पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेत पोहचले
वृत्तसंस्था
Sunday, April 11, 2010 AT 08:53 AM (IST)
वॉशिंग्टन - चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे शनिवारी रात्री वॉशिंग्टन येथील विमानतळावर आगमन झाले. या दौऱ्यात मनमोहन सिंग दोन दिवस चालणाऱ्या आण्विक सुरक्षेवरील शिखर परिषदेत सहभागी होणार असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. या शिखर परिषदेत ४६ देशांतील नेते सहभागी होणार आहेत.