Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी इंग्लंडचे सर्वांत मोठे पथक
वृत्तसंस्था
Friday, March 19, 2010 AT 12:00 AM (IST)

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्या यशस्वी संयोजनाने आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने असलेली भारतामधील सुरक्षेची चिंता मिटली असून, इंग्लंडने या स्पर्धेसाठी पाचशेहून अधिक खेळाडूंचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियानेही पूर्ण तयारीने या स्पर्धेत उतरण्याचा आपला मनोदय व्यक्त केला आहे.

इंग्लंड राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड या स्पर्धेसाठी खेळाडू, पदाधिकारी, प्रशिक्षक असे 560 खेळाडूंचे पथक पाठवणार आहे. इंग्लंडचे हे पथक मेलबर्न 2006 स्पर्धेत सहभागी झालेल्या पथकापेक्षा मोठे असेल. ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीसाठी आमचे खेळाडू या स्पर्धेकडे बघत आहेत, असे इंग्लंडचे पथक प्रमुख क्रेग हंटर यांनी सांगितले.

"विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेचे यशस्वी आयोजन भारताने करून दाखवले आहे. त्यामुळे सुरक्षेची काळजी नाही. आम्ही टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होऊ. ऑलिंपिक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे आम्ही बघत आहोत. आता कोण खेळाडू या स्पर्धेत खेळणार कोण नाही हे लवकरच समजेल,'' असेही हंटर म्हणाले.

"राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सुरक्षेचा मुद्दा आता गौण ठरेल. आतापर्यंत कुठल्याही खेळाडूने आम्ही भारतात जाण्यास उत्सुक नसल्याचे कळविलेले नाही, त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने स्पर्धेत उतरू,'' असे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल क्रीडा संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेरी क्रॉसव्हाइट यांनी सांगितले.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: