Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

'ओबीसी' राजकीय आरक्षणाची मागणी अशास्त्रीय
सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, March 24, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: obc,   reservation,   parliament,   snn,   new delhi,   national

नवी दिल्ली - राज्यसभेनंतर आता लोकसभेत विरोधकांच्या तीव्र आक्षेपांमुळे महिला आरक्षण विधेयक मंजूर करवून आणण्याचे सरकारपुढे आव्हान आहे. यात प्रमुख आक्षेप इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) "राजकीय आरक्षणाचा' आहे. त्यावर सरकारला विरोधकांचे समाधान करता आलेले नाही. त्या पार्श्‍वभूमीवर अनुसूचित जाती-जमातींना दिलेले राजकीय आरक्षण त्यांच्या हक्कांचा भाग असून, त्यास ऐतिहासिक कारणेही आहेत. मात्र, "ओबीसीं'च्या राजकीय आरक्षणाची मागणी पूर्णपणे अशास्त्रीय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अनुसूचित जाती-जमातींना सामाजिक क्षेत्रातील मागसलेपणामुळे आरक्षण मिळाले. मंदिर प्रवेशाचा नाकारला गेलेला हक्क, अस्पृश्‍यतेची बसलेली झळ आणि उच्चवर्णीयांकडून अत्याचाराचे परिमार्जन करण्यासाठी अनुसूचित जातींना, तर झारखंड, छत्तीसगड यासारखे आदिवासीबहुल प्रदेश आणि देशभरात ठराविक भूभागात विखुरलेल्या आदिवासींमुळे अनुसूचित जमातींनाही सामाजिक व राजकीय आरक्षणाचा घटनादत्त अधिकार मिळाला. त्याआधारे दोन्ही समाजघटकांना साडेबावीस टक्के आरक्षण लोकसभेत आणि विधानसभांतही मिळाले. यात प्रामुख्याने "ओबीसी' पुरुष आणि महिलांचा प्रश्‍न येणार आहे.

लोकसंख्येत "ओबीसीं'चे प्रमाण निश्‍चित झालेले नाही. वेगवेगळ्या शासकीय व अशासकीय मानण्यानुसार "ओबीसीं'चे प्रमाण 42 ते 52 टक्के आहे. त्यामुळे त्यांना राजकीय आरक्षण नाही. मंडल आयोगाने या समाजाला लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याची शिफारस केली होती. परंतु, त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. यात "ओबीसीं'च्या राज्यनिहाय आरक्षण बदलण्याची मुख्य अडचण आहे. प्रत्येक राज्याने इतर मागासवर्गीयांची यादी तयार केली असून, त्याआधारे आरक्षण दिले आहे. त्यामुळे एखाद्या राज्यात एखाद्या जातीला "ओबीसी' आरक्षणाचा फायदा मिळत असला, तरी दुसऱ्या राज्यात तसा मिळतोच असे नाही. "ओबीसी' या व्याख्येत येणाऱ्या जाती सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असल्या, तरी अनुसूचित जाती व जमातींप्रमाणे त्यांना अन्यायाला तोंड द्यावे लागलेले नाही. त्यांच्या या मागासलेपणामुळे शिक्षण, सरकारी नोकऱ्या या सामाजिक क्षेत्रात त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आले असले, तरी घटनाकारांना या समाजाला राजकीय आरक्षण देण्याची गरज भासली नाही. त्यामुळे "ओबीसीं'च्या राजकीय आरक्षणाच्या मागणीच्या नावाखाली महिलांचे राजकीय आरक्षण हाणून पाडण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नव्या विधेयकानुसार लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. यात लोकसभेतील 543 पैकी 181 जागा महिलांसाठी राखीव होणार आहेत. तर, देशभरातील 28 राज्यांमधील विधानसभांच्या 4 हजार 109 पैकी एक हजार 370 जागा राखीव होतील. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अनुसूचित जाती-जमातींसाठी लोकसभेत अनुक्रमे 84 आणि 47 अशा 131 जागा यापूर्वीच राखीव झाल्या आहेत. त्यामुळे 181 जागांपैकी अनुसूचित जाती-जमातीतील महिलांसाठी त्याप्रमाणात जागा राखीव होतील. आधीच अनुसूचित जाती-जमातींच्या साडेबावीस टक्के आरक्षणानंतर महिलांच्या 33.3 टक्के आरक्षणामुळे एकूण आरक्षणाचे प्रमाण 55 टक्‍क्‍यांपर्यंत जाणार असल्याने त्यामुळेच भाजप आणि कॉंग्रेसमधूनच या विधेयकाबाबत दबक्‍या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.

33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त?
महिला आरक्षण विधेयकामुळे मिळालेले आरक्षण चक्री पद्धतीने (रोटेशन) बदलत जाणार आहे. आरक्षणानंतर लोकसभेवर निवडून गेलेल्या महिलेने मतदारसंघाची चांगली बांधणी केल्यास पुढील निवडणुकीत आरक्षण बदलल्यानंतरही ती महिला पुन्हा निवडणूक लढवू शकेल. त्यामुळे भविष्यात लोकसभेत महिलांची संख्या 33 टक्‍क्‍यांऐवजी अधिकही होण्याची शक्‍यता आहे. मात्र, या आरक्षणामुळे मतदारसंघ गमावणाऱ्या पुरुष उमेदवारांबद्दल विधेयकात थेट उल्लेख काहीही करण्यात आलेला नाही.
प्रतिक्रिया
On 20/12/2011 05:25 PM amol said:
मराठा झिंदाबाद........ह्या महाराना कश्याला पाहिजे आरक्षण.....लाथा घाला कम्बेरेवर
On 23/11/2011 06:03 PM Yogesh Bankar said:
महाराष्ट्रात २८८ पैकी २२० आमदार मराठा जातीचे आहेत...obc आरक्षण का हवे कळले का??
On 03/08/2011 09:57 PM Dev said:
ब्राह्मण लोकांना नवे ठेऊन काय मिळवणार तुम्ही? बोलायच्या आधी हा विचार करा आणि मग बोला - १. गणपती ब्राह्मीन आहे जानवे ghalto / शंकर ब्राह्मीन आहे / हनुमान ब्राहीन आहे / विष्णू , ब्रह्मा पण ब्राह्मीन आहेत. दत्ता महाराज तर ब्राह्मण आहेतच. मग आधी यांना तुमच्या घरातून बाहेर काढा. आहे हिम्मत? नाही न? मग कशाला उगाच बोलता? आम्हाला नको आरक्षण आम्ही आमचे समर्थ आहोत...देवी ची पूजा पण बंद करा तुम्ही अरे ते पण ब्राह्मीन आहेत...
On 25/03/2011 12:37 PM Vikram Dev said:
India is the only country where people fight to be called as backwards. No body wants to move forwards. आणि हीच वृत्ती यांना मागेच ठेवणार आहे. पुढे जाणारे पुढेच जातील, कुठल्याही सवलातीशिवाय आणि आरक्षणाशिवाय स्वतःच्या हिमतीवर. एकदा कुबड्या घेऊन चालायची सवय लागली कि स्वतःच्या पायावर सुद्धा विश्वास राहत नाही.
On 29/01/2011 11:07 PM Rushikesh said:
सर्वाचे आरक्षण काढून टाका म्हणजे .योग्यतेनुसार नोकरी,राजकीय सामाजिक लाभ मिळेल -------- घटनेने [आंबेडकर ] आरक्षण फक्त काही कालावधीसाठी देण्यास सागितले होते. आज ६३ वर्षे झालीत घटना लिहून . जय महाराष्ट्र .......................मराठा.
On 7/30/2010 1:16 PM Yadavi Yudh said:
Be prepared for future collapse of Indian Governance. People will fight among themselves on street. Again some foreigner will rule us. I am eagerly waitng for this 'Civil War'.
On 7/25/2010 9:07 PM संजय,कॅनडा said:
बापू झुरांगे सारख्यांना एक प्रश्न आहे ५००० वर्षेच कशाला पृथ्वी निर्माण झाली तेव्हा पासूनच बोंब मारा ना कि आमच्यावर अन्याय्य झाला कारण आदम आणि इव एकत्र आले आणि ह्या पृथ्वीवरचे हक्क विभागले गेले !! तुम्ही काय अपंग आहात काय ? सारख्या कुबड्या मागताय. आरक्षण घेतलेल्यांवर भरपूर कर आकारणी करून त्याची परतफेड करायला हवी. फायदा झाल्यानंतर परतफेड करायला काय हरकत आहे ? कायम सगळे फुकट कसे मागता ? आम्ही येथे आलो तेव्हा आम्ही शून्य झालो पण स्वबळावर पुन्हा उभे राहिलो इथे कोणीहि आरक्षण दिले नाही आम्हाला.
On 24-06-2010 21:06 rushikesh said:
कशाला हवे इतर मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण..? अहो राज्य करावे मराठ्यांनी. ह्याचं काय मध्ये...?
On 31-05-2010 22:06:43 yogesh bombe said:
आरक्षण प्रश्न हे तर सरकारचे अपयश.
On 26-05-2010 13:52:39 Bhimaji Dhamale Patil said:
रे बंद करा हे जाती पातीचे राजकारण... आरक्षण ठेवून जातीविरहीत समाज कधीही बनणे शक्य नाही. पूर्वी अन्याय झाला ह्या भांडवलावर आता अजून किती वर्षे हे descrimination चालणार आहे? ह्या आरक्षणामुळे कित्येक लायक व्यक्तींना संधी नाकारली जावून, नालायक लोकांना मिळते. भारतासारखा ढोंगी देश गप्पा समानतेच्या मारतो पण इतके प्रचंड descrimination promote करतो.
On 21-05-2010 10:26:48 krantikarak said:
जे खरच दालीद्री आहेत त्यांना द्या... हात पसरायची सवय लागली कि जात नाही...काय करणार.. कोट्याधीश सरकारी अधिकार्याची पोरे हि फुकटात शिकतात...ब्राम्हणांना डोक आहे आणि ते जो पर्यंत योग्य रीतीने वापरतात तो ठीक..नाहीतर सरकारची तीन ठिकाणी .................रस्त्या वरचा चांभार रस्त्यावरच आहे.. जी कमावतात ती कमावतात..फक्त ठराविक लोकेच वर्षनुवर्षे फायदा घेतात..तुम्हीच त्या बांधवांसाठी काही करा..ओ बी सी नो ...आम्ही ब्राह्मण आमच्या हिम्मतीवर जगू..जगतोय...तुम्ही सुखी राहा आम्हाला सुखी राहू द्या..
On 5/18/2010 1:32 AM Rohit said:
आरक्षण ! आम्हाला फार हौस नाही आली अमेरिकेत नोकरी करायची ... माझेही वडील सरकारी अधिकारी आहेत पण त्यांचा अनुभव बघता तिथून निघून जाणे योग्य वाटलं ! हे खरय १०० % आरक्षण द्या म्हणजे किमान ब्राम्हण संभ्रमात राहणार नाहीत आणि देश सोडून जातील ! तसेही आरक्षण मिळवणारे फारच हुशार असतात !! त्यामुळे देश चांगला चालेल ... आताही चांगलाच चालतोय इतका कि चालून चालून मोडकळीस आलाय ! पण माझी आजी नेहमी म्हणते तेच खरं " भिकेची हंडी शिगेला पोहोचत नाही " पण दान घेऊन कोणी घरंदाज होत नाही त्यासाठी जन्म घ्यायचं भाग्य लागत !
On 5/12/2010 4:44 PM judge1 said:
हिंदू म्हणतो ते बरोबर आहे बापू , फायदा असेल तर जात पाहिजे इतर वेळेस नको. जातीभेद ह्यांनीच तर जिवंत ठेवलाय . काही वर्षांनी आताचे उच्चवर्णीय अन्याय झाला म्हणून आरक्षन मागतील . माकडाच्या गोस्तीतल्या तराजू सारखे . आणि लोणी मात्र राजकारणी खाणार ... बघा पटतंय का ?
On 5/12/2010 4:39 PM judge1 said:
बीहर ,एमपी ऊपि मध्ये कमीत कमी हा विषय असू शकतो , महाराष्ट्र काही गरज नाही कोठल्या आरक्षणाची. फार तर आर्थिक निकष ठेऊन थोडे फार आरक्षण असावे, शिक्षण ,१२ वी नंतर आरक्षण नकोच . बुद्धी असेल तरच प्रवेश ,,, तसेच चपरासी किंवा चतुर्थ श्रेणी तच आरक्षण असावे .. अधिकारी वर्गात कुवत हेच महत्वाचे निकष असावे.
On 5/11/2010 8:12 AM vijay deshmukh said:
१०० % आरक्षण द्या .... बाकी लोकांना नोकरया, शिक्षण, सरकारी मदत, योजना यातून बेदखल करा .... जमत असेल तर भारतातून हाकला ... गरजच काय आहे अनारक्षित समाजाची .... उगाच ते बिझिनेस मध्ये घुसतील अन तिथेही वरचढ होतील ... त्यापेक्षा नकोच ते ... त्यांना जगात जिथे आरक्षण नसते तिथे मिळेलच नोकरी ... आणि नाही मिळाली तरी काय जाते ? ते जगो व मरो ... त्यांच्या पूर्वजांची केलेल्या चुकांची आणि आपल्या पूर्वजांनी केलेल्या मूर्खपणाची शिक्षा मिळायलाच हवी, नाही का ?
On 30-04-2010 06:50:06 aturam solapure said:
आरक्षणासाठी मारामारी कश्याला? सरळ सोपा हिशोब आहे.एस सी एस टी यांना २२.५% आरक्षण आहे त्यातील ३३% एस सी एस टी महिलांना राखून ठेवावे बाकी जागा पैकी २/३ पुरुषांसाठी यात ओ बी सी ना आरक्षण ठेवा त्याची टक्केवारी ठरावा उरलेल्या जागा सर्वसाधारण महिलांना राखीव असतील सर्वसाधारण पुरुषात जेवढे टक्के ओ बी सी ना राखीव तेवढेच टक्के महिलांना राखीव ठेवा. असे केल्यास लालू मुल्ला आणि शरद यादव या ओबीसी टग्यानचा आवाज बंद होईल आणि मग ते राजकारणातून हद्दपार होतील
On 4/13/2010 2:47 PM pratap said:
ya आरक्षणा mule deshachi vaat lagli ahe.
On 13/04/2010 12:50 PM Amol said:
आरक्षण फक्त आर्थिक असावे.. तसे बघितले तर आरक्षणं शिवाय आपला विकास होऊच शकत नाही असे काही जनतेचे मत पडले आहे आणी स्वताच्या बळावर पुढे येण्याची शक्तीच हि जनता गमावून बसली आहे. त्याचाही विचार व्हावा... लहान बाळाला पण आपण एक ठराविक वेळच सावरतो... नंतर त्याची पावले त्यानेच उचलायची असतात... आई-वडिलांनी नाही...
On 4/10/2010 12:12 PM Santosh said:
ओ बी सी लोकांना देखील आरक्षण आसावे कारण भारतात ५० ते ६० टक्के लोक ओबीसी मध्ये येतात. हा खरा बहुजन समाज आहे ह्यांना नाकारून चालणार नाही... दलित हे फक्त १० ते १२ टक्के आहेत, त्यांना देखील आरक्षण असायला हावे. पण आरक्षणाचा ज्यांनी फायदा घेतला आहे त्यांना परत आरक्षण देवू नये. तरच पूर्णपणे आरक्षण संपेल ... नाही तर चार फक्त पुढे जातील आणि समस्या त्याच राहतील.
On 4/1/2010 3:28 PM sawan said:
प्रशांतचा प्रश्न बरोबर आहे पण उत्तर त्याहीपेक्षा सोपे आहे. हे बदलायचे असेल तर लोकशाहीमध्ये मतदान हाच एक पर्याय आहे. आणि आपण सगळे शहाणे मतदानच करत नाही. जरा निरीक्षण केले तर समजेल कि कॉंगेस का निवडू येते ते. कारण ज्यांना आरक्षण मिळते,सवलती मिळतात तेच तर कॉंग्रेसला निवडून देतात. नाहीतर सर्व बंद होईल अशी भीती त्यांना आहे.आरक्षणाला विरोध करणारे किती मतदानाला बाहेर पडतात? average ५० % मतदान होते. बाकीच्या २० ते ३० % जरी लोकांनी मतदान केले तरी परिस्थिती बरीच बदलेले ! पहा करून .... ..
On 3/24/2010 6:05 PM ssd said:
सर्वांनी मिळून कोन्ग्रेस ला प्रचंड मतदान करा म्हणजे आरक्षण नष्ट होईल.
On 3/24/2010 4:39 PM prashant said:
येथे बघितले तर ९९ टक्के comments या against Reservation असतात पण तरीही देशात आरक्षण कसे नाहीसे होत नाही ..?????? आणि जे आरक्षण चा उपभोग घेतात ते येथे comment करत नाहीत कारण त्यांना माहित आहे कि खरोखरच त्यांना आरक्षणाची गरज नाही. .. पण हे चित्र कसे बदलणार ....... देश कसा सुधारणार .......
On 3/24/2010 3:13 PM Nitin Mane said:
SC / एसटी आरक्षण आदरणीय आंबेडकरांनी सुचवले हे योग्यच होते.पण ते अनिश्चित काल चालावे असे त्यांचेसुद्धा म्हणणे नव्हते आणि OBC तर केवळ संविधानिक भ्रष्टाचारच आहे. नुसत्या झुंड शाहीच्या जोरावर ते चालू आहे आणि फोफावत आहे.
On 3/24/2010 2:30 PM Girish said:
Bapu झुरांगे साहेब, तुम्ही म्हणता कि "सर्व शास्त्रे उच्चावर्नियांनीच लिहिलेली आहेत" पण या देशाचे सर्वात मोठे शास्त्र (भारतीय संविधान)कुणी लिहिले? आंबेडकरांनी. आणि त्यांनी देखील १० वर्षे आरक्षण दिले होते आणि गरज वाटल्यास आणखी ५ वर्षे वाढवून देण्याची सूचना केली होती.
On 3/24/2010 2:18 PM RAVE said:
अरे बापू झुरांगे ५ वर्षापूर्वी केलेली चूक सुद्धा विसरण्याची दानत अंगात लागते तेच तेच कवटाळून तुम्ही लोक किती दिवस आरक्षणाची भिक मागणार अरे तुमच्यापेक्षा त्या गरीब शेतकऱ्याचा विचार करा ज्याला खरच आज सरकारच्या मदतीची गरज आहे पण तुमच्या सारख्या काही विचारहीन लोकांमुळेच शेतकरी उपाशी मरतो आहे सरकार त्यांना पैसे पुरवू शकत नाही केवळ तुम्हाला सवलती दिल्यामुळे शेत्क्रर्यांच्या सवलतींना कात्री लागते आहे. सुधरा आता अजूनही वेळ गेली नाही. अर्रे हिम्मत असेल तर बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे या.
On 3/24/2010 1:48 PM Rhushikesh Patil said:
एक मराठा आणि हेरंब फडके यांनी जे लिहिले आहे ते अगदी योग्य आहे. आताचे बरेच ओबिसी श्रीमंत आहेत. आरक्षण द्यावे एवडी वाईट परिस्थिती नाही. मुळात आताच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थिती प्रमाणे ५० वर्षापूर्वीचे नियम कालबाह्य ठरतात. आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवरच असायला हवे. ब्राह्मण , मराठा समाजात सुधा खूप गरीब लोक आहेत त्यांचे काय? त्यांना तर कसलेच आरक्षण नाही मग त्यांच्यावर अन्याय होतो. म्हणजे पुन्हा तेच चक्र चालू ...... " जो कभी नाही जाती उसिको जाती कहते हें" ....... आता तरी जात पात सोडा..........
On 3/24/2010 11:55 AM ssd said:
Bapu Zurange , १०० वर्षे जरी आरक्षण दिले तरी तुमच्यात सुधारणा होणार नाही. कष्ट करायची सवय ठेवा. कुबड्या न घेता स्वाभिमानाने जगायला शिका.
On 3/24/2010 11:41 AM prashant said:
आरक्षणं मध्ये आर्थिक निकष हा फार महत्वाचा आहे ......... कारण जे obc/sc/st आरक्षणाचा लाभ घेतात त्यांना काडीमात्र त्याची गरज नसते ...ज्यांना खरी गरज असते त्याच्यापर्यंत हे आरक्षण पोहोचताच नाही ....
On 3/24/2010 11:24 AM Hindu said:
अहो बापू तुम्हाला आता नुसते फुकट खायची आणि लायकी नसताना ओरबाडायची सवय लागली आहे !!!! तुमच्यात बुद्धी नाही आणि ती खामता नाही म्हणूच तुम्हाला आरक्षण ची गरज लागते फुकट मिळते ना !!! आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागाल्स्लेल्यांच मिलालायला पाहिजे मग तो कोणत्याही जातीचा आसो !!! ब्राह्मीन हे जन्मालातच हुशार असतात आणि त्यांना आरक्षांच्या कुब्द्याची अजिबात गरज नाही !!! तुम्ही आणि १०० varshe fukatche kha !!! satta tumchich आहे !!!
On 3/24/2010 11:11 AM Mahesh said:
OBC na reservation n denyamage uchhavarniyanche hit adve yete.OBC na nyay nakaraycha he tharlele ahe.ata je lok nivdun yatat tyanchyach gharatil striya nidun yetil va eka gharat vadil, aai, mulga, mulgi, sun ase MP hotil. Jai Hind
On 3/24/2010 10:49 AM Suresh said:
Obc लोकांचे आरक्षण अशास्त्रीय कसे ते जेंव्हा आपणाला सिद्ध करता येईल तेह्न्वाच आपण अशा गोष्टी बोलाव्यात
On 3/24/2010 10:23 AM Prabhakar Dudhbhate said:
आर्थिक आरक्षण हेच एक शास्त्रीय आरक्षण आहे हे जेंव्हा ह्या देशाला पटेल तेंव्हाच खऱ्या प्रगतीची आशा आहे. तोपर्यंत दुर्दैवच सुरु राहील
On 3/24/2010 10:02 AM हेरंब फडके said:
इतके वर्ष आरक्षण होतेच ना.....मग आरक्षणवाल्या लोकांची उन्नती का झाली नाही....आरक्षणाचे लाभ व्यक्तीपर्यंत पोहोचतात का??? आर्थिकदृष्ट्या आरक्षण हि कल्पना चांगली आहे...पण ती सगळ्यांना लागू झाली पाहिजे...जातीवरून आरक्षण मागणे आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचा निषेध करणे यात काय फरक राहिला???
On 3/24/2010 10:01 AM Bapu Zurange said:
सर्व शास्त्रे उच्चावर्नियांनीच लिहिलेली आहेत त्यामुळे त्यांच्या या कथनाशी आम्ही अजिबात सहमत नाही.दुसऱ्याला त्याच्या हक्काचा वाटा देण्याची वेळ आली कि यांना नेहमीच शास्त्राची आठवण होते. ५००० वर्षे आम्हाला छळत असताना यांची शास्त्रे कोठे गेली होती? ओबीसी वर अन्याय झाला नाही हे कशाच्या जोरावर म्हणू शकतात? अर्थ स्पष्ट आहे, सध्या सत्ता यांच्याकडेच आहे. महात्मा फुले यांना मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीतून शुद्र म्हणून हाकलले हा अन्याय नव्हता काय? अजूनही आम्हाला १०० वर्षे सर्वांगीण आरक्षण पाहिजे.
On 3/24/2010 9:01 AM Ek Maratha said:
ओबीसींना कुठलीही झळ पोचलेली नाही. भगवान कृष्ण हे गवळी होते पण त्यांना देव मानले आहे. अनेक sadhu SAdhvI हे tathakathit OBC samajAtale Ahet. mUL hindu dharmat jati asalya tarI tyat uchch-neechata नाही tI nantar lokAnnI ghusavali आहे. tyAyoge dalitAnvar kharAch anyay jhalA आहे tyamuLe keval tyAnchAch rakhIv jAgA hA hakk आहे. to dekhil shri. AmbedkarAnna 50 varshanpalikade mAnya navatA. ek piDhi shikalI ki tI magas kashi? puDhchyA pidhila Quota milane chukIche आहे.
On 3/24/2010 7:44 AM reader said:
अशास्त्रीय म्हणजे? बाकीच्रे आरक्षण शास्त्रीय कसे हे सांगू शकाल काय? धन्यवाद...
On 3/24/2010 7:18 AM as said:
३३% महिला ३३% मागासवर्गीय ३३% अल्पसंख्यांक १% राहिलेले.. mera bharat mahan ! Jai hind.
On 24/03/2010 3:00 AM Amol said:
अशास्त्रीय वगैरे काही नाही. ज्या वरच्या जातींनी राजकारणास आपली खासगी मालमत्ता केले आहे त्यांचे दिवाळे निघेल म्हणूनच असे आरोप चालू आहेत.
On 24/03/2010 02:30 Ek Bramhan said:
SC/ST ना reservation मिळालेच पाहिजे. त्यांच्यावर झालेला ऐतिहासिक अन्याय मोठा आहे. हे घटनेने मान्य केले आहे. (नेहरू, आंबेडकर, महात्मा गांधी) ओबीसींना राजकीय क्षेत्रात आरक्षण मिळू नये. ते घटनाबाह्य ठरेल. बाकी ठिकाणी आरक्षण देताना २ निकष ठेवा (१) क्रिमी लेयर ला देवू नका. ओबीसी श्रीमंत लोकांना अजिबात आरक्षण देवू नये. (२) ५०% ओबीसी स्त्रीयांना द्या. (३) एकाच पिढीला आरक्षण द्या. USA मध्ये black skinned लोकांना आरक्षण आहे. जय भारत, जय महाराष्ट्र.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: