Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा नकोच!
सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, April 12, 2010 AT 12:41 AM (IST)
Tags: armour,   india,   america,   snn,   international
उत्तम कांबळे - सकाळ न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन - अमेरिकेने पाकिस्तानला कोणत्याही स्थितीत शस्त्रास्त्रांचा पुरवठा करू नये, असा आग्रह भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे धरावा, अशी एक प्रबळ लोकभावना आज "व्हाइट हाउस'च्या परिसरात भेटलेल्या अनेक भारतीयांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

"व्हाइट हाउस'च्या परिसरात सकाळी भारतातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेरफटका मारला. रविवार असल्याने लोकांची प्रचंड गर्दी होती. शिखर परिषदेनिमित्त जगभरातील नेते येणार असले तरी सुरक्षा व्यवस्थेची झळ सर्वच सामान्य माणसांना बसणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतलेली दिसते. "व्हाइट हाउस'च्या समोरील भव्य उद्यानात जगभरातील
पर्यटकांची आणि अमेरिकास्थित नागरिकांची गर्दी होती. विशेष म्हणजे गेले दोन दिवस वाहणारे थंडीचे वारे एकाएकी थांबले होते आणि चक्क ऊ न पडले होते.

आंध्र प्रदेशातील एक ज्येष्ठ जोडपे आपली मुलगी, नात आणि जावयासोबत बागेत फिरत होते. गुजरातमधील एक तरुण जोडपे तसेच पश्‍चिम बंगालमधील एक कुटुंबही या ठिकाणी भेटले. मनमोहनसिंग आणि ओबामा यांच्या भेटीत नेमके काय होणार, याविषयी येथील भारतीयांना प्रचंड उत्सुकता आहे. या सर्व भारतीयांना बोलते केले. काहींनी तर कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती आणि ती म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला कसलीही मदत देऊ नये. अमेरिकेकडून मिळालेली मदत पाकिस्तान भारताविरुद्ध वापरत आला आहे, हे सांगायलाही अमेरिकेतील भारतीय विसरले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध अधिक मैत्रीचे होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपला पूर्वनियोजित दौरा बदलून तो एक दिवस अगोदर सुरू केला. त्यामागेही एक कारण आहे. अध्यक्ष ओबामा यांनी आण्विक शिखर परिषदेपूर्वी जगातील सात-आठ राष्ट्रांच्या प्रमुखांशी स्वतंत्रपणे बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यात भारतही आहे. परिषदेच्या वेळी द्विपक्षीय संबंधावर निवांतपणे बोलता येणार नाही, म्हणून ओबामा यांनी एक दिवस अगोदर येण्याचे निमंत्रण डॉ. मनमोहनसिंग यांना दिले.

अमेरिकेत प्रथमच होत असलेल्या आण्विक शिखर परिषदेकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. या परिषदेच्या निमित्ताने जगात शांतता निर्माण करण्यासाठी कोणते पाऊल टाकले जाते याविषयी येथे उत्सुकता आहे.
प्रतिक्रिया
On 12/04/2010 15:03 adisunn said:
very true... why such wrong news get published to confuse Indian?
On 4/12/2010 1:07 PM DIlip said:
very true about what Ravi said. Most of the Indians out of India are fedup with religion based congress politics and it's -ve approach to Hindu base parties in India. In no part of the world this is happening that religion based parties are troubled to such extent. Most Indians OOI believes that this is reaulting in loosing Indian identity across the world.
On 4/12/2010 10:20 AM judge1 said:
well said ... especially last sentence.
On 4/12/2010 9:58 AM Babare.Dubai . said:
स्वर्गात गेल्यावर जसे आपले पूर्वज किवा यक्ष किन्नर व अप्सरा भेटतात...तसेच यांना आंध्र प्रदेशातील एक ज्येष्ठ जोडपे आपली मुलगी, नात आणि जावइ, गुजरातमधील एक तरुण जोडपे तसेच पश्‍चिम बंगालमधील एक कुटुंब यांना भेटले...अख्ख्या अमेरिकेत गेलात तर असे काठाकाठाने फिरणारे व देशी म्हणून तांदळातील खड्यासारखे बाजूला हकललेले अनेक भारतीय दिसतील..त्यांना मत विचारायचे म्हणजे कल्याणाच झाले...
On 4/12/2010 6:46 AM Ravi Bhamre said:
I was at White house lawn yesterday morning till evening and among the Indian tourists I noticed no one talking about Manmohan singh's visit to US. They were just busy watching White house, taking pictures and hoping to get a glimpse of Prez. Obama. They clearly know Singh is just an puppet PM and he won't utter a single word against Pakistan and loose the muslim votebank for his congress party.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: