madhe doghanni gharat kam karayala have..karan muli pan nikri kartat...mag equality kasli nusti navala?
On 3/20/2010 4:11 PM sunil patil said:
Nokriwali mulgi pan pahije & gharat molkarinpan ,aas ka nahi mahnat ki swanpakala bai laao kinva jevnacha daba laoo.......!
On 3/20/2010 3:11 PM Dadabhau Ghode said:
Khar tar aaya madhe premachya bhawana ekmeka badal aasnare prem,sukha dukhat aasnari saatha , paishal kimat naste ekmekanchi saatha aasel tar paisa kadhihi kamao shakto tas prem nahi, mala khup khup chhan watal tayanch prem pahun, Love is Everthig So Enjoy !!!
On 3/20/2010 12:53 PM nitin said:
गुड. पुढे जा.
On 3/20/2010 12:46 PM manu said:
प्रश्न पैशाचा नाही माज्या mate aushyat पश्यापेक्षाही बर्याच गोष्टी mahatvachya असतात. ते doghe जर आहे त्यात समाधानी sukhi असतील तर bakichya jagala काही हक नाही tyanch prem पैशात tolayala... पैसा का आज yeil. उद्या जाईल पण प्रेम चिरंतर tikun राहील. त्यांनी घरच्यांच्या संमतीने लग्न कराव.
On 3/20/2010 8:22 AM Chaitanya said:
फारच अप्रतिम ! जीवनात प्रत्येकच गोष्ट मनाजोगी मिळाली तर ते जीवन कसले आणि संघर्ष कसला! हल्ली सर्व काही चांगला असून फक्त पगारासाठी मुली मुलांना डावलतात ! हा लेख मुलींसाठी Must Read आहे !
On 3/20/2010 12:17 AM Doctor said:
अगदी वेडीच आहे हि पोर. डॉक्टर, इंजीनीरला नाकारून फालतू मुलावर लवलव करते? थोडे दिवस चालेल हे लवलव नंतर नवराच सांगेल माहेरून हुंडा आणायला. आणि पैशांच्या व्यतिरिक्त शिक्षण हे माणसाला जास्त सुन्स्कृत बनवते त्याचे काय? बये देव तुझी रक्षा करो ह्या कलियुगात.
On 3/19/2010 7:10 PM Sachin said:
खूपच छान.
On 3/19/2010 5:55 PM yogesh said:
मला खूप छान वाटले, उत्सुकता आहे पुढे काय झाले त्याची. कृपया पुढचा लेख लवकर लिहा. खूप खूप छान आहे, खूप आठवणीना उजाळा मिळाला. खूप खूप आभार, योगेश.
On 3/19/2010 3:38 PM umesh said:
त्यला १०,००० पगार आहे thik aahe the mulgi kahi kaam karnar nahi ka ? bichary mulala chy pagarvar rahnar aahe ka? kiti jiv ghnar tycha
On 3/19/2010 3:00 PM Rahul Yadav said:
प्रश्न दहा हजार रुपयांचा नाही तर doghanchya manomilanacha चा आहे.आणि हि तर आत्ता सुरवात आहे तेन्ह्वा घरी आई वडिलान सांगून पुढे पावूल उचलण्यास काहीच हरकत नाही कारण आई वडिलांना किती दिवस अंधारात ठेवणार त्यांना हि तांच्या जबाबदारीतून मुक्त व्हयाचे आहे हे हि लक्षात ठेवले पाहिजे.
On 3/19/2010 11:56 AM pallavi said:
ALL THE BEST DONT WORRY SAGAL THIK HOIL.
On 3/19/2010 10:24 AM Rahul said:
Dr. Anna देशपांडे तुम्ही डॉक्टर आहात. कदाचित माणसाचं मन तुम्ही लवकर समजता. लिहिलेली कथा खरच छान आहे. तुम्हाला पडत नसेल तर वाचू नका पण लिहिणाऱ्याला शिव्या तर घालू नका. एकमेकांवर विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. आजूबाजूला पाहिलंत तर तुम्हालाही कळेल.
On 3/19/2010 10:18 AM Abhijit said:
विजय मित्रा तोडलंस.........खूपच छान आहे..........go ahead.............
On 3/19/2010 7:59 AM vijayraj said:
माहित नाही असे का होता ते ! ! ! पण खरे सांगू ह्या असल्या चहा पोहे करत बान्या पेक्षा मुली न मुलाच्या अपेक्षा काय आहेत ते विचारात घायला हवे.
On 19/03/2010 1:57 AM shekhar said:
अरे पुढची गोष्ट सांगणार आहात का नाही?? का एवढ्यावरच हि गोष्ट किती चांगली किवा वाईट आहे ह्यावर गप्पाटकात बसणार आहात?
On 3/19/2010 12:38 AM shital @ vishal said:
पुढची स्टोरी लवकर सांगा, मी वाट पाहत आहे*********************************
On 3/18/2010 7:14 PM ~himali~ said:
just wait lit'l for ur bf, but don't say nooo to rich guysss.
On 3/18/2010 4:40 PM laxman said:
mi एक असा माणूस आहे कि मला नोकरी नसतानाही लगीन केलं. आणि मला अजूनही नोकरी नाही. नुसता बोल बच्चन रे. त्या मुले ह्या कथेत काही दम नाही.
On 3/18/2010 4:02 PM ashok pune said:
असे अनुभव सांगायला काहीच हरकत नाही. यातून आपण काही नवीन शिकू शकतो.इतरांचे अनुभव वाचून कधीकधी आपल्याशी जुळले तर समाधान पण वाटते.काही अति शहाणे लोक या लेखाबद्दल बोलतात त्यांचेकडे लक्ष देऊ नका.लिखाण चालू राहू देत.लेखात दिलेला फोटो फारच बोलका वाटला.छान
On 3/18/2010 1:26 PM manu said:
असे का घडते जीवनामध्ये
On 3/18/2010 12:48 PM shilpa said:
khupach chan.... dogha madhe kitihi vada vadi zali tari manane te khup ekmekant guntlele aahet he disun yete....
On 3/18/2010 11:27 AM ek mulgi said:
Specially for mahesh, darweli mulich mage firtat asa kahi nasta mula pan mage फिरतात त्यांच्या जावाब्दारीपासून mulgi kitihi saath dyayla तयार असली तर ती मुलांनी ghyayla hawi na asha weli mulancha ego madhe yeto nehme mulini pream kela तर tya शेवट पर्यंत साथ देतात agdi saglyach det astil ka nahi mahit nahi pan eka mule बाकीच्या मुलीना आणि mulana pan tyach category madhe basu naye wichar karun comment dyawe
On 3/18/2010 10:50 AM mahesh said:
bahutek love stories madhe hach mudda asto... muline jar manapasun sath dili na tar mule kahi pan karu shakta... mhnata na mulgi laxami aste.. te kharach ahe... fakt ticha sath asava mag paisa kai kontich gost ashkya nahi.. make love each other
On 3/18/2010 9:49 AM Ek marathi said:
सारखे सारखे काय मम्मी पप्पा म्हणायचे? आई बाबा म्हणा ना...शोभून दिसते ते!
On 3/17/2010 6:33 PM Nilesh said:
always remember one think, NO MONEY NO HONEY!!!!!!!!!
On 17/03/2010 16:31 yashodhan said:
अतिशय हृद्य गोष्ट आहे, तिला बघायला आलेत हे बघूनच माझ मन भरून आल, लाड साहेब का दोन प्रेमी जीवांच्या मध्ये बिब्बा घालता, आणि त्याला तर नोकरीही नाही, कस होणार या दोघांच??? मला तर वाटत त्यान प्रिन्सिस च ओप्शिअन उगीचच सोडलं, नसल्या पेक्षा आंधळा मामा बारा या म्हणीप्रमाणे अजूनही विचार करायला हरकत नाही !
On 3/17/2010 4:22 PM Vilas B. Desai said:
ह्याच एक पुस्तकच कराव गोष्टी वाचायला छानच आहेत . वास्तव्य म्हणजे पैशाशिवाय जीवन नाही आणि जीवना शिवाय पैसा नाही .
On 3/17/2010 3:46 PM ajay said:
chup chan ............Go Ahed
On 3/17/2010 2:49 PM Dr. Anna Deshpande said:
शुद्ध बावळट पण ! एका बावळट ने लिहिले आणि खूप बावळट वाचतात आणि त्याची प्रशंसा करतात ! हे लाड काय सकाळ चे मालक का जावई?
On 3/17/2010 2:41 PM Nilesh said:
खरच, खूप छान त्यानिमित्ताने का होईना आपण पुन्हा एकदा स्वप्नांच्या जगात जाऊन येतो
On 3/17/2010 2:25 PM Deepak Hode said:
छान आहे कथा जुन्या आठवणी ताज्या झाल्या!!!!!!
On 3/17/2010 1:50 PM ek Vachak said:
निवेदिता जर तुला आवडत नसेल हि कथा तर तू वाचू नकोस
On 3/17/2010 12:57 PM Nivedita said:
मूर्ख कथा आहे एकदम, बंद करायला पाहिजे, सारखे काय तो आणि ती. सगळाच मूर्खपणा......
On 3/17/2010 12:54 PM sonali said:
चांगल आहे मी समजू शकते कारण सद्य| मी याच सिचुअशन मधून चालेले आहे
On 3/17/2010 12:49 PM Seema Potphode said:
तिला चांगली नोकरी आहे , फक्त तिनी त्याच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर काही कमी पडले तर तिनी किंवा त्यांनी कुरकुर करता कामा नये, दोघांनी कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांना सांभाळून घ्यावे.
On 3/17/2010 12:47 PM Digambar said:
अनिरुद्ध बरोबर आहे भावनाप्रधान गोष्टी आवडतातच( देवदास टायीप लोकांना तर नक्कीच ) लोकांना आणि तेच लेखक साहेबांचे चालू आहे
On 3/17/2010 12:40 PM Amol Raut said:
विजय मित्र तोडलंस...तोडून मोडून चोला मोळा करून फेकून दिलंस.....तुझा हा लेख वाचून मला माझ्या जुन्या प्रेयसीची आठवण झाली.....टांगा पलटी घोडे फटाक....
On 3/17/2010 12:18 PM MM said:
मम्मी-पप्पांना तयार होतीलच, आता त्याला नोकरीपण मिळते आहे. आणि त्यांना समाजाव कि सॉफ्टवेअर इंजिनिअर, डॉक्टर कितीही पगार कमावणारे असले ना तरीही त्यांच्यासोबत लग्न करून तू सुखी होणार नाहीये.....go ahead.
On 3/17/2010 12:08 PM Sundar said:
खूप छान आहे
On 3/17/2010 11:45 AM Kabir said:
वेळ मारून नेण्यासाठी तिने निवडलेला मार्ग तिला आणि त्यालाहि बिलकुल पसंत नाही.बघायला आलेल्या मुलांना कोणतेही कारण काढून रिजेक्ट करायला,त्यांच्यासमोर कांदे पोहे,चहा कार्यक्रम करायला तिलाही मनापासून आवडत नाही.मग हा सगळा खटाटोप का?
On 3/17/2010 11:31 AM sweety said:
खूपच छान..आता घरी सांगून टाक विनाकारण स्वतःला त्रास करू घेवू नकोस.. तुला नक्कीच यश मिळेल कदाचित तूझ्ही देवाने प्रार्थान एकली. अल थे बेस्ट. मी तुझ्हासाठी माझह देवाकडे मनापासन प्रार्थना करते. आणि जे लोक म्हणतात न जोब करून काम करावे त्यांना चांगले सुनांव कि जर कामासाठी मुलगी हवीतर जोब करणारी मुलगी कशाला पाहता एक मोलकरीण ठेवणं नन्हीतर बी.अ किंवा बी.काम मुलगी शोधा. अशी लोक होपलेस असतात.
On 3/17/2010 11:31 AM Tujach said:
पुढची हि स्टोरी नक्की सागा, वाट पाहत आहे तुजीच ---------
On 3/17/2010 11:18 AM mithila said:
आता खरं कहाणीने वेगळं वळण घेतलंय म्हणजे, आई बाबांना कळल्यानंतर त्यांची reaction वगैरे........ हो म्हणतील का? नाही म्हणाले तर काय करायचं? उत्सुकता शिगेला पोहोचली आहे...... शेवट गोड हवा फक्त. आणि मला असं वाटतं कि, सगळ्या प्रेम करणाऱ्यांच्या जीवनात हि पायरी येते त्यांना पण या लेखामुळे जरा आधार मिळेल. गुड
On 3/17/2010 10:40 AM rahul ippar said:
मला या लेखा चे वेळापत्रक पाहिजे
On 3/17/2010 10:38 AM Rahul Ippar said:
खूप छान
On 3/17/2010 10:38 AM tinshechar said:
१०,००० हा सुद्धा पाच आकडी पगार झाला ना?
On 3/17/2010 10:31 AM Ashok Ghargine said:
Love is Everthing so Enjoy................
On 3/17/2010 9:47 AM aniruddha said:
शेवट गोड चा होईल ....... " तो " आता नकोस घाबरू "ती" तुझ्या बरोबर आहे लेका .. होऊन जाऊदे ...
On 3/17/2010 8:38 AM ravi said:
छान आहे. पुढे बघू काय होते ते. प्रेम हे अडचणींनी पक्के होते.
On 3/17/2010 7:02 AM rajmal patil said:
Good re.
On 3/17/2010 7:01 AM patil rajmal said:
mala pan khup chan vatala, mi pan "to & ti" madhun aalo.
On 3/17/2010 2:47 AM monali said:
I don't understand why girls agree to this Nonsense. Our culture is still in 12th century. Even today, we see Astrological charts and decide in 10 min. if someone is suitable for us as a Life partner. What a joke. Shame on us.
On 3/17/2010 1:16 AM sonali joshi - sadashiv peth. said:
माहितीचे आम्हाला....... शेवट गोsssड होणार आहे, म्हणजे लव-मेरेजनेच होणार आहे........., आता उगीचच तंग्वत बसलेत ! हा !!
On 3/17/2010 12:24 AM jayant said:
tya hirawya shaluche kay zale ? nesala ka nahi ? baghayala yenar mhanun shalu ? jara jastach watale ahe...
On 3/16/2010 6:13 PM Safal said:
खूपच छान आहे. नौकरी लागल्याने स्टोरी मध्ये थोडा ट्विस्ट आला.......... पण जर ती १०००० पगारात manage करायला तयार असेल तर घरच्यांनी तिच्या लग्नाला होकार द्यायला पाहिजे, शेवटी त्यांनाच बरोबर राहायचे आहे ना....
On 3/16/2010 5:52 PM Tushar Pawar said:
लग्न हे आई वडिलांनीच का ठरवावे. जिला त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य काढायचे आहे हा तिचाच निर्णय असावा. पण त्यात आई वडिलांचा आशीर्वाद व नातेवैकांचा सल्लाही हवा. उगाच का ते लहानपणापासून आपल्या चांगल्याचा विचार करतात. मग लग्नाच्या वेळी का असा स्वार्थीपणा.
On 3/16/2010 5:30 PM VIKU said:
पुढे जा...
On 3/16/2010 5:01 PM sachin said:
Good
On 3/16/2010 12:05 PM ganesh said:
घरी सांगा १०,००० च्या ऐवजी १,००,००० पगार आहे ............ लगेच मान्य होतील (भविष्यात होईलच न तेवढा पगार !!! :) )
On 3/16/2010 12:01 PM ganesh said:
गुड.....
On 3/16/2010 10:50 AM anirudh said:
कधी आपण ह्या टिपीकल लेखांतून बाहेर पडणार?
On 3/16/2010 10:12 AM swatisalunkhe said:
mala khup chan vatala
On 16/03/2010 02:10 Nagesh !!! said:
काही कामिवानिसाठी काही गमावाये लागतात!!! aayushyat सगळेच काही मिळवता येत नाही. One should learn how to compromise in life.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: