Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मारुती साठे खूनप्रकरणी आणखी चार जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 23, 2010 AT 12:15 AM (IST)

पुणे - सराईत गुंड मारुती महादेव साठे याचा खून केल्याच्या आरोपावरून स्वारगेट पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली. नगरसेवक सुनील कांबळे यांच्या सांगण्यावरूनच चौघांनी हा खून केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

दत्ता महादेव भिसे (वय 21), रावसाहेब महादेव भिसे (वय 30), अर्जुन रामभाऊ पवार (वय 30), विक्रम गणपत रोकडे (वय 24, चौघे रा. आंबेडकरनगर झोपडपट्टी, मार्केट यार्ड) यांना रविवारी पोलिसांनी अटक केली. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर शनिवारी साठे याचा भरदिवसा धारदार शस्त्रांनी वार करून खून झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी नगरसेवक कांबळे यांना अटक केली. प्रकृती बिघडल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी या चार आरोपींना अटक केली. कांबळे यांच्या सांगण्यावरूनच हा खून केल्याची माहिती चौघांनी दिली आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सोमवारी सांगितले.

गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यारे आरोपींकडून जप्त करायची आहेत, खुनाचा कट कोठे रचला, याची माहिती घ्यायची आहे, आरोपींची ओळख परेड घ्यायची आहे; तसेच आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: