Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

महेश भटला हिसका दाखवू - राज
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 18, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना खंडणीच्या खोट्यानाट्या प्रकरणात अडकविण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला होता. आता हा महेश भट एकदा माझ्या बेचकीत येऊ दे, मग मी त्याला हिसका दाखवितो, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

मनसेचे सरचिटणीस व संपादक शिरीष पारकर यांच्या "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा' या पाक्षिकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते सीएसटी स्थानकात झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. मनसेच्या अकरा कार्यकर्त्यांना खंडणीच्या प्रकरणात अटक झाल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, की खंडणी मागण्यासाठी अकरा जण लागतात का? आमच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खोट्यानाट्या केसेस टाकण्यात आल्या आहेत. त्या चित्रपट निर्मात्याच्या चित्रपटात परदेशी कलाकारांचा समावेश आहे. कोणी अफगाणी आहे, कोणी इराणी आहे. या कलाकारांकडे वर्क परमिट आहेत का, याची विचारणा करण्यास माझे कार्यकर्ते गेले होते, पण महेश भट यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर दबाव आणून आपल्या कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणीची तक्रार घेतली, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

वर्क परमिटच्या नावाखाली जर कसाब निघाला तर काय करणार, असा सवाल करताच ते म्हणाले, की यांच्यावर कोणीही कारवाई करीत नाही. सरकारलाही त्याचे काही घेणे-देणे नाही; त्यामुळे त्यांना काय करायचे ते त्यांनी करू दे. आमच्या कारवाया सुरू राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेमधील सर्व नोकऱ्या व रेल्वेचे स्टॉल्स भूमिपुत्रांनाच मिळालेच पाहिजेत, असे ठामपणे सांगतानाच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे परीक्षा स्थानिक भाषेतून घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदन केले, पण रेल्वेतील नोकऱ्यांच्या जाहिराती मात्र येथील स्थानिक वृत्तपत्रांत आल्या पाहिजेत; नाहीतर जागा तिकडे व परीक्षा इकडे असे होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी रेल्वे उद्‌घोषक विष्णू झेंडे, रेल्वेच्या अधिकारी शर्मा, सरचिटणीस अतुल सरपोतदार, अविनाश अभ्यंकर आदी उपस्थित होते.

पोलिस दखल घेतील - मुख्यमंत्री
राज ठाकरे यांनी महेश भट यांना दिलेल्या इशाऱ्याबाबत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की पोलिस याबाबत दखल घेतील व योग्य ती कारवाई करतील.
प्रतिक्रिया
On 23/10/2011 10:50 PM kdchitnis said:
बॉलीवूडमध्ये अस्तनीतील निखारे बरेच आहेत.ड्रग,तत्सम नशिले पदार्थ,मानवी तस्करी इ ची रहदारी करणाऱ्यांना बॉलीवूड आश्रय देते.मुंबईचे सामाजिकजीवन बॉलीवूडने खराब केले आहे.टोळीयुद्ध,वेश्यांची वाहतूक,रोजचा लोंढा याला अप्रत्यक्षरीत्या बॉलीवूड जबाबदार आहे.पैशाने माजलेले नट,नट्या,सर्रास वाहतूक,इ नियम पायदळी तुडवतात. बॉली वूड,राजकीय पुढाऱ्यांना "खास" सेवा पुरवून गुपचूप आपला कार्यभाग साधते. बॉलीवूडवाले चलाख असल्याने त्यांना पिंडीवरच्या विन्च्वासारखे ठेचायला हवे.मनसेने त्यांचे मनसुबे ओळखून त्यांना माती द्यावी.
On 23/10/2011 01:16 PM Nilesh said:
जे खर असेल ते लवकरच बाहेर येईल पण यातून एक सिद्ध होतंय कि आता अति होतंय महाराष्ट्रीयन माणसांवर फार अत्याचार होत आहेत मुंबईमध्ये पण त्याकडे कुणाच लक्षच नाहीये ना सरकारच ना शिवसेनेचं मग राज साहेबांनी हा मुद्दा उचलला तर बिघडलं कुठे ?
On 05/02/2011 11:41 AM amir said:
मनसे जिंदाबाद ,जय maharastra
On 16/11/2010 08:33 AM pratap said:
अजित देशमुख साहेब का तो एकटाच भ्रष्ट आहे? अरे हे राजकारणी जे अब्जाधीश आहेत त्यांचे काय. का त्यांना परमिट आहे.
On 16/11/2010 08:29 AM pratap said:
अरे काही नाही पक्षाला भटने निधी दिला कि दुसर्या दिवशी हेच मुहूर्ताला जाणार. एवढेच हे खरे आहेत तर मग का टोल नाके चालू आहेत. आंदोलन केले पैसे आले हि तेरी भी चूप मेरी भी चूप.
On 9/17/2010 3:06 PM deepak bhai said:
जय महाराष्ट्र, राज साहेब आगे बढो.
On 9/17/2010 2:40 PM Milind said:
Mahesh bhat is gaddar but manase is goondgiri...
On 8/30/2010 9:20 AM mahesh said:
अरे मला वाटते कि एकदा राज साहेबांच्या हाती सत्ता दिली पाहिजेत,?
On 8/20/2010 10:21 AM vijay said:
जय महाराष्ट्र माझा
On 8/10/2010 2:19 PM Vishal said:
My Dear Idol Rajsaheb, I have very proud on you. You are the only leader who is fighting for Marathi peoples. It’s always happens like darkness under lamp. That means our states development enjoying outsiders. Please unite Marathi peoples as you are doing & invite my peoples to join Rajsaheb please. I will be always with you forever...
On 9/8/2553 19:20 Samadhan kaklij said:
Raj Thakare tum aage badho hum tumare sath hai ........................................................... JAY MAHARASHTRA
On 8/9/2010 6:27 PM G.P. bharkar said:
मराठा = महाराष्ट्राचा राज ठाकरे
On 8/3/2010 2:53 AM बेडूकराव said:
हे खंडणी खंडणी करून राज साहेबांना कशाला चिडवताय? अरे खंडणी काय स्वतः साठी असते का? इथे आख्या महाराष्ट्रातील मराठी जणांच्या अस्मितेला प्रोत्साहन द्यायचे काम काय साधे आहे काय?
On 7/24/2010 2:11 PM saurabh said:
मराठी भाषा , महाराष्ट्राची संस्कृती नाकाराणार्यांवर राजद्रोहाचे गुन्हे टाका .....
On 7/16/2010 2:13 PM निलेश पवार सातारकर said:
@ Mr Space आपण कोणत्या ग्रहावर राहता? आणि तुमच्या गल्लीच्या / हौसींग सोसायट्यांच्या निवडणुका आहेत काय आत्ता? झोपेत काहीही लिहून सकाळच्या वाचकांचा वेळ का वाया घालवता? कृपया सांगण्याची तसदी घ्यावी....!!!!
On 7/16/2010 9:31 AM laxman said:
राज जिंदाबाद ...तू है महाराष्ट्र के शान .........
On 7/15/2010 4:10 PM girish said:
तुम्ही समजा हिसका नाही दाखविलात याचा अर्थ तो अजून तुमच्या बेचकीत सापडला नाही असेच सर्वांनी समजायचे ना? ठीक आहे समजू आम्ही तसे.
On 6/18/2010 9:31 AM PRADEEP said:
जाय महाराष्ट्र, राज साहेब आगे बढो
On 6/18/2010 8:54 AM Priya said:
मनसे हटाव mumbai बचाव
On 6/18/2010 7:39 AM Abhijit Daine said:
भट जरा नीट नाही तर काढील तुझ्जी बट
On 6/11/2010 11:49 PM satish patil said:
नाही नाही महेश भटचे सिनेमे अश्लील आणि छान असतात बरका त्याचे सिनेमे बागीत्लेच पाहिजेत
On 6/11/2010 3:26 PM sandip said:
raju tu kasala tya bangadit padatoy........... BJP ZINDABADDDD...........
On 5/14/2010 12:57 AM MP said:
त्यापेक्षा त्याने बनविलेले कुठलेच चित्रपट बघू नका... वाळीत टाका त्याला.. काही दिवसात सुता सारखा सरळ होईल.. आणि त्याला मदत करणाऱ्या जोकेरांचे movies पण बघू नका..काय? ;)
On 4/30/2010 5:21 PM vishal marathe said:
राज साहेब या भटला उडवू का सांगा फक्त आज्ञा करा जय महाराष्ट्र
On 4/20/2010 3:54 PM MR. Truth said:
Mr SPICE तू का वाजवतो मग तुझी टेप गप्प बस ना ! बातमी तर समजली का तुला.....?
On 4/8/2010 7:04 PM sameer said:
साम्यवादाचे मुळात भारतीयांना विकृत असे भय आहे. सध्याच्या तत्वाप्रनिप्रमाणे हावरेपणा, स्वार्थ खूपच वाढत आहे जनता, सामान्य लोक यात होरपळून निघत आहेत.भारतीय नेता हा त्याग करणारा ,नीतिमान, धैर्यवान आणि निरिछ च असला पाहिजे. राजकीय पक्षआचे सत्ता हे च ध्येय असू नये .
On 4/8/2010 6:44 PM sameer said:
bollywood industry बंदच केली पाहिजे सरकारने . काही उपयोग नाही लोकांना त्याचा. तेथे केवळ विकावूपणा आहे काळाबाजार आहे . No entertainment! . सरकारला काय पैसे कमी पडतात काय ? bollywwod वर एवढा विश्वास ठेवाते. आणि bollywood industry बंद केली म्हणून बेरोजगार तर कोण होणार नाही. कारण bollywood la चैन करण्याची सवय आहे.
On 4/3/2010 5:59 PM sunil said:
सुरज तुझ्या लायकी प्रमाणे बोललास ....तुझ्या कडून चांगल्याची अपेक्षा हि नाही ...शेवटी तुम्ही सुद्धा शाहरुख खान वाले आहात ........दाबा दाबा पकड्यांचे पाय दाबा .....शिवसेनेनी पाकिस्तान ला विरोध केला तर तुम्ही पाकिस्तान ला पाठींबा देणार ....भय्यांना मारणार..... बांगलादेशींना पोसणार ....यालाच मनसे म्हणतात काय ?
On 4/3/2010 4:24 PM bhatu said:
हे सर्व राजकीय स्टंट आहेत.
On 4/3/2010 10:48 AM suraj jadhav said:
ए निर्मल,तुझी साईझ किती? एम-एम...आणि बोलते किती? झेपेल एवढ आव्हान स्वीकारा म्हणजे काय? राज ठाकरेंनी कधी आव्हानाचा आकार पाहत नाहीत...ते आव्हानाची वृत्ती पाहतात.... आणि त्यामध्ये कोणीही आला तरी आम्हाला पर्वा नाही...कारण त्यांच्यामागे उभा आहे पूर्ण महाराष्ट्र...आणि हा महेश भट्ट??ये किस झाड कि पत्ती है?
On 4/3/2010 10:00 AM amit said:
राज साहेबांचे बरोबर आहे. ते जे काय करतात त्यांच्या वरती आमचा मराठी माणसांचा खूप विश्वास आहे, राज साहेबांनी फक्त मराठी माणसांचे मन ओळखले आहे, राज साहेबांनी माजी प्रतिक्रिया वाचली तर मला आणि माज्या मराठी बंदवाना खूप बरे वाठेन, राज साहेब तुम्ही एक दिवस महाराष्ट्र वरती राज्य करतान,
On 4/3/2010 9:59 AM amit said:
राज साहेबांचे बरोबर आहे. ते जे काय करतात त्यांच्या वरती आमचा मराठी माणसांचा खूप विश्वास आहे, राज साहेबांनी फक्त मराठी माणसांचे मन ओळखले आहे, राज साहेबांनी माजी प्रतिक्रिया वाचली तर मला आणि माज्या मराठी बंदवाना खूप बरे वाठेन, राज साहेब तुम्ही एक दिवस महाराष्ट्र वरती राज्य करतान,
On 31/03/2010 3:57 AM Amol said:
कॉंग्रेस हटाव देश बचाव...
On 3/18/2010 4:58 PM Sadanand said:
महेश भट आणि त्याच्या मुलाची चौकशी करा म्हणजे समजेल .अशोकराव , ते देशद्रोही त्यांची बाजू घेवू नका . त्याला खरच चेचून काढा सगळ बाहेर येईल .जय महाराष्ट्र !
On 3/18/2010 3:35 PM काँग्रेसी said:
या अंग खाजाव्या भट्ट ला एकदा इंगा दाखवलाच पाहिजे --- ( राज ठाकरे - तुमच्या मुद्द्याला आम्हा काँग्रेसी लोकांचा छुपा पाठंबा आहे )
On 3/18/2010 3:02 PM Avanti said:
सरकारच चुकीच्या लोकांच्या हातात आहे. आता अशोक चव्हाण देतील त्या महेश भटला स्वरक्षण आणि मग परत पुण्यात जसा हल्ला झाला तसा परत होइल. आणि हे नालायक लोक हसण्यावारी नेहतील. राज ठाकरे नी एकदम सही रित्या त्या महेश भट ला पकडले आहे. आता त्याची कसून चैकशी करायला सांगा आणि अशोकरावांची ही का एवढे support करत आहेत ते?
On 3/18/2010 2:24 PM Santosh said:
Raj Thakre mhantat te barobarach ahe Mumbaichya jeevavar evadhe paise milavtat (marathi mansachya) ta
On 3/18/2010 12:02 PM sachindeshmukh_143@yahoo.com said:
महेश भट यांचा मुलगा याचे हेडलीशी संबंध ........ मंग त्याला पण साव्रक्षण देणार अशोक राव ,,,,,,,,,, सरकार चुकीच्या माणसाचा हातात आहे ,
On 3/18/2010 12:01 PM Indian Hindu said:
manse raj thakre bajula theva te tar aaple ahet pan Mahesh bhatt ha nalayak manus ahe tyla haklavoon lava pakistanat
On 3/18/2010 12:00 PM Basavraj said:
शेखर, एक नंबर !!!!!!!!!!
On 3/18/2010 11:30 AM Tushar said:
महेश भट्टा च्या आईचा ......................! भट्टा ला हाकलून द्या मुंबई तून. जय महाराष्ट्र माझा
On 3/18/2010 11:25 AM Nirmall mm said:
हाच महेश भट शिवसेनेच्या शाहरुख विरोधी आंदोलनात पक पक करीत होता तेव्हा मनसेने आमचा समंध नाही सांगून याला प्रोत्साहन दिले .....आत्ता का हो आंदोलन करताय ? उगीच आंदोलनाच्या भानगडीत पडू नका आहे ती इज्जत घालून बसाल ...नको त्या विषयाला अधिक महत्व देऊन शिवसेने सारखी इज्जत घालाऊ नका ..चिरकुट भय्यांना मारणे taxi फोडणे इथपर्यंत ठीक आहे , संपूर्ण प्रशासन भट्टा च्या पाठीशी आहे म्हणून झेपेल इतकेच आव्हान स्वीकारा ??
On 3/18/2010 11:04 AM चेतन said:
......राज ठाकरे यांनी महेश भट यांना दिलेल्या इशाऱ्याबाबत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की पोलिस याबाबत दखल घेतील व योग्य ती कारवाई करतील........पोलिसांना तू दावणीलाच बांधले आहेस. हाच खरा खंडणीखोर आहे. सगळीकडून पैसे लुटतो आणि पोलीस प्रोटेक्शन देतो.
On 3/18/2010 11:02 AM Shirish said:
कोणीतरी खाली म्हंटले कि, पोलिसांना वर्क परमीट तपासू द्यात. अहो पण हे पोलीस आणि सरकार त्यांचे काम करीत नाही ना. मग जनतेला (मनसे) करावे लागते. मी गेली अनेक वर्षे परदेशी नोकरीला आहे. एक दिवस सुद्धा आम्हाला वर्क परमीट नुतनीकरण करण्यासाठी ushir करून चालत नाही. नाही तर भारतात डीपोर्त करायला तयार. मग आमच्याच देशात का असे?
On 3/18/2010 10:34 AM Deepak Badgujar said:
महेश भट्ट सावधान, आता तुमचे काही खरे नाही, आता तुमची फ्हाल्तु बडबड चालणार नाही. जय महाराष्ट्र
On 3/18/2010 10:30 AM मनसे said:
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. राज ठाकरे आगे बढो.
On 3/18/2010 10:24 AM sunil said:
यात काही शंका नाही कि ते मनसे चे अकरा कार्यकर्ते वर्क परमिट च्या नावाखाली फक्त खंडणी वसूल कार्यासाठीच गेले होते. पैसे मिळाले नाही मन्हून तर हे सर्व धमक्या चालू आहे. तसे पण मनसे ने महाराष्ट्राचे election झाल्यापासून फक्त तोडफोड आणि मारधाड याच्या व्यतिरिक्त काय केले. जय महाराष्ट्र.
On 3/18/2010 9:50 AM rbg002 said:
Mahesh Bhatt , is using media very cleverly on this.He directly launched a fake complaint and useless hindi media started Breaking NEWS on this fake case. Mahesh Bhatts son was named in Hadely case ,now Mahesh Bhatt is doing this. I think my MLA Pailwan Wanjale needs to meet this moron once to show him what Marathi 'HISKA' is. Jai Maharashtra !
On 3/18/2010 9:46 AM vishal bagkar 9764059865 said:
मुख्यमंत्र्यांनी महेश भट कडून किती खंडणी वसूल केली .....................शाहरुख आणि राहुल यांच्या साठी पोलिसांची झोप उडवलीत आता महेश भट साठी त्यांची पार वाटच लावा ...................पोलिसांची वाट लागेलच कारण हे मनसे चे आंदोलन आहे ................
On 3/18/2010 9:43 AM salim said:
मराठी माणसाच्या जोरावर एवडे कमावले थोडे फार त्यांना सुधा वाटून द्या खंडणीचा कला पैसा....... अशी माझही कळकळीची विनंती आहे
On 3/18/2010 9:37 AM Dipak Patil said:
मुंबई , महाराष्ट्रावर पुन्हा हल्ले झाल्यास अशोक चव्हाण जबाबदार राहतील. चौकशी दोघांची करा असा आदेश हवा .. बाईनी सांगितले म्हणून एकाचीच चौकशी योग्य नाही .
On 3/18/2010 9:36 AM Deshmukh said:
महेश भट मराठी भाषेला विरोध करतो हे मात्र नक्की आहे. त्याने ते बरयाच वेळेला दाखवून दिले आहे. त्यामुळे महेश भटवर विश्वास ठेवता येत नाही. हा प्रश्न मराठीशी संबधित आहे. येथे हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही हे लक्षात ठेवा.
On 3/18/2010 9:33 AM vish said:
सगळे बरोबर आहे पण मनसे चे लोक गुंडगिरी करतात हे काही खोटे नाही आता जरा मारधाड सोडून लोकांची कामे करा नाहीतर परत निवडून यायचे पण अवघड होईल..
On 18/03/2010 09:33 atul said:
मनसे ला कामाचे परवाने परदेशी कलावंतांकडे बघायाचे होते तर संबंधित अधिकाऱ्यांना का बरोबर नाही नेले... आता बारा वाटलं ..... ह्याला हिसका त्याला हिसका या नंतरच्या गोष्टी आहेत.... महेश भट्ट अत्यंत नालायक माणूस आहे, म्हणून त्यांनी आल्या संधीचा फायदा घेणे अपेक्षितच होते.... राज तुम मात खा गये यार वोह भी एक लंगुर से ...!
On 3/18/2010 9:31 AM dipak said:
पहिला साहेब शिवाजी टर्मिनस म्हणायला शिका ... काळ संपूर्ण भाषणात वी टी असे म्हणत होते...????????लक्ष्य नाही वाटत .....असो...
On 3/18/2010 9:24 AM Ashish said:
महेश भट यांची निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे आणि मनसे कार्यकर्त्या बरोबर मुख्य मंत्राची पण चौकशी करा कि ते चौकशी योग्य रीतीने करताहेत कि नाही. जय हिंद !! जय महाराष्ट्र !!!
On 3/18/2010 9:24 AM shekhar said:
हाच खेळ पुन्हा एकदा खेळतायत. चित्रपट तारे काहीतरी वाह्यात बोलणार/करणार. मग कुठलीतरी सेना रस्त्यावर उतरणार, पोलीस दंडुके घेऊन सेनेमागे. शेवटी निशस्त्र जनता गांधीजींचा "एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा", हा संदेश घेऊन सशस्त्र, निर्घृण अतिरेक्यांशी लढणार. त्यातले काही किड्या मुंगी सारखे मरणार. पुन्हा सरकार निषेध करणार आणि चर्चा करणार, झालंच तर आरक्षणाचे देखावे उभारणार. जे उरले, जगले वाचले त्यांचा जीव महागाई आणि जीवनाची लढाई घेणार. लोकशाहीच्या नावानं चांगभलं!
On 18/03/2010 09:13 sandeep gurav said:
सरकारने महेश भट्ट ला सुरखा देण्यापेक्स्या दहशतवादावर आपले लक्ष्य केंद्रित केले पाहिजे .नाहीतर इकडे महेश भट्ट ला सुर्क्स्या देण्याचा नादात आतंकवाधी आपला फायदा करून गेतील .मग अशोकराव बस तल्या वाजवत .
On 3/18/2010 9:05 AM Rahul said:
प्रिय राज यांस@....मनसे च्या फिल्म युनिओन ला सरकारी मान्यता आहे आणि त्या नुसार ते वर्क परमिट ची चौकशी करू शकतात..
On 3/18/2010 8:30 AM प्रिय राज यांस said:
तुम्ही "दुध के धुले" आहात हे कायदेशीर पणे सिद्ध करावे. पाहून घेण्याची भाषा फक्त गुंडांनाच शोभून दिसते. मी महेश भट यांचे अजिबात समर्थन करत नाही मात्र तुमचे म्हणणे देखील असमर्थनीय आहे. आणि "वर्क परमिट" तपासणे हे पोलिसांचे काम आहे त्यांनाच करू द्या. पोलिसांपेक्षा तुमचे कार्यकर्ते श्रेष्ठ आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास स्व:संरक्षणासाठी पोलिसांऐवजी तुमचे कार्यकर्ते ठेवावेत.
On 3/18/2010 8:25 AM Ranjit said:
महेश भट्ट च्या कामाची चौकशी व्हायला हवी ... त्याला पाकिस्तानी अफगाणी लोकांचा जास्ती पुळका आहे.....त्याला हिंदू सोडून बाकी लोकांची काळजी फार आहे आसे बरेच वेळा लक्षात येते...मी राज ठाकरे शी सहमत आहे
On 3/18/2010 8:17 AM amit said:
सगळ्यांन धडा शिकवण्याच्या नाताद मराठी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष कर
On 3/18/2010 4:45 AM ck said:
अशोक चव्हाण यांनी आता सर्व पोलिसांना भट यांच्या दिमतीला लावावे. ते पण खान वालेच आहेत. इतकेच नव्हे तर गरज लागल्यास army हि बोलवावे, तिकडे पाकिस्तानी हस्तक धुमाकूळ घालुदेत आणि निष्पाप मरुदेत. एका महेश सारख्या नालायाकाला वाचवायला हजारो निरपराध मेले तरी चालतील हे च तर चव्हाण यांचे ब्रीद आहे .
On 3/18/2010 2:34 AM Mr SPICE said:
निवडणुका आल्या कि मनसेची टेप सुरु होते.
On 3/18/2010 2:27 AM amol dhule kar said:
वा अशोकराव वा.......... as useal तुम्ही परत तोच dilog मारला . पोलीस या बाबत दखल घेईल व योग्य ती कारवाई करेल. मुले शाळेत पाडे पाठ करता तुम्ही तर........त्यांच्या हून हुशार आहेत तुम्हाला तर स्कॉलर शिप ला बसवले पाहिजे.
On 18/03/2010 02:26 Marathi1 said:
महेश भट आणि त्याचा मुलगा हे अतिशय निर्लज्ज लोक आहेत. Well done Rajaji. जय महाराष्ट्र, जय भारत.
On 3/18/2010 1:04 AM Ajit Deshmukh said:
Mahesh Bhat should be in jail for his all illegal activities and his relations with underworld gangsters and pakistani terrosists.
On 3/18/2010 1:01 AM akira said:
True. Many actors from other nations work illegally in India.
On 3/18/2010 12:56 AM Ajit Dhamdhere said:
Mr. Ahok Chavan should be ashamed of himself for his anti-marathi stand. Chavan is puppett of rich and gangster bollywood trash.
On 18/03/2010 00:54 raje said:
raj saheb..hya bhat la changle dhoon kaadha...hi bolywood mandali faar maajli aahet, sutasarkhe saral kara hyana...
On 3/18/2010 12:40 AM Sangamnath, NJ, USA said:
ते "देशद्रोही" फिल्म बनविणारा पण महेश भट्ट च होता ना ? प्रसिद्धी साठी एखादा चालू विषय घ्यायचा यात तर याचा हातखंडा आहे... या डरकाळी नंतर गप्प बसला तर ठीक, नाहीतर चेचून काढू याला...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: