राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रिन्स चार्ल्स येणार
वृत्तसंस्था
Thursday, April 01, 2010 AT 07:06 PM (IST)
नवी दिल्ली - भारतात या वर्षी 3 ते 14 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स उपस्थित राहणार आहेत. ब्रिटिश उच्चायुक्तालयानेच गुरुवारी ही बातमी दिली. ब्रिटनच्या राणीचे प्रतिनिधी म्हणून प्रिन्स चार्ल्स स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहतील, अशी माहिती ब्रिटिश उच्चायुक्तालयाने दिली असून, त्यांच्या भारत भेटीचा सविस्तर कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.