Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

तजेला देणारी फेशिअल्स
मनीषा सोमण
Thursday, April 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: beauty,   facial


बदलत्या वयाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार त्वचेला लागू होईल असं फेशियल केलं जातं. साधारण 18 ते 20 वर्षांनंतरच्या वयात फेशियल करणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे त्वचा जास्त उजळते आणि त्वचेचं 'वय' होणंही काही काळ लांबतं. कोणत्याही चांगल्या पार्लर वा स्किन क्‍लिनिकमध्ये आधुनिक सौंदर्यशास्त्रानुसार प्रत्येक चेहऱ्याला लागू होईल अशाच प्रकारे फेशियल डिझाइन केलं जातं.

वाढतं प्रदूषण, धूळ, प्रखर ऊन, ताण-तणाव, जागरणं, आहार या सगळ्याचाच परिणाम आपल्या त्वचेवरही होत असतो. त्यामुळेच त्वचेच्या समस्यांमध्येही वाढ होत असल्याचं दिसून येतं. चेहऱ्यावर तर या सगळ्याचे दुष्परिणाम लगेचच दिसून येतात; पण योग्य प्रकारे काळजी घेतली तर हे दुष्परिणाम टाळणं शक्‍य आहे. पार्लरमध्ये जाऊन नियमित फेशियल करून घेणं हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय. तशी प्रत्येक पार्लरमध्ये केली जाणारी फेशियल ही एक कॉमन ट्रीटमेंट आहे. बदलत्या वयाच्या गरजेनुसार त्वचेला लागू होईल असं फेशियल केलं जातं. लहान वयात फेशियल करून घेण्याची काहीच गरज नसते. त्यामुळे साधारण 18 ते 20 वर्षांनंतरच्या वयात फेशियल करणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे त्वचा जास्त उजळते आणि त्वचेचं "वय' होणंही काही काळ लांबतं. कोणत्याही चांगल्या पार्लर वा स्किन क्‍लिनिकमध्ये आधुनिक सौंदर्यशास्त्रानुसार प्रत्येक चेहऱ्याला लागू होईल अशाच प्रकारे फेशियल डिझाइन केलं जातं. यात सगळ्यात आधी त्वचेला हलकं पॉलिश केलं जातं. त्यामुळे त्वचेवर ज्या मृत पेशी असतात त्या निघून जातात आणि त्वचा मृदू होते. त्यानंतर आधुनिक व्हॅक्‍युम तंत्र वापरून ब्लॅक हेड्‌स आणि व्हाइट हेड्‌स काढले जातात. या तंत्रामुळे ब्लॅक हेड्‌स, व्हाइट हेड्‌स काढताना होणाऱ्या वेदना टाळता येतात. त्यानंतर कोरफड (ऍलोव्हेरा)सारखा एखादा मास्क लावला जातो. यामुळे त्वचा दीर्घकाळासाठी टवटवीत राहायला मदत होते.

त्वरित परिणाम दाखविणाऱ्या फेशियलचा वेळोवेळी उपयोग करून घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र आपल्या त्वचेला काय योग्य आहे ते मात्र बघणं आवश्‍यक आहे. फेशियलचा उद्देश चेहरा स्वच्छ करणं हाच असला तरी ते करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. नक्‍की कशासाठी फेशियल करायचं आहे यावर कोणतं फेशियल करायचं ते ठरतं.
 • बेसिक, बॅलन्सिंग आणि ट्रीटमेंट
  साधारणपणे फेशियलची तीन भागांत विभागणी करता येईल. एक म्हणजे "बेसिक फेशियल'. चेहरा नितळ राहण्यासाठी नियमितपणे क्‍लीन्झिंग आणि मॉयश्‍चरायझिंग करावं लागतं, त्याचा या फेशियलमधे समावेश आहे. दुसरा प्रकार आहे "बॅलन्सिंग फेशियल'. यात तेलकट वा कोरड्या प्रकारच्या त्वचेवर उपचार केले जातात. मात्र यातही त्वचा अति खराब झालेली नसते. खूप काम, सतत एअर कंडिशनमधे बसणे, किंवा सतत उन्हात फिरणे, अति फिरणे किंवा सततचा प्रवास, सनब्लॉक-मॉयश्‍चरायझरचा नियमित वापर नसणे, या आणि अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर परिणाम होत असतो. यासाठी या प्रकारचं फेशियल केलं जातं. यात तेलकट त्वचेसाठी हायड्रेटिंग ट्रीटमेंट दिली जाते, तर कोरड्या त्वचेसाठी डी-टॉक्‍सिकेशन ट्रीटमेंट दिली जाते. याचा उपयोग त्वचेला मूळपदावर आणण्यासाठी होतो.

  फेशियलचा तिसरा प्रकार आहे "ट्रीटमेंट फेशियल म. काहींच्या त्वचेच्या बाबतीत खूपच गंभीर समस्या असतात. पुटकुळ्या होऊन त्यांचं रूपांतर मुरमामध्ये झालेलं असतं किंवा चेहऱ्यावर पॅचेस असतात, डाग असतात, फोटो एजिंग, प्रिमॅच्युअर एजिंग, हार्मोनल चेंजेसमुळे होणारे परिणाम, अशा किती तरी समस्या असू शकतात. या समस्या कित्येकदा इतक्‍या गंभीर स्टेजपर्यंत पोचलेल्या असतात की त्यांना अगदी काळजीपूर्वक हाताळावं लागतं. यासाठी वेगळ्या, अधिक ऍडव्हान्स पद्धतीची फेशियल करावी लागतात. त्यांची ट्रीटमेंट वेगळी असते, वापरली जाणारी प्रॉडक्‍ट्‌सही वेगळी असतात. चांगल्या दर्जाच्या पार्लरमधूनच अशी ट्रीटमेंट फेशियल्स केली जातात आणि ती करण्यासाठी खास स्किन टेक्‍निशियन्सही असतात. ते समस्येच्या मुळाशी जाऊन ट्रीटमेंट देतात. त्यासाठी टेक्‍निशियन्सना ट्रेनिंग दिलं जातं. या ट्रीटमेंट म्हणजे क्‍लायंटच्या त्वचेचा प्रश्‍न असतो. थोडी जरी चूक झाली तरी कायमस्वरूपी वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नक्‍की समस्या काय आहे ते समजून घेऊन मग त्यावर योग्य उपचार करावे लागतात. यासाठी रेग्युलर सेशन्सची गरज असते. यामध्ये विशिष्ट एखादी उपचार पद्धती सांगता येत नाही. कारण प्रत्येक त्वचा वेगळी असते, तिची समस्या वेगळी असते. त्यामुळे त्या त्वचेचा विचार करूनच ट्रीटमेंट ठरवली जाते.
 • स्पा फेशियल
  स्पा फेशियल हा फेशियलमधला आणखी एक प्रकार. खरं तर कोणत्याही स्पा ट्रीटमेंट्‌स म्हणजे अगदी श्रीमंती आनंद असतो. त्यांना लक्‍झुरियस ट्रीटमेंट्‌स असं म्हटलं जातं ते त्यामुळेच. सगळ्या कटकटी, विवंचना, ताण दूर करून काही काळ असीम शांतता अनुभवण्याचा आनंद या ट्रीटमेंटमुळे मिळतो. यात मरीन थेरपीवर भर असणं स्वाभाविकच आहे. ओशन थेरपी, सी-वीड्‌स, सी ग्लान्ट्‌स, काव्यार ट्रीटमेंटसारखे अगदी वेगळे प्रकार यात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ट्रीटमेंट उपचार म्हणून केल्या जात नाहीत, तर फक्‍त रिलॅक्‍सेशनसाठी केल्या जातात. तेव्हा त्यासाठी भरपूर वेळ काढूनच सलूनमधे जावं.

  सी-वीड ट्रीटमेंटमध्ये तर त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाज क्रीमपासूनच यातला वेगळेपणा जाणवू लागतो. या क्रीमसाठी "क्रिस्पस' हे खास सी-वीड (अर्थात समुद्र वनस्पती) वापरली जाते. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्रीम हवेतील ऑक्‍सिजनचे पार्टिकल्स मोडून त्याचं पाणी तयार करत असतं. यामुळे मसाज करताना सतत पाणी तयार होत असतं आणि त्वचा कोरडी पडत नाही. हे वीड हजारो वर्षं जुनं असतं. वारा-पाऊस-वादळं-सूर्यप्रकाश यासह वातावरणातील अनेक बदलांतून अनेक वर्षं गेलेलं हे वीड इतक्‍या वर्षांनीसुद्धा तितकंच ताजं टवटवीत असतं. म्हणजे ते किती गुणकारक ठरत असेल याचा विचारच केलेला बरा! या किंवा कोणत्याही मरीन थेरपी मसाजमधे डीप स्ट्रोक मसाज दिला जातो, जो रक्ताभिसरणासाठी अतिशय परिणामकारक ठरतो.
 • चॉकलेट थेरपी
  चॉकलेट थेरपीमधील आनंद तर काही वेगळाच आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला पाहिजे. हे सर्वार्थाने लक्‍झुरियस फेशियल आहे. हे फेशियल करण्यासाठी येणाऱ्यांचा उद्देश टेन्शन्सना दूर करून काही काळ तरी शांत वाटावं हाच असतो. यासाठी जी क्रीम वापरली जातात तीही नेहमीपेक्षा वेगळी असतात. यात मुख्यत्वे कोको बटरचा उपयोग केला जातो. अन्य क्रीम्सही त्वचा अगदी मऊसूत करणारी असतात. यात मसाज फार डीप केला जात नाही. यात आधी थोडा मसाज केला जातो आणि ट्रीटमेंटनंतर थोडा मसाज केला जातो. या मसाजमुळे त्वचा अधिक मऊसूत होते, ज्याला मिड-टिश्‍यू मसाज म्हणतात. त्यानंतर चॉकलेटमध्ये जोजाबाच्या बिया घालून त्याचा उपयोग स्क्रबरसारखा केला जातो. सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे मास्क. यासाठी जे मास्क वापरले जातात ते कोरड्या त्वचेसाठी चटकन कोरडे न होणारे, तर नॉर्मल ते कम्बाइन स्किनसाठी सेटिंग मास्क असतात. या आरामदायी ट्रीटमेंटचा परिणाम फक्‍त त्वचेवरच नाही तर संपूर्ण तन-मनावर होतो. सगळे ताण-तणाव दूर होऊन नव्या जोमाने, नव्या ताण-तणावांसाठी आपण सज्ज होतो. एकूणच, अशी ट्रीटमेंट म्हणजे फक्‍त सौंदर्यसाधना नसते तर नवसंजीवनी देणारी प्रक्रियाच असते.
 • डायमंड, गोल्ड आणि पर्ल फेशियल
  डायमंड, गोल्ड, आणि पर्ल फेशियल हे प्रकार लक्‍झुरियस आणि ट्रीटमेंट फेशियल या दोन प्रकारांत मोडतात. अर्थातचं ही महागडीही असतात डायमंड फेशियल वाढत्या वयाच्या खुणा रोखण्यासाठी केलं जातं. डायमंड फेशियलमध्ये जे डायमंड स्किन नरिशिंग क्रीम वापरलं जातं त्यात रत्नभस्मासह, खस, तुळस, संत्रं यासारख्या अरोमा तेलांचादेखील वापर केला जातो. या क्रीमने मसाज केल्यानंतर डायमंड मास्क लावला जातो, ज्यामुळे त्वचा मऊसूत, तजोलदार होते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

  गोल्ड फेशियलमधे 24 कॅरेट गोल्ड रेडिअन्स जेल आणि गोल्ड मास्क वापरला जातो. यात कोरफड, चंदन वगैरे अरोमा तेलांचादेखील वापर केला जातो. या फेशियलमुळे शरिरातील टॉक्‍सिन्स निघून जाऊन रक्‍ताभिसरण सुधारण्यास मदत होते. चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठी मौक्‍तिक भस्म वापरण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. त्यावरच आधारित असतं पर्ल फेशियल. यात मुख्यत्वे मौक्‍तिक भस्माचा वापर केला जातो, ज्यामुळे त्वचेवरील डाग आणि काळपटपणा कमी होऊन चेहरा टवटवीत आणि उजळ दिसण्यास मदत होते.
 • अरोमा फेशियल
  अरोमा थेरपी ट्रीटमेंट फेशियल हा प्रकारही आज खूपच लोकप्रिय आहे. यात शारीरिक व्याधी दूर करण्याची जशी क्षमता आहे तशी मानसिक शांती देण्याचीही क्षमता आहे. आपल्या शरीरात आपले आपण बरं होण्याची क्षमता असते. फक्‍त त्याला थोडी भर घालावी लागते. ती या अरोमा तेलांतून मिळते.

  अरोमा थेरपी अंतर्गत वेगवेगळे गुणधर्म असणारी तेलं एकत्र केली जातात, ज्याला इसेन्शियल ऑइल ब्लेंडिंग म्हणतात. अरोमा थेरपी फेशियलमध्ये ऍक्‍ने, ग्लायकॉलिक, पॅराफिन, स्ट्रेस थेरपी, रिप्लेनिशिंग, व्हिटॅमिन सी आणि अरोमा थेरपी प्रेशर- पॉइंट फेशियलसारखी फेशियल असतात. त्यासाठी लागणारी ?रोमा ऑइल्स प्रत्येक व्यक्तींसाठी वेगळी वापरली जातात. ऍक्‍ने आणि ग्लायकॉलिक फेशियल हे खराब झालेल्या त्वचेसाठी केलं जातं. पॅराफिन फेशियल हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेला मऊसूत करून टवटवीत करण्यासाठी केलं जातं. रोजच्या कामाचे ताण आणि प्रदूषणासारख्या समस्यामुळे त्वचा खराब होते. त्यासाठी स्ट्रेस थेरपी फेशियल दिली जातात.

  रिप्लेनिशिंग म्हणजेच झालेली झीज भरून काढणं. या फेशियलचंही हेच काम आहे. सतत उन्हात राहिल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे त्वचेची अपरिमित हानी होत असते. ती भरून काढून त्वचेचा पोत सुधारून त्वचा चमकदार होण्यासाठी ही फेशियल केली जातात. या फेशियलमधे सी-वीड जेल, इन्सेन्शियल ऑइल्स, सेरम्स, फेशियल स्क्रब आणि खास मास्कचा वापर केला जातो.

  ऍक्‍युप्रेशर पॉइंट फेशियलमधे चेहऱ्यावर जे वेगवेगळे ऍक्‍युप्रेशर पॉइंट्‌स असतात त्यावर मसाज केला जातो. त्यानुसार मसाज केला जातो. फेशियल म्हणजे फक्‍त चेहऱ्याचा विचार करायचा नसतो, तर मानेच्या अगदी खालच्या भागापासून संपूर्ण पाठीला मसाज केला जातो. त्याचबरोबर डोकं आणि पावलांनाही मसाज केला जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने सगळा शीण बाहेर पडून शांत वाटतं. शिवाय एकदा फेशियल करून घेतलं की पुढे महिनाभर तरी कामातला उत्साह, वेग कायम राहतो. आणि हे प्रत्यक्ष अनुभवावं असंच असतं.
 • घरच्या घरी फेशियल
  घरीच फेशियलचा फील घ्यायचा असेल तर दररोज आंबेहळद दुधात उगाळून चेहऱ्याला त्याचा लेप लावावा किंवा मध-हळद आणि दही एकत्र करून लेप लावावा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. किंवा मग आठवड्यातून किमान तीनदा चेहऱ्यावर दही चोळून चेहरा धुऊन टाकावा. किंवा पिकलेली पपई कुस्करून चेहऱ्यावर चोळावी आणि दोन-पाच मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. किंवा बटाटा सालासकट किसून तो कीस पाच ते पंधरा मिनिटं (जितका वेळ सहन होईल तितका वेळ, पण 15 मिनिटांपेक्षा जास्त नको.) चेहऱ्यावर लेपासारखा लावून कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. जर काकडी, टोमॅटो, संत्रं, मोसंबं, कलिंगड वगैरे सोललं वा चिरलं असेल तर तो हात चेहऱ्यावर फिरवून पाण्याने धुऊन टाकावा. यामुळेही चेहरा स्वच्छ राहायला मदत होते. मात्र फेशियलमध्ये केल्या जाणाऱ्या मसाजचा जो फायदा होतो तो या घरगुती ट्रीटमेंटमधे मिळत नाही. त्यासाठी तीन-चार महिन्यांतून एखादं फेशियल करून घेऊन घरगुती प्रसाधनांच्या साहाय्याने चेहऱ्याची निगा राखता येईल.

(सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन)
 
(साभार : तनिष्का)
तनिष्का आहे प्रत्येकीशी मनमोकळं शेअरिंग करणारं स्त्रियांचं मासिक. वर्गणीदार व्हायचेय? इ-मेल  करा  
tanishka@esakal.com .
वार्षिक वर्गणी आहे फक्त 225 रुपये. मेलमध्ये तुमचा सविस्तर पत्ता नक्की लिहा.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 12/30/2010 4:36 PM Anita said:
धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत. ज्या मुलीना फेशियल बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे हा लेख आणि घरगुती उपायही सांगितले त्याबद्दल खरच मनापासून आभार.
On 5/26/2010 12:28 PM Geeta Tadulkar said:
I like it this fecial scrub all information is correct plz tell about all sugestion.
On 4/23/2010 7:38 PM teju said:
am 16 yr old girl......well i kno i cant do facial den what can i do 4 ma skin......??
On 2010/04/20 11:07 shubhangi karpe said:
khoop chan mahiti milali ,kharch iccha zali facial karnhyachi, ani gharche pan upay chan kalale , me gharguti upay pan try karel, thaks.
On 4/19/2010 4:46 PM Ritika said:
i like it this fecial scrub all information is correct plz tell about all sugestion.
On 18-04-2010 08:57:58 madhura said:
फेशियल बद्दल माहिती चागली सागितली आहे. मी घरगुती उपाय करेन.
On 4/17/2010 7:00 PM suhani said:
Thank you. You tell very helpful information about our face skin. Now I know how to protect our face from sun and how to take care our face with using various variety.
On 4/17/2010 12:34 PM ganesh said:
i like it
On 4/16/2010 11:52 AM Tips said:
Thank u so much Sakal team,,,,atishay chan, detailed, important mahiti milali..ya weekendla nakkich parlour madhe jaun facial karaychi icchha zaliye....nakki janar aani fresh houn yenar..thanks once again..


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: