Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'द ग्रेट बॅरियर रीफ' अ‍ॅट रिस्क!
डॉ. भारत करडक, सिडनी, ऑस्ट्रेलिया
Saturday, April 10, 2010 AT 12:00 AM (IST)

गेल्या शनिवारी ऑस्ट्रेलियातील जगप्रसिद्ध 'द ग्रेट बॅरियर रीफ' हे जागतिक वारसा म्हणुन जाहीर झालेले नैसर्गिक क्षेत्र एका चिनी जहाजाच्या अपघातामुळे धोक्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातून निर्यात होणारा कोळसा चीन ला घेउन जाणारे हे जहाज, 'शॉर्टकट' मार्गे ऑस्ट्रेलियाहुन चीनकडे निघाले होते. या परिसरातील अनेक कोळसा खाणीतून कोळसा वाहुन नेणारी जहाजे अशाच प्रकारे 'शॉर्टकट' मारत असतात हे आता समोर आले आहे. त्या जहाजातून होणार्‍या तेल गळतीमुळे येथील प्रवाळ बेटे धोक्यात सापडले आहेत. येथील पर्यावरणवाद्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधान अन् विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देउन या प्रकाराला जबाबदार असणार्‍यांना कठोर शिक्ष देण्याचे सुचवले आहे.
 
ऑस्ट्रेलियात अवैध मार्गाने येणार्‍या परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करुन ठेवण्यासाठी 'ख्रिसमस बेटा'वरील तुरुंग अपुरे पडत असल्याचे दिसते आहे. येथील तटरक्षक दलांना दररोज एक नवीन बोट ऑस्ट्रेलियन किनार्‍यावर अंदाजे १०० लोकांना गैरमार्गाने घेउन येताना आढळते आहे. नुकतेच यातील काही लोकांना मुख्य भुमीवर आणून ठेवले गेले. यावर विरोधी पक्षांनी खूपच टिका केली. कारण बेटावर असणारे नागरिक जर मुख्य भुमीवर आले तर त्यांचे हक्क अन् अधिकार हे नव्याने तपासून पहावे लागतील अन त्यांना येथील रहिवासाचा परवाना अथवा नागरीकत्व देण्यासाठी भाग पडु शकते.
 
सध्या ऑस्ट्रेलियाला निर्वासितांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावतो आहे. इराक, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेतून असंख्य निर्वासित इकडे येत आहेत. नुकतेच येथील सरकारने अफगाण आणि श्रीलंकन निर्वासितांचे कागदपत्र तपासणीचे काम अनुक्रमे सहा आणि तीन महिने थांबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता जे निर्वासित लोक स्थानबद्ध केलेले आहेत, त्यांना त्यांच्या अर्जांवर निर्णय मिळण्यासाठी अधिक काळ थांबावे लागेल.
 
२००२ ते २००६ या काळात स्पेनमध्ये राहत असताना दररोज टीव्हीवर असेच आफ्रिकन निर्वासित अन अवैध नागरिक पकडल्याच्या बातम्या दिल्या जात असलेल्या पाहिल्या आहेत. आताही ऑस्ट्रेलियन टीव्हीवर नेहमी यावर चर्चा सुरू असते.
 
सर्वच प्रगत देशांना/राज्यांना(?) निर्वासित आणि अवैध मार्गाने येणार्‍या नागरिकांचा प्रश्न सतावतो आहे. अन त्यामुळे तेथील भुमिपुत्रांच्या अस्मितांना धुमारे फुटत आहेत. एकुणच सर्वत्र भुमिपुत्र अन उपरे अश्या संघर्षाला नवीन परिणाम प्राप्त होत आहेत. विकासाची 'बेटे' निर्माण होण्यापेक्षा 'सार्वत्रिक' विकास होणे हाच यावरचा अंतिम उपाय असु शकतो. सर्वच देशांतील/राज्यांतील नेतृत्वाला यावर सातत्याने विचार अन कृती करणे आवश्यक आहे.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 24/06/2011 06:04 PM narupawar said:
भारतात .... कोणतेही लोक चालतील .... तेवढेच मतदार जास्त होतील अन...... आमच्या राजकार्ण्यैंची पोळी भाजेल .......
On 29/05/2011 05:29 PM Pawan Pawar said:
snehal tumhi asa ka म्हणताय ??
On 21/02/2011 09:12 PM prasad d said:
हा लेख वाचला आणि शालेय पुस्तकातली आतले नि बाहेरचे .. हा धडा आठवला(बहुधा ना.सी.फडकेंचा असावा)! कुणी हि यावे राहावे, रेशन कार्ड मिळवावे, मतदार यादीत घुसावे व सवलती मिळवून वर त्रासहि द्यावा हे फक्त भारतातच होवू शकते. बाकी देश आपल्या देशाची अशी धर्मशाळा बनू देत नाहीत.
On 9/10/2010 2:59 PM vasant said:
हे सर्वे प्रगत देशांना लेबर वर्क करण्यासाठी चीप लेबर हवे असतात. गरज असेल तेव्हा ते आपल्या देशाचे लो बदलून एसिअन देशातून लोक मागवून धेतात. नंतर काम संपल्यावर त्यांना हेच लोक नको वाटतात. हि समज प्रगतशील देशाचा लोकांना कधी येणार ? पण ते बिचारे काय करणार ? शेजारचा नंदू फोरेनला जावून आल्यावर अशी style मारतो कि त्याचे सर्व मित्र फोरेनला जायला कुठलाहि एजंटला कितीही पैसे देतात.
On 7/22/2010 10:57 PM Kolhaa said:
खुळी टाळकी !!! कायबी लिवा कायबी वाचा. मेंढरागत ऱ्हावा.
On 6/23/2010 10:52 AM Fox said:
Max आपली मानसिक स्थिती बरोबर आहे ना?????????
On 4/16/2010 1:52 AM Max said:
काय हा लेख , फुकटवेळ घालवायला लिहील आहे वाटत. शी काहीही लेख लिहितात हे लोक.
On 4/14/2010 3:13 PM Vikram said:
अरे ह्या काय इयत्ता आठवी च्या मुलांच्या गप्पा चालल्या आहेत का ?
On 4/14/2010 2:00 PM Snehals'a Friend said:
ऑस्ट्रेलिया हा एक घाणेरडा देश आहे तिथे जाण्याचे स्वप्ना तू बघत आहेस रोहन...अपल्या लोकांना कशी वागणूक दिली जात आहे माहित आहे न तुला....
On 4/13/2010 11:06 AM mohan said:
स्नेहल- गप्प बैस..
On 4/12/2010 4:08 PM Snehal said:
@रोहन....ही काय प्रतिक्रिया झाली?????????
On 4/11/2010 9:14 AM rohan said:
ऑस्ट्रेलिया- एक स्वप्न..


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: