Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अनिल कुंबळेच्या पुस्तकाचे वॉर्नच्या हस्ते प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 17, 2010 AT 08:40 PM (IST)
Tags: anil kumble,   book,   cricket,   sports

बंगळुरू - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाज म्हणून स्वतःचा ठसा उमटविणारा अनिल कुंबळे याचा आता नवा चेहरा समोर आला आहे, तो निसर्गप्रेमी छायाचित्रकार म्हणून! गेल्या दोन दशकांपासून तो छायाचित्रण करतो आहे. दौ-यावर निघताना तो आवर्जून आपला कॅनन कंपनीचा कॅमेरा बॅगेत भरण्यास विसरत नाही. त्याने काढलेल्या छायाचित्रांवर आधारित `वाईड अँगल' या पहिल्याच पुस्तकाचे आज जगप्रसिद्ध क्रिकेटपटू शेन वॉर्न याच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.
 
कर्नाटक सरकारने त्याची नियुक्ती राज्याच्या वन्यपशू मंडळावर केली आहे. त्याला राज्य मंत्र्याचा दर्जा देण्यात आला आहे. वन्यपशूंबद्दल अनिल गंभीर आहे आणि क्रिकेटपासून सुटका झाल्यानंतर त्याचा अग्रक्रम असतो, ते देशातील कोणत्याही अभयारण्यात फिरण्याला. वन्यजीवन संवर्धनाबाबत त्याने नेहमीच आवाज उठविला आहे.
 
या पुस्तकाबद्दल बोलताना कुंबळे म्हणाला, "या पुस्तकात मैदानावर आणि सामना नसेल त्या वेळी जवळच्या जंगलांत भटकताना मी काढलेली काही दुर्मिळ छायाचित्रे आहेत. गेल्या २० वर्षांपासून मी हा छंद जोपासला आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून आयपीएलचे सामने खेळतानाही माझ्या या छंदात बदल झालेला नाही. मैदानावर आणि मैदानाबाहेरही जगभरातील क्रिकेटपटूंकडे माझे बारकाईने लक्ष असते. त्यावेळी मी या खेळाडूंची अनेक छायाचित्रे काढली आहेत. हे पुस्तक माझ्या छंदावर आधारलेले आहे.
 
मैदानावरील आणि मैदानाबाहेरीलही!"
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे, की `जोपर्यंत मी संघात आहे, तोपर्यंत काहीही खासगी नाही,' असे कुंबळे नेहमी आपल्या सहका-यांशी बोलताना सांगत असे.
प्रतिक्रिया
On 3/18/2010 9:30 PM शिवराम गोपाळ वैद्य said:
माझ्या प्रतिक्रियेवर अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच. माझा आक्षेप त्याने पोस्टक लिहिण्याला नव्हता व नाही. त्याने जे राज्य मंत्री दर्जाचे पद सरकार कडून फुकट मिळवले आहे त्याला आहे. असे जर असेल तर राजकारणी आणि अनिल किंबले यात फरक तो काय राहिला?
On 3/18/2010 10:02 AM siddharth. said:
bravo Jumbo.. You are really inspiring us. I am looking forward to see that book.
On 3/18/2010 8:49 AM JD said:
अहो वैद्य साहेब, थोडा तरी विचार करून बोला कि जरा...मान्य आहे कुंबळे पेक्षा चांगले छायाचित्रकार आहेत आपल्या देशात... पण असे किती क्रिकेटर आहेत जे चांगले छायाचित्रकार आहेत... सगळेच असे गिफ्टेड नसतात .. कुबले , द्रविड, सचिन हि अशी काही लोक आहेत कि ज्यांना नाव ठेवण म्हणजे आपण मूर्ख असल्याची पावती देण्यासारख आहे....
On 3/18/2010 5:58 AM sv said:
काय वैद्य अहो त्याने क्रिकेट खेळून मेहनतीने नाव मिळविले आहे आणि त्या नावाची आणि त्याच्या आवडीची त्याने जोपासना केली आहे..तुम्ही कमवा नाव टीका करण्यापेक्षा..जबरी छायाचित्रकार क्रिकेट मध्ये नाव कमवत नाही..विचार करा आणि लिहा..
On 3/17/2010 11:45 PM Ek Marathi Bharatiya said:
अनिल कुंबळेचे अभिनंदन ! खरोखरच कुंबळे एक निर्विवादपणे उत्तम खेळाडू आणि सदहृदयी विचारवंत आहे! आणि वैद्य बुआ कुणाचे चांगले झाले तर होऊ दे ना! तुम्हाला पोटशूळ का होतो आहे? दुसर्यांना नावे ठेवून तुम्हाला कोण चागले म्हणणार आहे? हिम्मत असेल तर तुम्ही करून दाखवा कुंबळे सारखे काही ... !
On 3/17/2010 10:12 PM एक मराठी said:
वैद्य बुआ तुम्हाला कोणाचं चांगलं बघवत नाही का ? कुंबळेनी त्याचा छंद जोपासला आहे आणि त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. यात काही गैर नाही. कोणालाही ते पुस्तक घायची सक्ती नाही. आणि ह्यात कुंबळेचा पैसा कमावण्याचा हेतू मला तरी दिसत नाही. तुमच्या ह्या टिपणी वरून फक्त दुसऱ्यांचे पाय खेचणारा मराठी माणूस अजून महाराष्ट्रात आहे हे दिसून येतं. आणि खेद वाटतो.
On 3/17/2010 9:21 PM atul said:
शिवराम गोपाळ वैद्य, तू त्याचे पुस्तक बघितले आहेस का? तुला विचार न करता बोलायची खोड आहे...
On 3/17/2010 8:44 PM शिवराम गोपाळ वैद्य said:
बढीया है अनिल कुंबळे...तुमचे मीटर सुरू आहे. पैसा मिळवण्याची खुमखुमी तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही असे दिसते. तुमच्यापेक्षा अनेक जबरी छायाचित्रकार उपलब्ध असताना तुम्हाला क्रिकेट मधील लोकप्रियतेचा (गैर) फायदा मिळाला. घ्या आता स्वतःचे उखळ पांढरे करून.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: